Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उरली फक्त आठवण ..

व — विदेश, Sat, 01/26/2013 - 12:44
बहरलेला वृक्ष होतो , एकदा मी छानसा - गळुन गेली फूल पाने.. एकटा मी हा असा ! नाचती पक्षी कसे बघुनिया खांद्यावरी.. खेळताना, होइ मजला हर्ष माझ्या अंतरी - फूल फळ हुंगावया जमति जेव्हां पाखरे - हृदय माझे भरुनिया जातसे तेव्हां खरे ! सावली शोधावया पांथस्थ ते येती कुणी - बाहु पसरुन स्वागताला धन्यता वाटे मनीं ! आज काही नाही उरले भोवती माझे इथे - एकटा मी दु:ख माझे सांगतो मजला इथे ! .

प्रतिक्रिया द्या
790 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
पक्या Tue, 01/29/2013 - 18:56 नवीन
ह्म्म्म्..गरज सरो अन वैद्य मरो ! छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा