पाककृती

खजुर - सफरचंद खीर

Primary tabs

नमस्कार मंडळी !!

खरं तर ह्या खीरीची रेसेपी मी पुढल्या आठवढ्याकरिता ठेवली होती पण केल्यावर ती चवीला ईतकि छान झाली कि तुमच्याशी शेअर केल्याशिवाय रहावलं नाहि. दिलेलं साहित्य पाह्ता उद्या संकष्टि चतुर्थि चा उपास सोडण्याकरिता करायला हरकत नाहि.

बघता काय मग...घ्या देवाचं नाव आणि करा सुरवात!

Kheer

साहित्यः
१. रसरशीत लाल सफरचंद - ३
२. खजुर - १०
३. तुप - २ चमचे
४. केशर - चीमुटभर
५. साखर - आवडिप्रमाणे कमी/जास्त
६. दुध - १ लिटर
७. बारिक चीरलेले बदाम/पीस्ते

कृती:
१. एका जाड बुडाच्या पातेल्यात मध्यम आचेवर दुध आटवायला ठेवा. एक उकळि आली कि आवडिप्रमाणे साखर घालुन मधे मधे ढवळत रहा म्हणजे दुध खाली लागणार नाहि. दुध एकदम बासुंदि किंवा रबडि टाईप आटवायचं नाहिए म्हणुन साधारण घट्टसर झालं कि गॅस बंद करा आणि गार करत ठेवा.

२. केशर हलकसं परतुन गार करा. वाटित वरिल आटवलेलं गरम दुध घेउन त्यात केशर घालुन ठेवा. केशर परतल्याने त्याचा रंग अजुन खुलुन येतो

३. खजुराच्या बीया काढुन कुकर मधे एक ४-५ शीट्या काढा. वाफ जीरली कि मिक्सर मधे थोड्या दुधात मुलायम वाटुन घ्या.

४. पाण्याला उकळि आली कि बदाम/पिस्ते त्यात टाका. एक साधारण ३-४ मि. गॅस बंद करा. गरम पाणि निथळा आणि लगेच गार पाण्यात टाका. असे केल्याने त्यांची पुढची शीजायची क्रिया थांबते. आता डाळिंब्या सोलतो त्या प्रमाणे त्यांची सालं काढा आणि त्याचे बारिक काप करुन घ्या.

५. आता हि सगळि तयारि झाली कि सफरचंद सोला आणि किसुन घ्या म्हणजे किस (सफरचंदाचा :))) काळा पडणार नाहि

६. एका नॉनस्टिक पॅन / कढईत तुप गरम झालं कि त्यात सफरचंदाचा किस परता. आता ईथे दोन पर्याय आहेत. १. दुध जर नुसतं आटवलं तर ह्या किसात साखर घालु शकता किंवा २. दुधात जर साखर असेल तर परत ईथे साखर घालायची आवश्यकता नाहि.

७. किस सतत परता म्हणजे खाली लागणार नाहि. एक ४-५ मि. त्याचा रंग बदलेल आणि मिश्रणाचा गोळा होईल. मी आटवलेलंच दुध थोडं घालुन किस छान परतला. गरम किस लगेच दुधात मिसळु नका कदाचीत दुध फाटेल

८. आता सगळं गार झालं कि एक एक करुन सर्व दुधात मिसळा....१. केशर मिश्रित दुध, २. खजुर प्युरि, ३.सफरचंदाचा किस आणि ४. बारिक चीरलेले बदाम/पीस्ते

९. एक ४-५ तासानी खीर थंड झाली कि वरुन बारिक चीरलेले बदाम/पीस्ते/खजुराचे काप घालुन सर्व करा

१०. जर खीर गरम हवी असेल तर सगळं एकत्र केलं कि गॅसवर हलकसं गरम करा; उकळि आणु नका

११. पण हि खीर थंडगारच जास्त छान लागते. आवड्त असल्यास वेलची पुड टाकावी :)

धनुअमिता

छान झालीये खीर. असे वाटते कि आत्तच खावी.
वाचनखूण साठवण्यात आली आहे. नक्की करुन बघण्यात येईल.

सस्नेह

फोटोत नुसते पाहुणे कलाकार बदाम अन पिस्तेच दिसताहेत्..मुख्य कलाकार सफरचंद अन खजूर लुप्तच झालेत.
जरा मधल्या स्टेप्सचेपण फोटो टाकले तर बरं.a

दिपक.कुवेत

खजुराची प्युरि केलेय आणि सफरचंदाच्या किसाचा पण गोळा झालाय त्यामुळे खीरीत मिसळुन लुप्त झालेत...तुला हवे असल्यास त्यांचे तुकडे करुन टाकु शकतेस...

मधल्या स्टेप्सचेपण फोटो...ते एक तर काढायला वेळ नसतो आणि मला स्वःताला १७ फोटो काढण्यापेक्शा फायनल प्रोड़क्ट्चा फोटोच जास्त आवड्तो...अर्थात ह्या ज्याच्या आवडिचा प्रश्न

बाकि सगळ्यांचेहि धन्यवाद :)

पिंगू

जीवघेणी खीर आहे.. ह्या विकांती करुन बघण्याचा प्रयत्न केला जाईल..

- पिंगू

गणपा

सह्ही रे !
फोटु फारच मादक आलाय. :)

बॅटमॅन

आर्रे बाप्रे!!! लयच खत्तरनाक फटू!!! वारल्या गेलो आहे.

यशोधरा

फोटो मस्त! आणि २ भांड्यांमधून कशाला ठेवली आहे खीर? ठेवली ती ठेवली, त्याचे फोटो टाकायचा दुष्टपणा कशाला तो?

जयवी

हाय रे...... कसला जीवघेणा फोटू........दीपक अरे कसले प्रकार करतोस रे ........वजनाकडे दुर्लक्ष करुन मी हे बनवून खाणार :)

अनन्न्या

याने वजन वाढत नाही ना? नसणारच!! म्हणजे मनसोक्त खायला हरकत नाही.

पैसा

एकदम शाही प्रकार दिसतोय!

मदनबाण

फोटोतली २न्ही भांडी मी फस्त केली आहेत असे समजुन घ्यावे ! ;)
बाकी तुमच्या पाकॄ हटके असतात ! :)

(खीर प्रेमी);)

Mrunalini

खीर छानच... करुन बघायला पाहिजे.

रेवती

सफरचंदाची खीर कशी करतात याबद्दल उत्सुकता होतीच. बरे झाले ही पाकृ दिलीत. फोटू चांगला आलाय.
पूर्वी सानिकेनं दिलेली संत्र्याची खीर आठवली.

किसन शिंदे

बस्स!! आता उद्याच्या संकष्टीला किचनमध्ये घुसखोरी करून हि खीर बनवणारंच.

एकदम हटके पाककृत्या असतात तूमच्या. पूढील वेळी काय नविन असेल याची आत्ताच उत्सूकता लागलीय.

इथे, सफरचंद आणि खजुर, दोन्ही वस्तू उत्तम दर्जाच्या मिळतात. मी तर खाऊ शकणार नाही पण मित्रांना खाऊ घालेन.

सुहास झेले

ज ब री !!!!!

किती मिपाकारांचा बळी घ्याल दीपक साहेब.... ;-)

स्मिता.

फोटो बघूनच तोंपासु. एका मागे एक असे दोन्ही ग्लास रिकामे करावे असं वाटतंय.

लगेच करून पहिली , करताना जरी वेळ गेला होता पण जेव्हा फ्रीज मधून सर्व झाली , तेव्हा काय सांगू ,लाजवाब , मेहनती च चीज झालं .