Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मात

क — क्रान्ति, Wed, 01/30/2013 - 18:24
गुलजार यांच्या "खुदा" या रचनेचा स्वैर भावानुवाद करण्याचा माझा प्रयत्न गगनपटावर डाव मांडला, ओढलेस खेळात मला घुमता पट अन् अगम्य खेळी, मुळीच रस ना त्यात मला! सूर्य मांडला घरात काळ्या, तुला वाटले विझेन मी, दीप उजळला मी, जो दावी वाटा अंधारात मला तुझा वादळी सागर माझ्या अस्तित्वाला गिळताना एक चिमुकली पुण्याईची नाव तारते त्यात मला! काळाची सरकवुन सोंगटी घेसी का अंदाज उगा? तोडुन काळाच्या बेड्यांना मौज मिळे जगण्यात मला चमत्कार दाखवून माझे आत्मतेज मिटवू बघसी, तुझा चंद्र जिंकला पहा मी, कसली देशी मात मला? शह मृत्यूचा दिला, वाटले तुला, "चला, हरला आता!" देह सोडला मी, वाचविला आत्मा, भय ना घात मला! घुमव पुन्हा पट, मांड सोंगट्या, अन् माझीही चाल पहा, बघेन मीही तुझी कुशलता, आता दे ना मात मला! ******** मूळ कविता *********** "खुदा" . पूरे का पूरा आकाश घुमा कर बाज़ी देखी मैने काले घर में सूरज चलके, तुमने शायद सोचा था मेरे सब मोहरे पिट जायेंगे. मैने एक चराग जलाकर रोशनी कर ली, अपना रस्ता खोल लिया.. तुमने एक समन्दर हाथ में लेकर मुझपे ढेल दिया, मैने नोह की कश्ति उस के ऊपर रख दी काल चला तुमने और मेरी जानिब देखा, मैने काल को तोड़कर, लम्हा लम्हा जीना सीख लिया मेरी खुदी को मारना चाहा तुमने चन्द चमत्कारों से और मेरे एक प्यादे ने चलते चलते तेरा चांद का मोहरा मार लिया मौत की शह देकर तुमने समझा था अब तो मात हुई मैने जिस्म का खोल उतारकर सौंप दिया, और रूह बचा ली पूरे का पूरा आकाश घुमा कर अब तुम देखो बाज़ी... - गुलज़ार

प्रतिक्रिया द्या
3358 वाचन

💬 प्रतिसाद (18)
प
प्रचेतस Wed, 01/30/2013 - 18:35 नवीन
सुरेख भावानुवाद.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 01/30/2013 - 18:47 नवीन
मुळात गुलजारांच्या रचनांचे कुठल्याही प्रकारे रुपांतरणे करणे हे अजिबात सोपे नाही, त्यात इथे तर दोन वेगळ्या भाषा आहेत. गुलजारांसारख्या अत्यंत संवेदनशील कविच्या रचना पूर्ण समजणे हेच बर्‍याचदा एक आव्हान असते. पण क्रांतितै, तुमचा भावानुवाद आवडला. मुळ रचनेचा अर्थ छान पकडलात. विषेशतः
काळाची सरकवुन सोंगटी घेसी का अंदाज उगा? तोडुन काळाच्या बेड्यांना मौज मिळे जगण्यात मला
इथे केवळ वाह येते... तुम्ही जी मुळ रचनेची लय आहे ती कायम ठेवण्यात नक्की यशस्वी झालात. खुप अभिनंदन.. अश्याच अजुनही रचना / भावानुवाद वाचायला नक्की आवडतील.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/30/2013 - 19:03 नवीन
१ नंबर ........... :-)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 01/30/2013 - 19:44 नवीन
मस्त. अतिशय सुंदर भावानुवाद. :)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Fri, 02/01/2013 - 04:12 नवीन
भावानुवाद अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 02/01/2013 - 04:16 नवीन
सुंदर भावानुवाद!!
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Fri, 02/01/2013 - 04:36 नवीन
गगनपटावर डाव मांडला, ओढलेस खेळात मला घुमता पट अन् अगम्य खेळी, मुळीच रस ना त्यात मला!
सुरुवातच इतकी अप्रतिम केलीत की बस्स!!
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 02/03/2013 - 01:16 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
स
सुधीर Fri, 02/01/2013 - 06:19 नवीन
खूपच सुंदर भावानुवाद. गुलजारांची मूळ कविता उत्तम आहे पण तुमचा भावानुवाद मला त्याहूनही सुंदर वाटतोय. कदाचित, हिंदी कवितां वाचण्याची इतकी सवय नाही, त्यामुळे असेल कदाचित. अजून चांगल्या कवितांचा भावानुवाद वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 02/01/2013 - 06:28 नवीन
भावानुवाद अन मूळ कविता पुन्हा वाचली. हिंदी शब्दसंग्रह तोकडा असल्याने तुमचा भावानुवाद वाचला नसता तर कदाचित ती इतकी चांगली समजली नसती. (स्वसंपादनाची सोय असायला हरकत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
च
चेतन Fri, 02/01/2013 - 10:13 नवीन
अनुवाद ठीक (नाही आवडला या वेळेला) खास करुन चमत्कार दाखवून माझे आत्मतेज मिटवू बघसी, तुझा चंद्र जिंकला पहा मी, कसली देशी मात मला? हा याचा मेरी खुदी को मारना चाहा तुमने चन्द चमत्कारों से और मेरे एक प्यादे ने चलते चलते तेरा चांद का मोहरा मार लिया भावानुवाद वाटत नाही आहे
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 02/02/2013 - 08:45 नवीन
क्रांती हे नाव वाचले की माझ्या मनात आजकाल प्रतिक्षिप्त उद्गार उमटतात "वाह! क्या बात है" त्या उद्गारांना सार्थ करणारी ही कविता सुद्धा. अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments
श
श्रिया Sat, 02/02/2013 - 12:30 नवीन
खुपच सुरेख भावानुवाद, शब्दयोजन अप्रतिम!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 02/02/2013 - 15:52 नवीन
अगदी सुरेख भावानुवाद!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 02/03/2013 - 21:29 नवीन
सुरेख, अप्रतिम. क्रांतीतैच्या कवितांबद्दल जेवढे ऐकले होते, अगदी १०० टक्के पटले. मिका, क्रांतीतै तुम्हालाच कसे जुळते हे जिगसॉ पझल?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 02/04/2013 - 04:07 नवीन
सुरेख!! अप्रतिम भावानुवाद!!! खूप म्हणजे खूपच आवडली दोन्ही व्हर्शन्स... जियो!!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 02/04/2013 - 19:58 नवीन
सगळ्या वाचकांना आणि प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Tue, 02/05/2013 - 19:07 नवीन
व्वा, फारच सुरेख शब्दरचना केलीय. खुपच आवडला मराठीतला भावार्थ.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा