Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ती खिडकी..!!

फ — फिझा, Fri, 02/01/2013 - 08:18
निरोप घेताना चेहरा हसरा ठेवलेला असतो .... निघण्याचा क्षण आता निसटून गेलेला असतो ... राहिलेली असते ...ती फक्त एक खिडकी ..!! विचारांचा कल्लोळ उडालेलं मन ... अडखळत टाकलेली काही पावले .. नव्या जगाचा , नवा ध्यास .. जुन्या फक्त ओळखीच्या आठवणी ... आणि एक अनोळखी खिडकी ..!! आपल्याला घेऊन उडणारा तो अफाट मोठा पक्षी ... आभाळाला जाऊन भिडण्यासाठी त्याने घेतलेला तो तुफान वेग .... भरून आलेले डोळे , दबलेला एक हुंदका ... आणि सोबतीला ..फक्त ती खिडकी ..!! थरारणारे काहीतरी , उडणारे काहीतरी ... नवीन वेगाने जुन्या वेगाला मागे टाकत घेतलेली भरारी.. क्षणार्धात खाली राहिलेली लुकलुकणारी जमीन ... दूर दूर होत चाललेले ते ठिपके ... आणि जवळची होत चाललेली ...ती खिडकी ..!! दुरावत चाललंय ते काहीतरी ... जग ,पृथ्वी , जमीन कि आपलं घर .. कुणास ठाऊक ! विचारातच गर्क असणारं हे वेडे मन ... एका विलक्षण सुंदर दृष्याने स्थिरावते ... नेहमी नजर वर केल्यावर दिसणारे ढग ... आता नजरेसमोर दाखवत असते...ती खिडकी..!! एक एक ढग एक एक आठवणी सारखा .. धरूनही ठेवता येत नाही ,पुसता ही येत नाही .. कसलीच सीमा नाही,क्षितिजही नाही ... चंद्रच फक्त मग डोकावून पाहणारा ... आता पलीकडे तो आणि अलीकडे मी ..... कारण मध्ये ....हि खिडकी...!! चंद्राशी हसता हसता ... एक नजर पडतेच मग काचेवर .. डोळ्यातले पाणी ,ओठावरचे हसू .. आणि जगाशी कि स्वताशी च ताटातूट झालेले आपण .... फक्त एवढंच ...... मग एक टाकलेला उसासा .... आणि बंद केलेली ...ती खिडकी .......!!

प्रतिक्रिया द्या
1505 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 02/01/2013 - 08:24 नवीन
नवीन वेगाने जुन्या वेगाला मागे टाकत घेतलेली भरारी ... एक एक ढग एक एक आठवणी सारखा .. धरूनही ठेवता येत नाही ,पुसता ही येत नाही ..
हे खासचं
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 02/01/2013 - 10:28 नवीन
खिडकी आवडली आहे अत्यंत. अप्रतिम
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 02/02/2013 - 03:47 नवीन
पहिल्यांदा देश सोडला ती आठ्वण अगदी जशीच्या तश्शी मांडल्यासारख वाटल. सुरेख फिजाबाई? भाई?
  • Log in or register to post comments
फ
फिझा Sat, 02/02/2013 - 06:33 नवीन
फिझा ताइ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
पैसा Sat, 02/02/2013 - 15:47 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Sat, 02/02/2013 - 19:31 नवीन
आधि वाटलं ती खोली च विडंबन आहे की काय...
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 02/03/2013 - 07:20 नवीन
खूप आवडली कविता.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा