आई
काल रात्री मैत्रिणीबरोबर "आई" या अथांग विषयावर खूप गुज बोलून झाले. सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे शिवाय कविता हा माझा प्रांत नाही. पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे. आशा करते कवितेमागील भावना पोचतील.
संस्कार, त्याग, गर्भाशय,
ऊब, दिलासा, अंगाईगीत,
उन्हात वणवणताना मिळालेली
शीतल सावली व झुळूक
सवयी, व्यक्तीमत्त्वाची जडणघडण
आणि हो प्रार्थनादेखील.
नाळ, रुजलेली पाळंमूळं व
दाटून आलेला हुंदका सुद्धा
या सार्या गोष्टींचा ,
लहान प्रेमळ देव
आणि त्याला जोडलेले हात.
माझं भलं तिला लागो,
तिचं वाईट मला मिळो.
💬 प्रतिसाद
(17)
ध
धन्या
Sat, 02/02/2013 - 14:44
नवीन
आईच्या प्रेमापुढे सारं काही फिकं असतं.
पण काही दुर्दैवी जीवांच्या नशिबी अशीही आई येते. जन्मदात्रीच आयुष्याचा नरक बनवते. उभं आयुष्य आपण अशा आईच्या पोटी जन्माला आलो ही एक दुर्दैवी घटना (ट्रॅजिक ईव्हेंट) होती अशी स्वतःचीच समजूत घालून आपलं "सायकॉलॉजीकल मेस" असलेलं आयुष्य सावरताना नकोसं होऊन जातं.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 02/04/2013 - 03:58
नवीन
इतकं टोकालाही जायची गरज नाही. आईसाठी उमाळा आला की नवर्याची/बायकोची आई आठवावी म्हणजे झालं. ;-)
- Log in or register to post comments
द
दादा कोंडके
Sat, 02/02/2013 - 14:55
नवीन
वरती वाकडाजीरावांशी सहमत.
हल्ली अश्या कविता वाचून भावना डोक्यापर्यंत पोहोचत नाहीत. रोजचा पेपर उघडला की दिड-दोन हजारात तान्ह्या मुलांना विकणार्या आया दिसतात, जन्माआधीच विहिरीत फेकणार्या आया दिसतात, काही आया अंगावरचं दूधही न सोडलेल्या पोटच्या पोरांना नवर्याच्या हवाली करून आधिच्या प्रियकराबरोबर पळून जातात.
त्यामुळे वैयक्तीक अनुभवांपर्यंतच ठिक आहे.
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Sat, 02/02/2013 - 15:32
नवीन
छान कविता. आवडली.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 02/02/2013 - 15:36
नवीन
हे फार सुरेख शुचि.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 02/02/2013 - 15:39
नवीन
आवडली.
- Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा
Sat, 02/02/2013 - 19:25
नवीन
होय! म्हणुनच जे काही खरडले ते गोड मानले आहे... अन्यथा...
- Log in or register to post comments
ज
जेनी...
Mon, 02/04/2013 - 01:24
नवीन
:(
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Mon, 02/04/2013 - 01:51
नवीन
ए आये!
- Log in or register to post comments
च
चैतन्य दीक्षित
Mon, 02/04/2013 - 12:02
नवीन
मनातलं जे आहे तसं मांडलंय. कवितेचा बांधा आहे का? वृत्त्/मीटर आहे का? वगैरे काही नाही.
जे आतून आलंय ते मांडलंय. खरं तर अशा रचना आवडत नाहीत मला. पण ही रचना अपवाद!
शेवट तर खूपच छान.
धन्यवाद ही कविता इथे दिल्याबद्दल.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 02/04/2013 - 12:49
नवीन
इतक्या सर्वांची काळजी घेणं एकट्या देवाला शक्य होत नाही म्हणून त्याने 'आई' निर्माण केली.
पण दुर्दैवाने तशी 'आई' हल्ली दुर्मिळ होत चालल्याचे जाणवते आहे.
- Log in or register to post comments
त
तर्री
Mon, 02/04/2013 - 12:55
नवीन
भावना पोहोचाल्या.
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Mon, 02/04/2013 - 14:24
नवीन
सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे...पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे.
हे वाचताना मलाही हुंदका अनावर झाला ग...
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी..!!!!!!!!!!!!!
- Log in or register to post comments
श
श्रिया
Mon, 02/04/2013 - 17:11
नवीन
खुप छान अभिव्यक्ति! अतिशय आवडली!
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 02/04/2013 - 17:15
नवीन
आवडेश
- Log in or register to post comments
द
दीपा माने
Mon, 02/04/2013 - 17:59
नवीन
शुची, अंतःकरणातून आलेल्या उमाळ्यातूनच खर काव्य प्रसवतं असं मला वाटतं. त्यामुळे तुमची कविता/काव्य सुंदरच आहे.
- Log in or register to post comments
प
पेशवा
Tue, 02/05/2013 - 03:36
नवीन
ओनेस्ट भावना
- Log in or register to post comments