जे न देखे रवी...

घेतली मिठीत आम्ही---

Primary tabs

घेतली मिठीत आम्ही
मेघातली त्या वीज ती
ठाउक हे होते जरी की
आंम्हास हो जाळेल ती

जाळणे हे काम तिचे
तक्रार नाही आंम्हास हो
घेतली होती मिठीत
कौतुक त्याचे आंम्हास हो

चटका जरी बसला असा पण
हौस नव्हती भागली
फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही
वीज होती घेतली

चटका जरी बसला असा पण
हौस नव्हती भागली
फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही
वीज होती घेतली

सुंदर !!! समज असूनही वेदनेला मिठीत घेणे नव्हे, वेदनेच्या मिठीत जाणे काही औरच असते.
आवडली कविता !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे