Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बेरीज

उ — उपटसुंभ, Mon, 02/04/2013 - 19:25
पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी झेलण्या केले खुले काळीज मी भेटुनी जाते त्सुनामीसारखी मिरवतो आयुष्यभर ती झीज मी आज स्वप्नांनो, नको तसदी मला काल कवडीमोल विकली नीज मी पूर्णता नाही तुला माझ्याविना मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी ठरवले आहेस तू उत्तर तुझे, की चुकीची मांडतो बेरीज मी? -- उपटसुंभ

प्रतिक्रिया द्या
2730 वाचन

💬 प्रतिसाद (14)
अ
अधिराज Mon, 02/04/2013 - 19:32 नवीन
खूप मस्त कविता आहे. आयला प्रेयसी म्हणावी का नैसर्गिक आपत्ती (वीज,त्सुनामी)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 02/04/2013 - 19:44 नवीन
एकेक शेर अस्सल मोती!
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Mon, 02/04/2013 - 20:08 नवीन
जबरदस्त!! पण काहीही म्हणा फार वादळी दिसतेय तुमची प्रेयसी...
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 02/04/2013 - 20:18 नवीन
खरच भारीये वोल्कॅनो अ‍ॅडवला असता तर प्रेयसीला अजुन एक उपमा मिळुन अजुन दोन लाइनी वाढल्या असत्या कि ... बाकि लाजवाब !
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 02/04/2013 - 20:32 नवीन
फार आवडली कविता.
  • Log in or register to post comments
अ
अनुप कुलकर्णी Tue, 02/05/2013 - 00:52 नवीन
पूर्णता नाही तुला माझ्याविना मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी
मी दोनदा आलय हो.. बाकी खतरनाक!
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Wed, 02/06/2013 - 17:35 नवीन
अनुप, मी तरी तुझ्याशिवाय 'मी' म्हणून कुठे पूर्ण होतो? असं म्हणायचं असावं त्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप कुलकर्णी
इ
इन्दुसुता Tue, 02/05/2013 - 02:58 नवीन
गझल अतिशय आवडली
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 02/05/2013 - 03:08 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 02/05/2013 - 03:18 नवीन
सुंदर गझल. आवडली.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/06/2013 - 07:52 नवीन
सुरेख रचना.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 02/06/2013 - 12:16 नवीन
आज स्वप्नांनो, नको तसदी मला काल कवडीमोल विकली नीज मी .. अप्रतिम
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 02/06/2013 - 12:37 नवीन
पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी झेलण्या केले खुले काळीज मी
पहिलाच शेर ताकदीचा झालाय..
भेटुनी जाते त्सुनामीसारखी
त्सुनामी हा शब्द काव्यात खटकला...पण ते माझं वैयक्तिक मत झालं
आज स्वप्नांनो, नको तसदी मला काल कवडीमोल विकली नीज मी
जियो.. शेरची दुसरी ओळ ही जबरदस्त परिणाम करणारी असावी लागते. हा शेर (आणि शेवटचा ही) याला उत्तम प्रमाण आहे
पूर्णता नाही तुला माझ्याविना मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी
'मी' दोनदा आल्यामुळे आगाऊपणा करून असे सुचवतो - पूर्णत्व नाही तुला माझ्याविना असूनही नाही तुझ्याखेरीज मी बाकी तुमच्या रचना एकदम तंत्रशुद्ध असतात.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 02/06/2013 - 12:45 नवीन
वाह ! गजल आवडली !! त्सुनामी , बेरीज हे दोन शेर भारी वाटले !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा