घर
या घराला विचारले मी एकदा
असा रिकामा रिकामा असतोस
वाईट नाही वाटत?
क्षणभर विचार करून घर म्हणाले,
नाही, म्हणजे नेहमीच नाही
.
.
म्हणाले या भिंती पाहिल्यास
किती सुंदर रंग लेवून उभ्या आहेत
इकडे ये, या खिडक्या पहा
आपली कवाडे उलगडून उनपावसाला बोलावून आणताहेत
.
.
अन् ते दार बघितलेस
सताड उघडे, सगळे सामावून घ्यायला उत्सुक
येणार्याला खिडकीतून आलेला पाऊस विनामूल्य देणारे
वा सोनसळी उन्हाची खुशाल मेजवानी घालणारे
.
.
हे सगळे पहिले कि नाही वाईट वाटत
मी सुखावतो आणि आकंठ भरून जातो
रिकामपण माझे काही क्षण का होईना विसरतो
विचारले त्याला मग मगशी 'नेहमीच नाही' म्हणालास
ते कां?
.
.
म्हणाले जरा वर पहा
ते झगमगणारे आकाश पाहिलेस
ते चांदण मला बेचैन करते रे,
फार जीवाला लागतं ते
तेव्हा अचानक ध्यानी आले माझ्या
त्या घराने आपले छतचं गमावले होते
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०७/०२/२०१३)
💬 प्रतिसाद
(22)
फ
फिझा
गुरुवार, 02/07/2013 - 06:19
नवीन
खुप छान वाटलि कविता.......
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/07/2013 - 06:26
नवीन
1 नंबर
- Log in or register to post comments
च
चाणक्य
गुरुवार, 02/07/2013 - 08:08
नवीन
काय बोलू? ...प्रतिक्रिया द्यायला सुद्धा माझ्याजवळचा शब्दसाठा अपुरा आहे मित्रा...सुंदर रचना
- Log in or register to post comments
म
मनराव
गुरुवार, 02/07/2013 - 08:23
नवीन
उत्तम विचार....
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 02/07/2013 - 13:26
नवीन
अत्यंत सुंदर तरीही करूण रचना.
- Log in or register to post comments
इ
इनिगोय
गुरुवार, 02/07/2013 - 13:29
नवीन
मिका.. मिका! कोणत्या जगात वावरतोस रे!! __/\__
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 02/07/2013 - 13:37
नवीन
इन्नातैला सहमत.
मिकाला वेगळी लेन्स मिळालीय. आणि ते बघितलेलं जाणवणार संवेदनशील मन.
हे सर्व शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मिका
- Log in or register to post comments
त
तिमा
गुरुवार, 02/07/2013 - 13:33
नवीन
नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्यात हातखंडा आहे मिका तुझा!
कविता अर्थातच आवडली, हे वेगळं सांगायला नकोच.
- Log in or register to post comments
व
वपाडाव
गुरुवार, 02/07/2013 - 13:35
नवीन
टोप्या उडवल्या आहेत...
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 02/07/2013 - 13:50
नवीन
छान लिहीलंय !!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 02/07/2013 - 14:03
नवीन
सु रे ख.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 02/07/2013 - 14:28
नवीन
हे छत गमावणंच तर कधीही एकाकी न वाटण्याच रहस्य आहे!
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 02/07/2013 - 15:22
नवीन
फार आवडली.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 02/07/2013 - 18:29
नवीन
अहा!
- Log in or register to post comments
प
पियुशा
Fri, 02/08/2013 - 05:55
नवीन
मिका रॉक्स ! एक कवितासंग्रह प्रकाशित करायचे मनावर घ्या आता :)
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 02/08/2013 - 07:05
नवीन
चालत्या फिरत्या कट्ट्याला रामदास काकांनी आम्हाला दाखवलेली 'एक्स्प्लनेड मॅन्शन' बिल्डींग जी जळून गेली होती.. नंतर परत बांधली वगैरे... तिथुन चालू झाली "घर" कविता...
हे लिहायचे राहिले होते, धाग्यावर.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 02/08/2013 - 13:45
नवीन
कविता मस्त आहे !
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Fri, 02/08/2013 - 18:30
नवीन
आवडली कविता.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sun, 02/10/2013 - 13:24
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
ग
गवि
Sun, 02/10/2013 - 13:54
नवीन
:-( कोंकणातल्या घराचं असं झालंय.... एके दिवशी खूप वर्षांनी गेलो तेव्हा अस्संच भस्सकन दिसलं..
- Log in or register to post comments
श
श्रिया
Mon, 02/11/2013 - 06:33
नवीन
अत्यंत सुरेख!
- Log in or register to post comments
C
C Ramarao
Mon, 02/11/2013 - 08:14
नवीन
छा न वाट्ली
- Log in or register to post comments