Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुठे असतोस मित्रा

श — शैलेश हिंदळेकर, Sat, 02/09/2013 - 20:30
कुठे असतोस मित्रा तुझी भेट होत नाही तुला भेटल्या शिवाय झोप नीट येत नाही उपकारांचे मी तुझ्या कसे फेडावे रे ॠण हाच विचार असतो कैक दिवसांपासून तुझ्यामुळेच लाभली माझ्या पत्नीची ती मिठी फक्त तुलाच पाहून तिला वाटते रे भिती दॄढ मैत्रिचा आपल्या केला तीनेच की घात कीट-नाशक फवारा तीने मारला घरात आता कसली ती मिठी आणि कसे बिलगणे औषधाचा तो राहतो गंध अनेक महिने

प्रतिक्रिया द्या
3681 वाचन

💬 प्रतिसाद (24)
स
संजय क्षीरसागर Sat, 02/09/2013 - 20:42 नवीन
त्रिकोणी पोपट म्हणतात याला
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Sat, 02/09/2013 - 20:54 नवीन
हा हा हा... भारी..
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 02/09/2013 - 20:57 नवीन
फवारा उडेल अंगावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
ध
धन्या Sat, 02/09/2013 - 21:02 नवीन
फवारा अंगावर उडणं चांगलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 02/09/2013 - 21:07 नवीन
पंपच गुल केला तर सगळे प्रश्न सुटतील असं नाय का वाटत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
श
शैलेन्द्र Sun, 02/10/2013 - 11:16 नवीन
येवढी मेहनत का करावी? पंपाच प्रेशर वाढणार नाही इतकच बघा म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 02/10/2013 - 16:07 नवीन
आहो, पंप पत्नीकडे आहे ना!.. त्यामुळे प्रेशर कंट्रोल करणं शक्य नाही, हे एक. आणि केंव्हा, कसा आणि कुणावर फवारा उडेल याचा नेम नाही, हे दुसरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Mon, 02/11/2013 - 16:24 नवीन
आहो, पंप पत्नीकडे आहे ना!.. त्यामुळे प्रेशर कंट्रोल करणं शक्य नाही, हे एक.
पत्नीवर कंट्रोल नाही हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 02/11/2013 - 19:40 नवीन
त्यामुळे पंपावर कंटोल नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
अ
अग्निकोल्हा Mon, 02/11/2013 - 19:52 नवीन
मुद्दा हा आहे पत्निने पंप स्वतःहुन हाति घेतला की तुम्ही दिला ? जर तुम्ही दिला नसेल तर पत्नीवर कंट्रोल नाही हेच बरोबर.. अन तुम्हिच हाती दिला असेल तर मात्र पंपावर कंट्रोल नाही असं म्हणा हवं तर... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
परिकथेतील राजकुमार Sun, 02/10/2013 - 11:56 नवीन
काही लोकं आवडीने उडवतात आणि काही आवडीने अंगावरती उडवून घेतात असे पाहण्यात आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
प्रसाद गोडबोले Sun, 02/10/2013 - 12:01 नवीन
आवड एकेकाची =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अग्निकोल्हा गुरुवार, 02/14/2013 - 20:02 नवीन
पाहणार्‍याचीही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
आ
आनन्दिता Sun, 02/10/2013 - 16:32 नवीन
छ्या बुवा !!! कवितेची टर उडवली तर पैसा ताई चावट म्हणते... अन भारी म्हटलं तर संक्षी काका ,बाजुला हो फवारा उडेल म्हणतात... करु तो क्या करु?? :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
अ
अभ्या.. Sat, 02/09/2013 - 21:00 नवीन
समजू शकतो तुमचं दु:ख. :(
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 02/10/2013 - 03:52 नवीन
भारी प्रकार आहे!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 02/10/2013 - 04:33 नवीन
बाहेरुनच तुमच्या कवितेची लागली मला कुणकूण पण आहे नक्की कोण तो ? उंदिर की ढेकूण ??? :-b
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 02/10/2013 - 06:37 नवीन
तुझ्यामुळेच लाभली माझ्या पत्नीची ती मिठी फक्त तुलाच पाहून तिला वाटते रे भिती
पत्नी मिठी मारते म्हणजे सॉलिड कुणी तरी असणारे. आणि मग...
उपकारांचे मी तुझ्या कसे फेडावे रे ॠण हाच विचार असतो कैक दिवसांपासून
हे कसं जुळणार? पण... किटकनाशक फवारणीचं नवं अस्त्र उजेडात आणल्यामुळे श्वास कोंडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
आ
आजानुकर्ण Sun, 02/10/2013 - 06:44 नवीन
प्रस्तुत प्राणी झुरळ आहे काय? (कीटनाशकांमुळे उंदीर मरत माहीत. आणि बायकांना झुरळांची जितकी भीती वाटते तितकी ढेकणांची वाटत नाही त्यामुळे वाटले.) Image removed.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 02/10/2013 - 06:48 नवीन
पहिलं कडवं वाचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
श
शैलेश हिंदळेकर Sun, 02/10/2013 - 11:15 नवीन
समजून घे ना भाऊ, अरे कविता म्हणजे काय ते आता कुठे थोडं थोडं उमाजायला लागलय, जमेल लवकरच, तोवर जे काही तोडकं मोडकं मांडतोय त्याला तुम्हा दिग्गजांची दाद मिळाली तर लवकर सुधारणा होईल आणि ते सारं झुरळा बद्द्लच होतं बरं, काही मित्रांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 02/10/2013 - 11:21 नवीन
शेवटी (म्हणजे आता नाही, कवितेच्या शेवटी) सांगितलं असतं तर इतका फवारा उडाला नसता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेश हिंदळेकर
अ
अधिराज Mon, 02/11/2013 - 04:51 नवीन
मला झुरळाच्या कविता खूप आवडतात. कालच आमच्या बाईंनी शाळेत शिकवली. एक होतं झुरळ चालत नव्हतं सरळ..! तिकडून आली बस... बसमध्ये बसलं, तिकीट नाही काढलं.... तिकीटचेकरने पाहीलं, चिमटीत धरून फ़ेकलं.....!!!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 02/12/2013 - 16:50 नवीन
मिसळीत पडलं झुरळ...! :(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा