आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?
पिंपळाच्या झाडाला, खवीस तो लटके बाई
आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?
प्रेत जळते स्मशानी ,लाकडे हि जळु लागली
फुले कण्हेरीची ,रास गावर्याची हि पेटू लागली
आक्रंदती सारे सगे सोयरे,मोकलली धाय ही
फुटेल केव्हा कवटी ,काळजी त्यांना लागली
जमले खवीस कृत्या ,नाचतो ब्रह्मसमंध
उठेल माझा मुंजा, नका असे नाचू अंधाधुंद
आवाज झाला मोठा ,फुटली असेल कवटी
भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी
avi
💬 प्रतिसाद
(24)
श
श्री गावसेना प्रमुख
Mon, 02/11/2013 - 11:40
नवीन
पिंपळाच्या झाडाला, खवीस तो लटके बाई
आज माझ्या अकुला, झोप का येत नाही?
प्रतीसाद मिळाले ,व्यनि ही झाले
काथ्या कुटुन झाला ,अकु पळुन गेला
तरीही शांतता नाही जिवाला.
म्हणुनी म्हणतो ह्या मुळेच अकुला झोप येत नाही
आज माझ्या अकुला, झोप का येत नाही?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 02/11/2013 - 11:42
नवीन
आत्मा ह्यांची प्रतिक्रिया वाचण्यात उत्सुक.
- Log in or register to post comments
प
पक पक पक
Mon, 02/11/2013 - 18:35
नवीन
:bigsmile:
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Mon, 02/11/2013 - 12:13
नवीन
हा हा हा मस्तच :)
अमोल केळकर
- Log in or register to post comments
ध
धन्या
Mon, 02/11/2013 - 12:34
नवीन
अजून येऊदया.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 02/11/2013 - 13:13
नवीन
पण सध्या तुम्ही आत्मुसची आठवण परत परत का काढताय ब्वॉ?
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 02/11/2013 - 13:59
नवीन
पण अकुकाकांनी येवढं लिहायचे कष्ट घेतले हेही नसे थोडके.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/11/2013 - 14:24
नवीन
झक्कास..
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Mon, 02/11/2013 - 14:37
नवीन
एक नंबर.....
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 02/11/2013 - 14:39
नवीन
पण सटवी ब्रम्हदेवाची बायको ना? मग त्या देवीला या भूताखेतांत आणून कशाला बसवलं हो?
- Log in or register to post comments
व
वेताळ
Mon, 02/11/2013 - 15:17
नवीन
चांगला प्रयत्न.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 02/11/2013 - 15:25
नवीन
पोटेन्शियल आहे तुमच्यात !! लेखनाकडे जरा गांभीर्याने लक्ष द्या .( गंभीर लेखन करा असे नाही , विनोदी काथ्याकुट ञाकणार असाल तरीही सीरीयस्ली लिहा )
"काकुंचा सल्ला"
- राष्ट्रकाकु गिरीजा
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 02/11/2013 - 15:46
नवीन
@भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी>>> =)) अस्सें क्कांय??? =)) नेमकें आमच्या वाडीत आंलेत कांय? थांबा, अता तुमच्या मागे भुतावळ लावतो.
@अता सटवी शोधणे आले.... 
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 02/11/2013 - 16:01
नवीन
शोधलीत म्हणे तुम्ही.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Mon, 02/11/2013 - 16:03
नवीन
सटवी सापडल्याबद्दल हाबिनंदन हो बुवा..
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 02/11/2013 - 16:04
नवीन
म्हणजे आम्ही वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा उपयोगी पडल्या तर!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 02/11/2013 - 16:18
नवीन
न...........ही...........
ईईईईईईईई ,,, ये सब झुठ है..........!!!
नाय हो पैसाताई...ख्वॉटं बोल्तात...चावट हायत ही मुलं... =)) आणी तो अगोबा...आगलाव्या अगोणकर... दुष्ट आहे =))
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 02/12/2013 - 01:21
नवीन
हो ना! हे असल खोट नाट ऐकुन लायनीतल्या सटव्या पळुन जायच्या म्हणते मी.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 02/12/2013 - 05:57
नवीन
@लायनीतल्या सटव्या पळुन जायच्या म्हणते मी.>>> हे यमराज.....!!! आमच्या मागे लाइन???
या पेक्षा दुसरं कल्पनातीत स्वप्न रंजन या इहलोकात असू शकतं काय??? 
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 02/12/2013 - 06:10
नवीन
का नाही?
आप तो फुल बिछाते हो अतृप्तजी !
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 02/12/2013 - 06:52
नवीन
शेवटचा प्रतिसाद............. :-)
@आप तो फुल बिछाते हो अतृप्तजी ! >>>
लेकिन... उस के उपर से ,अपने लिये चलकर कोइ नही आता...
- Log in or register to post comments
N
Nile
Tue, 02/12/2013 - 02:08
नवीन
अहो, त्याने हडळ पाहिली असेल!!
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.... संपादन संपादन.
सवयीप्रमाणे आम्हाला वाटलं एकोळी कौल काढला का काय, म्हणून काय लिहलं ते वाचलंच नाही!
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 02/12/2013 - 05:46
नवीन
अकुंच्या धाग्यात "जीव" आहे का हे माहित नाही पण "आत्मा" जरूर आहे..
अवांतर : बुवांच अभिनंदन..
अति अवांतर : वल्लिदांनी दिली म्हणजे ही बातमी "खात्रीशीर" मानावी काय?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 02/12/2013 - 07:12
नवीन
@अवांतर : बुवांच अभिनंदन.. >>> बोंबला तिच्यायला...! अहो नाही हो नाही...! सटवाईची आन..तस काय बी न्हाई ...!
@अति अवांतर : वल्लिदांनी दिली म्हणजे ही बातमी "खात्रीशीर" मानावी काय?>>>
वल्लीदांबद्दल आम जनतेला असलेली खात्री पाहून......... वारलो
- Log in or register to post comments