कढी आणि फुणके
Primary tabs
साहित्य-
हरबरा डाळ – 1 वाटी
तुरीची डाळ – 1 वाटी
चवलीची डाळ – 1 वाटी (माझ्याकडे नव्हती म्हणून चवळी घेतली)

कांदे – 2 मोठे
आल – अंदाजे
लसूण – 1
जिरे – 1 चमचा
हळद – ½ चमचा
लाल तिखट – आवडिनुसार

कृती-
प्रथम वरील सर्व डाळी 5-6 पाण्यात भिजवून घ्याव्यात. त्यानंतर चाळणीवर उपसून घ्याव्यात.
मिक्सर च्या भांड्यात थोडी-थोडी डाल, लसूण, आलं एकत्र करून भरड वाटून घ्यावे. (मिश्रण पातळ करू नये, त्यासाठीच डाळीतले पाणी पूर्ण काढून घ्यावे.)

आता वाटलेल्या डाळीत जिरे, हळद, लाल तिखट, कांदा, कोथंबीर घालून मुटके वळावेत व इडली पात्रात किवा पसरट कढईत वाफौन घ्यावेत. हे वाफवून ही खाता येतात किवा एका पॅनमध्ये तेल, जिरे, मोहरी ची फोडणी करून हे मुटके कुस्करून एक छान वाफ आणावी. व कढी सोबत खावे.

कढी करताना फक्त डाळीच्या पिठाएवजी वरील वाटलेली डाल अजून जास्त बारीक करून तकाला लावावी.

एकदम भारी पदार्थ.
धन्यवाद रेवती ताई
मस्त. नक्की करुन बघेन. :)
सुरेख!!!
असे असतात काय फुणके! मस्त पाकृ.
आमच्याकडे कढीगोळे नामक एक प्रकार होत असे. तो हाच/असाच का? त्यात कांदा-कोथिंबीर नसे, फक्त हळद, जिरं आणि मीठ असायचं. कढीच्या फोडणीत लाल मिरची असायची आणि कढीगोळे कढीतच सोडलेले असायचे, त्यामुळे वेगळं तिखटही घालत नसत. (अशी आठवण. आमच्या घरची पाकृ कोणे एकेकाळीच गेली.)
कढी गोळे वेगळे.
एक अवांतर प्रश्न - साहित्यामध्ये चवलीच्या (चवळीच्या) डाळीचा उल्लेख आहे.
'चवळीची डाळ' मी प्रथमच ऐकतो आहे. तुरीची, हरभर्याची (चना), उडदाची, मुगाची, मसुरीची, मोहरीची वगैरे ऐकल्या / वापरल्या आहेत...
चवलीची डाल किराणा दुकानात मिळते. आपल्या इतर दालींसारखीच असते.
'चवलीची डाल' 'ळ' लिहायला CAPS 'L' वापरा. हे वरचं चवली वाचून शाळेत मराठीचे सर अतिशयोक्ती अलंकार शिकवताना वापरायचे ते उदाहरण आठवलं 'चवलीपावलीचं तेल आणलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला' असं काहीसं.
फुणके?
कधीच न ऐकलेला पदार्थ. हे एव्हढ खाल्लकी पोट भरत असेल ना? कारण डाळी तश्या जड असतात.
चल करुन पहाते आजच.
आणि हो, फोटोज डायरेक्ट चढवा ना ग? कशाला अॅटॅचमेंट मध्ये टाकताय?
अपर्णा ताई फोटो डायरेक्ट टाकण्याचा प्रयत्न केला पण मला जमतच नाही.
मदत -मिपावर फोटो चिकटवणे.
यासंबंधी काही प्रश्न असल्यास जरूर विचारा...
माझा आवडता पदार्थ :)
http://mejwani.in/
महिती नाही पण पाकृ आवडली.
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त :-)
नविनच पदार्थ दिसतोय....ट्राय करायला हरकत नाहि. रात्रिच्या जेवणाला मस्त पर्याय
छानच आहे..
- पिंगू
सध्या असल्याच पौष्टिक आणि पोटभरू पाककृतींच्या शोधात आहे.
ढन्स. :)
एक्दम वेगळी मस्तच आहे
त्याची भजी पण छान होतात. पाक्रु.झकास!!
ह्याला फुंदके ही म्हणतात का?
पाककृती मस्तचं आहे , पौष्टीक आहे :)
नाही. फुंदके नाही. आमच्या कडे खानदेशात फुणकेच म्हणतात.
अग मस्त झाली होती ही रेसीपी. मला वाटल होतं डाळींमुळे जड होइल पण आजिबात नाही. अन चवदार किती म्हणुन सांगु? अगदी तस्सेच उचलुन खायला सुद्धा छान वाटले. मे बी नेक्स्ट टाइम एखादी भाजी मिसळेन त्यात म्हणजे न्युट्रीशीन व्हॅल्यु वाढेल.
धन्यवाद अपर्णा ताई.
मलाही वाफौन जास्त आवडतात. गरम गरम फुणके, कढी. आणि याबरोबरच काण्योले पण केले जातात.म्हणजेच छोट्या पुरी एवढे लाटून पुढे दिलेल्या आकारात घडी घालून फुणके वाफवतानाच वाफून घेणे. व फुणके बरोबर खायचे.