पाककृती

कच्च्या पपईची कोशींबीर / सॅलेड

Primary tabs

Salad

साहित्यः
१. किसलेला कच्चा पपई - १ मध्यम (चित्रात दाखवल्यापेक्षा अजुन बारीक किसता/चीरता आला तर उत्तम)
२. १/२ लिंबाचा रस
३. वरिल लिंबाचीच किसलेली साल - १/२ चमचा
४. सुख्या लाल मिरच्या - २/३ (भरडसर वाटुन) किंवा ओल्या लाल मिरच्या - २ बारिक चीरुन
५. खारे शेंगदाणे मुठभर (सालं काढुन १/२ करुन)
६. चवीनुसार मीठ, साखर किंवा मध
७. कोथिंबीर / पुदिना एच्छिक (बारिक चीरुन)

कॄती:
१. एका बाउल मधे खारे शेंगदाणे सोडुन दिलेलं सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करावे आणि फ्रिज मधे थंड होण्यास ठेवा
२. सर्व करण्याआधी किमान अर्धा-एक तास फ्रिज मधे ठेवा व जेवताना तोंडिलावणे म्हणुन थंडगार आंबट-गोड-तिखट सॅलेड / कोशींबीरीचा आस्वाद घ्या :)
३. आवडत असल्यास ह्यात चेरी टोमॅटो अर्धे करुन घालु शकता
४. खारे शेंगदाणे अगदि आयत्या वेळेस घाला म्हणजे मउ पडणार नाहित

पिंगू

हे सॅलड तर चपातीसोबत खाता येईल.

- पिंगू

मृत्युन्जय

सुंदर. आवडेश. दीपक कुवेत फार झपाट्याने पेठकर काका, सानिकातै आणी गणपभौंना टफ देउन राह्यले ब्वॉ.

रमेश आठवले

गुजरातमध्ये फाफडा हा बेसनापासून तयार केलेला पदार्थ न्याहरी किंवा इतर वेळी खाण्यासाठी लोकप्रिय आहे. सर्व दुकानातून ह्या नमकीन बरोबर कच्च्या पपईची चटणी हमखास दिली जाते

शुचि

अरे हे काँबिनेशन माहीत नव्हते. पण काहीही म्हणा गुजराथी लोकं खवय्येच. घाटकोपरला खाऊगल्लीत पाणीपुरी काय मस्त मिळते.

पैसा

अगदी सोपी आणि झकास पाकृ!

तर्री

असे म्हणता येईल . छायाचित्र सुरेख.
पण कच्चा पपई खावावेल का ही एक शंका . बाकी छान.

रमेश आठवले

papain नावाचे एक enzyme आहे. पपई मध्ये ते असते. त्यामुळे पचनक्रियेस मदत होते. .

जेनी...

दिपक काका .. दीपक काका ...
भारी भारी पाक्रु टाकता ...
दीपक काका ... दिपक काका ...
पण सांगा तरि त्यात काय काय टाकता ???

=))

छाने काका सलाड :)

दिपक.कुवेत

पूजा आज्जी...पूजा आज्जी...(का काकुबै?)
नुसते प्रतीसाद का टंकतेस बाई
काका काका म्हणोनी मजसी...
कसला डाव साधतेस बाई :))

सगळयांचे धन्यवाद...:)