पाककृती

खजूराची चटणी ..(पाणी पुरीसाठी)

Primary tabs

साहित्य:

१) खजूर (बिया काढून)

२) चिंच (जेवढे खजूर घ्याल त्याच्या १/४, जास्त आंबट नको)

३) गूळ (खजूराच्या १/२)

४) चाविपूरत मीठ आणि लाल तिखट

५) चिमूटभर हिंग (हिंगाने चटणीला छान वास येतो)

कृती -

वरील सर्व साहित्य एका पसरट भांड्यात घेवून पाण्याबरोबर जवळपास २०-२५ minutes मंद आचेवर शिजवावे

जेणेकरुन खजूर आणि चिंच एकदम मऊ शिजून निघतील.

थंड झाल्यानंतर mixer मधून बारीक करून घ्यावे...आणि आवश्यक तेवढे पाणी मिसळावे .

झाली खजुराची चटणी तयार.

जास्त झाली तरी Refrigerator मध्ये ठेवू शकता, बरेच दिवस टिकते सॉस- जॅम सारखी.

पाणी पुरी, भेळ पुरीच्या गाड्यावर, गोड चटणी म्हणून वापरतात ती हीच चटणी असते

सौ स्मिता चौगुले

खजूर वापरणे सोईचे ठरेल..खारीक कडक असते, ती शिजायला बराच वेळ लागेल..:)

आणि जर खारीकच वापरायची असेल तर ती ७-८ तास पाण्यात भिजवून वापरली तर चालू शकेल (खारीक वापरण्याचा प्रयोग मी कधी केलेला नाही )

अनामिका

यात काळे मिठ घातल्यास चव अजून छान लागते

अनामिका

असेच काहि नाही चट्णी मधे घातले कि चटणीचा स्वाद उत्तम होतोच आणि चिंचे मुळे आलेला आंबटपणा बाधत नाही

त्रिवेणी

तुम्ही पाणी पुरी घरी करत असाल तर plz त्या पाण्याची ही रेसीपी द्या.
चटणी आवडली.

मी नवीन धागा उघडला आहे आणि त्यात पाणी पुरीची संपूर्ण पाकृ दिली आहे.. :)

प्रियाकूल

फार दिवसापासुन ह्याची पाकृ हवी होती. माझ्या सोलापूरच्या बहिणीनी सांगितली होती पण विसरले होते मी. धन्यवाद.