Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही)

अ — अमोल केळकर, Tue, 02/12/2013 - 11:14
खुप दिवसांनी काही ओळी सुचल्या आणि ते ही कॉपी पेस्ट न करता . अस्सल स्वतःच्या . बघा आवडतात का अल्बम - कॉपीपेस्ट वर बोलू काही मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही मी राईट क्लिक साठी ,कधी माऊस घेतला नाही..... भवताली सतत चाले, ते इंटरनेट बघताना कुणी धाग्यातून चिडताना, कुणी एकट्याने लढताना मी सदस्य होउनी बसलो, फेसबूकवरती जेंव्हा ते पहायला देखील, मग कुणी राहिले नाही..... एकच ब्लॉग मी पाहे, मूळ लेखन जिथल्या तेथे काढूनी प्रिंटही त्याची वेळीच टॅगली पाने पण झोपेतून एकदम, जागच आली नाही कुणी लाईकही केले नाही, कुणी लाईटली घेतले नाही...... काढलेला एकच धागा, चाहत्यांची उलटी मुंडी जालावर अजुनी दिसती, डिलीट पोस्टच्या नोंदी मी सोम्यालाही भ्यालो, मी गोम्यालाही भ्यालो मी मनाशी सुध्दा माझ्या,कधी पंगा घेतला नाही मज जन्म स्थळाचा मिळता, मी ‘याहू’ झालो असतो वाढवायची असती यादी तर ‘हॉटमेल झालो असतो मज डिलीट करता कोणी रडलो वा हसलो नाही मी फॉलो केले नाही अन करुन घेतले नाही अमोल केळकर मला इथे भेटा

प्रतिक्रिया द्या
4586 वाचन

💬 प्रतिसाद (23)
स
स्मिता चौगुले Tue, 02/12/2013 - 12:17 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
स
सुखी Tue, 02/12/2013 - 12:22 नवीन
मी राईट क्लिक साठी ,कधी माऊस घेतला नाही.....
Ctrl+C आणी Ctrl+V पण चालतो हो ;) छान वाटल वाचुन
  • Log in or register to post comments
स
सुखी Tue, 02/12/2013 - 12:22 नवीन
मी राईट क्लिक साठी ,कधी माऊस घेतला नाही.....
Ctrl+C आणी Ctrl+V पण चालतो हो ;) छान वाटल वाचुन
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Tue, 02/12/2013 - 12:23 नवीन
मजेशीर!!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/12/2013 - 12:28 नवीन
मी भरपूर केली कॉपी,मी भरपुर केले पेस्टींग ही कविता तुमची मजला,लै वाटते हो विंट्रेस्टींग ;-) ॥
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 02/12/2013 - 13:18 नवीन
हा हा हा मस्तच सर्वांचे धन्यवाद :) अमोल केळकर मला इथे भेटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
पैसा Tue, 02/12/2013 - 13:39 नवीन
एकदम फ्रेश!
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 02/12/2013 - 14:25 नवीन
कधी काव्यही केले नाही, कधी कथाही स्फुरली नाही, तरीही... दिन एकही न ऐसा आला की, मिसळपाव क्लिकले नाही!!
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 02/12/2013 - 14:57 नवीन
मी सोम्यालाही भ्यालो, मी गोम्यालाही भ्यालो मी मनाशी सुध्दा माझ्या,कधी पंगा घेतला नाही
टू गुड!!!!
  • Log in or register to post comments
प
पप्पु अंकल Tue, 02/12/2013 - 15:13 नवीन
हाउर आंदो
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 02/12/2013 - 16:33 नवीन
मस्तच अमोल! आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 02/12/2013 - 17:03 नवीन
धन्यवाद घाटपांडे साहेब अमोल केळकर आम्हाला इथेही भेटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
त
तर्री Tue, 02/12/2013 - 16:33 नवीन
हया कवितेस " जालीय " संदर्भ आहे से वाटते ! कविता जेथे पेष्ट करायला हवी तिथे झाल्यास उद्रेक होणार . कविता - विडंबन - चिमटे आवडून राहिले.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 02/12/2013 - 17:04 नवीन
:) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 02/12/2013 - 17:03 नवीन
मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही तुझे मिर्ची लगी तो मै क्या करु???????
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 02/12/2013 - 20:32 नवीन
एकदम भारी. :)
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/12/2013 - 20:41 नवीन
एकदम आवडली!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 02/12/2013 - 20:42 नवीन
मी काहिच पहिले नाहि .. मी अजिबात वाचले नाहि =)) भारीये .
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Wed, 02/13/2013 - 08:06 नवीन
विडंबन आवडले.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Wed, 02/13/2013 - 08:13 नवीन
मी सोम्यालाही भ्यालो, मी गोम्यालाही भ्यालो मी मनाशी सुध्दा माझ्या,कधी पंगा घेतला नाही हा हा हा.... जबरी :) :)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 02/13/2013 - 09:40 नवीन
मी सोम्यालाही भ्यालो, मी गोम्यालाही भ्यालो मी मनाशी सुध्दा माझ्या,कधी पंगा घेतला नाही फेसबुक आर्कुट यांचा चेहरा म्हणजे या दोन ओळी आहेत. आता तर पालघर प्रकरणापासून लाईक व अनलाईक करायलाही बोटे थरथरतात !
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/13/2013 - 17:30 नवीन
या चोप्य-पस्तेमधे बुद्धीचे बळ दिसले.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 02/14/2013 - 04:46 नवीन
धन्यवाद काल आलेल्या व्यक्तिगत निरोपात एका रसिकाला नवग्रहांचे बळही दिसून आले :) असो कॉपी पेस्टच्या वृत्ती संगे, युध्द आमचे सुरु जिंकू किंवा मरु सर्वांचे आभार अमोल केळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा