घाई...
बोलायला मनातले
एस.एम.एस. ची सोय नव्हती
रुपया टाकून फोन करु तर
गर्दी होती अवती भवती
नाक्यावरला वाणी होता
दोघांमधला दूत
त्याच्या करवी जमवत होतो
तुझ्याशी मी सूत
वारंवार पावलं तेव्हा
दुकानाकडे वळायची
मी तेथे आल्याची वार्ता
तुला कशी कळायची
काहीतरी निमित्त काढून
तू ही तिथे यायचीस
समोरून येता जाता
वळून गोड हसायचीस
पुढे एकदा चोरुन चोरुन
तयार एक पत्र केले
खात्री होती, ओळखशील तू
म्हणून नांव नाही लिहिले
पत्र द्यायचे धाडस मात्र
नाही करता आले मला
हळून तो लखोटा मग
मी वाण्याच्या हाती दिला
वाण्याने ते पत्र दिले
गुपचुप तुझ्या हाती नंतर
तेव्हापासून वाढत गेले
आपल्या दोघांमधले अंतर
आता आहेस तू वाण्याच्या
दोन मुलांची आई
पत्र देण्या उगीच केली
त्या वेळी मी घाई
💬 प्रतिसाद
(12)
स
स्पंदना
गुरुवार, 02/14/2013 - 03:33
नवीन
लबाड वाणी! तुमच्या पत्रावर नफा कमवलान! तुम्ही काय केलत? निदान दुकान तरी बदललत की नाही?
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 02/14/2013 - 03:54
नवीन
अवघड आहे. :(
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 02/14/2013 - 04:00
नवीन
वाण्याला दिली चिठ्ठी.......वाण्या आपुल्याच गर्लफ्रेंड ला मारतो मिठी
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 02/14/2013 - 04:00
नवीन
शेवटच्या कडव्यात जरा गल्लत झाली, असो इथं प्रश्न विचारले तर फार गोंधळ होईल, त्यात तुम्ही नविन उगा शिव्या खाव्या लागतील.
- Log in or register to post comments
य
यसवायजी
गुरुवार, 02/14/2013 - 08:26
नवीन
वाण्याच्या पोरांची आई एवढं समजलं.. पण शेवटी लग्न कुणाशी झालं?
असं विचारायचंय का तुम्हाला? :D
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 02/14/2013 - 05:25
नवीन
दोघांनी मिळून तुमचा मामा केला असेल
- Log in or register to post comments
श
श्रिया
गुरुवार, 02/14/2013 - 06:49
नवीन
छान रचली आहे हि पण कविता.
एक प्रश्न आहे, त्या झुरळाला घाबरणार्या वेगळ्या का?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 02/14/2013 - 07:33
नवीन
झुरळाला घाबरणारी घरात फवारा घेऊन बसली आहे
- Log in or register to post comments
श
श्रिया
गुरुवार, 02/14/2013 - 07:40
नवीन
ओह आय सी! म्हणजे स्वत:च्या मुलाला यांची मामा म्हणून ओळख करुन देणारी ती हिच होय, मला वाटलं ती तिसरी.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 02/14/2013 - 07:47
नवीन
...अजून बाकीच्या यायच्या आहेत
- Log in or register to post comments
श
श्रिया
गुरुवार, 02/14/2013 - 08:01
नवीन
म्हणजे इथल्याच एका कविच्या शब्दांत सांगायचे झाले तर हे कवी "इश्कबाज" होते असे वाटते. (क्रु.ह.घे.)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 02/14/2013 - 08:15
नवीन
सोलो साँग आहे
- Log in or register to post comments