समजत नाही...
प्रेरणा - http://www.misalpav.com/node/23918
क्रांतीतैची परवानगी घेउन हा प्रयत्न सादर करत आहे,मला गझलच काय कविता सुद्धा करता येत नाही,तरीसुद्धा पण हा एक प्रयत्न , मुड बदलाचा.
त्या दोन आसवांना मज हुलकावयास आले
आनंदले एवढे की त्याचे अश्रु टाळता न आले
सलावे काटे दु:खाचे, कितीदा मनात आले
कमलवेलींतुन सुखांच्या मज निसटता न आले
निंमिषात नाती अतुट भंगली आरश्यापरी
निमिषात कवड्श्यांच्या रंगात दंगले मी
जगण्याचा मुखवटाच फसवा,जेंव्हा कळाले मला
मृत्युच्या उत्तुंग क्षणाची वाट पाहणे आवडले मला
अनुकुलता प्रतिकुलता हे व्दंद पाहिजे टाळले
सूचना अन आर्जवांचे गजरे मी हरदिनी माळले
असण्याहुनी सुखाचे नसणेच असावे ठीक
सुख भोगुनी वाटताना मज हे ब्रम्हज्ञान झाले
या सागरी सुखाच्या लाटा अमाप उठती
ना नव्या ना जुन्या वेदना सांभाळणे न जमले.
हा नव्हे प्रयत्न विडंबनाचा माझा खरेच आहे
पा-याची टा़ळुन बाजु मी आरशांत पाहे.
५० फक्त....
💬 प्रतिसाद
(21)
स
स्पा
गुरुवार, 02/14/2013 - 10:42
नवीन
चान चान
- Log in or register to post comments
न
नानबा
गुरुवार, 02/14/2013 - 10:45
नवीन
जाम भारी... :)
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 02/14/2013 - 11:14
नवीन
बात जमीं नहीं।
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 02/14/2013 - 11:16
नवीन
५० रावचे लिखाण काव्य विभागात बघितले आणि जरा आश्चर्यच वाटले.
पण तुम्ही चांगलाच धक्का दिलात ५० राव
व्वाह!!
ते वृत्तबित्त मरु दे तिकडे, पण काय सही मांडणी केलीये, वाह.
अजुन लिहा ओ.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/14/2013 - 11:18
नवीन
हे नसतं तरी चाल्लं असतं. बाकी कविता चांगली आहे, तुम्ही मनावर घेतल्यास कथांची सफाई यातही येईल हेवेसांनल.
- Log in or register to post comments
इ
इनिगोय
गुरुवार, 02/14/2013 - 12:12
नवीन
वेगळाच अॅटिट्युड! चांगलं जमलंय :)
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 02/14/2013 - 12:16
नवीन
काही कडवी मस्तच !
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 02/14/2013 - 12:30
नवीन
भावना चांगल्या प्रकारे व्यक्त झाल्यात. वृत्त आणि छंद ही काहीशी कारागिरी म्हटली तरी चालेल. तालात म्हणून बघ. तुलाच जास्त योग्य शब्द सुचतील.
- Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा
गुरुवार, 02/14/2013 - 12:50
नवीन
तरीही उत्तेजनार्थ मात्र नक्किच दिला पहिजे... तुमच्या ओरिजनल कवितांच्या तिव्र प्रतिक्षेत.
क्रांतीतैंच्या लिखाणाची बातच और आहे |
५० फक्त मात्र शब्द योजुनी प्रतिभा वाहे...||
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 02/14/2013 - 13:17
नवीन
मस्त ओ ५०,
बाकी ती कथामालिका का उगा अडवून ठेवलीय? लवकर येऊ द्यात पुढचे भाग.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/14/2013 - 13:29
नवीन
+१००००००००.
लौकर लौकर!!!
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 02/14/2013 - 20:19
नवीन
मी काय म्हन्तो वल्ली...
कुणी कुणी कोणते कोणते लेख अपुरे ठेवलेत त्याची यादी करूया का रे..?
सुरुवात ब्याटम्यानापासून.. ;-)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/14/2013 - 20:27
नवीन
हरामी मोदक!!!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 02/14/2013 - 20:31
नवीन
क्रमश: लिहायला विसरलास बॅट्या ;)
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 02/14/2013 - 20:35
नवीन
:-))
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
गुरुवार, 02/14/2013 - 16:47
नवीन
छान जमली आहे कविता.
जगण्याचा मुखवटाच फसवा,जेंव्हा कळाले मला
मृत्युच्या उत्तुंग क्षणाची वाट पाहणे आवडले मला
अनुकुलता प्रतिकुलता हे व्दंद पाहिजे टाळले
सूचना अन आर्जवांचे गजरे मी हरदिनी माळले
असण्याहुनी सुखाचे नसणेच असावे ठीक
सुख भोगुनी वाटताना मज हे ब्रम्हज्ञान झाले
हे खासच लिहिलं आहेस!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 02/14/2013 - 16:54
नवीन
अरे वा. कविता आणि चक्क पन्नासरावांची. मस्तच
एकदम छान जमलीय दादा.
अजून येऊ दे. :)
- Log in or register to post comments
ज
जेनी...
गुरुवार, 02/14/2013 - 16:54
नवीन
५० रु . याच्या क्षमतेला काय झालय ???
मला तरि निदान हि कविता कम गझल बोर्डावर टाकण्या इत्पत रुचली नाहि .
५० फक्त तुमच्याकडनं अजुन चांगल्या अपेक्षा आहेत ओ ...
- Log in or register to post comments
ध
धन्या
गुरुवार, 02/14/2013 - 16:59
नवीन
पण त्यातल्या भावना मात्र नक्कीच भावल्या. :)
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 02/14/2013 - 18:46
नवीन
आपल्याला तर आवडली ब्वॉ ही कविता.
तेवढं ते कथेचंही मनावे घ्या जरा.
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
गुरुवार, 02/14/2013 - 20:25
नवीन
विरक्तीकडे वाटचाल ?
- Log in or register to post comments