Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्दचित्र (व्हॅलेंटाईन डे स्पेश्शल!)

म — मिसळलेला काव्यप्रेमी, गुरुवार, 02/14/2013 - 11:27
आजही माझा तिचे शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न चालू होता अगदी नेहमीसारखेच आजही मी तसाच भांबावून नि:शब्द होतो अगदी नेहमीसारखेच कोणी किती गहरे असावे? किती अलंकार शोधावे उपमांसाठी किती वृत्ते धुंडाळावी लयीसाठी कुठून आणावे रंग तुझे भाव रंगवण्यासाठी कसे जमवावे शब्द तुला मांडण्यासाठी न कळे हे नेमके माझेचं असे कां व्हावे? दरवेळेस मी इरेला येतो तुला कागदावर उतरवायला सरसावतो लेखणीतून झरझरून हळवे शब्द पाझरतात क्षणाक्षणाला मी तुझे शब्दचित्र पूर्णत्वाकडे घेऊन जातो मनाचे समाधान होईतो रेखाटून घेतो अन् परत एकदा खात्री करण्यास तुझ्या डोळ्यात पाहतो नेहमीसारखेच . . आता पुन्हा मी भांबावलेला पुन्हा नि:शब्द नाही नाही म्हणता, तुझ्या डोळ्यातील काही छटा परत निसटल्याच हम्म... हे ही नेहमीसारखेच अगदी नेहमीसारखेच |-मिसळलेला काव्यप्रेमी -| (१४/०२/२०१३)

प्रतिक्रिया द्या
3701 वाचन

💬 प्रतिसाद (14)
इ
इनिगोय गुरुवार, 02/14/2013 - 12:10 नवीन
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 02/14/2013 - 18:27 नवीन
+१ असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय
त
तिमा गुरुवार, 02/14/2013 - 14:45 नवीन
पण मिका, नेहमीसारखी मजा आली नाही. कदाचित माझंच वय झालंय म्हणून असेल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 02/14/2013 - 14:57 नवीन
मला आवडली रे मिका. एकदम जमलीय. माझ्यासाठी
तुझ्या डोळ्यातील काही छटा परत निसटल्याच
हे तर नेहमीचेच :( बहुतेक आजचा दिवस पण निसटतोय. :(
  • Log in or register to post comments
ज
जेनी... गुरुवार, 02/14/2013 - 17:01 नवीन
:( अब्या माझ्या या स्मायलीनं गैरसमज नको करुन घ्यु बर्का :-/ :P :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
क्रान्ति गुरुवार, 02/14/2013 - 16:52 नवीन
आवडली कविता. थोडा वेगळा अर्थ असला तरी हे आठवलं. :)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... गुरुवार, 02/14/2013 - 17:04 नवीन
आय डोन्नो ... बट मिका ही कविता आणि घर दोन्हिहि नाहि जमल्या :( कदाचित मी तुमच्याकडुन आणखी खुप अपेक्षा ठेवुन असेल कदाचित .. पण क्रांति आणि मिका म्हटलं कि माझ्याकडुन आपोआप वाचलं जातं सो खरी प्रतिक्रिया द्यायला मनापासुन आवडतं ... राग आला असेल त रागावुन आणखी काहितरि चटपटित वाचायला द्या ... :-/
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 02/14/2013 - 17:25 नवीन
क्रांती आणि मिका यांच्या कविता अप्रतिम असतातच. अपेक्षा पण असणारच पूजा, पण एखादे चित्र आणि ते पण प्रत्यक्षातले, मनातले आणि उतरवलेले या प्रवासातली विफलता मला तर जाणवली. ते चित्र शब्दात असो की रंगात, आशय अनुभवल्यानं भिडला मनाला. एवढंच. बाकी तुला चटपटीत वाचायला भरपूर खाद्य आलय बघ सध्या नवीन नवीन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ज
जेनी... गुरुवार, 02/14/2013 - 17:33 नवीन
अब्या तुला भिडणारच .. तु त्यात तुझी चित्रकला डोळ्यासमोर धरुन त्यात रंग भरत गेलास ... पण मला चित्र काढता येत नैत ना :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/14/2013 - 19:31 नवीन
हम्म... हे ही नेहमीसारखेच अगदी नेहमीसारखेच >>> Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 02/15/2013 - 02:19 नवीन
सापडुन ही न सापडल्यासारखी, मनात उतरुनही समाधान न देणारी वाटे काटे असतानाही साथ देणारी, फुलामुलांच्या संगती साद देणारी अशी अचानक फुलत जाते, जशी पावशी(पावसात) वेल न्हाती रुक्षपणीही, तशीच ताजी जखमांची साथी का गे कविते तु न रहाशी सदा शेजारी भटकत जाते, कडी कपारी, कधी बाजारी.
  • Log in or register to post comments
फ
फिझा Fri, 02/15/2013 - 07:13 नवीन
कविता आवडली !! शेवटचे कडवे विशेष छान आहे .....पण व्हेलेन्ताइन डे साठी कविता लिहिण्याचा हा अट्टाहास आहे का.... किंवा तशी डिमांड होती का म्हणे !!!!
  • Log in or register to post comments
उ
उर्जिता Fri, 02/15/2013 - 07:27 नवीन
मस्त.. छान, विशेषतः अन् परत एकदा खात्री करण्यास तुझ्या डोळ्यात पाहतो.. ही ओळ आवडली..
  • Log in or register to post comments
उ
उर्जिता Fri, 02/15/2013 - 07:27 नवीन
मस्त.. छान, विशेषतः अन् परत एकदा खात्री करण्यास तुझ्या डोळ्यात पाहतो.. ही ओळ आवडली..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा