पाककृती

व्हॅलेंटाईन डे स्पेशल चॉकलेट केक

Primary tabs

पॅनकेकसाठी साहित्यः

मैदा - १ कप
पिठीसाखर - ४ चमचे
अंडी - २
दुध - १/२ कप
बेकिंग पावडर - १ टि-स्पुन
बटर - २ चमचे (पातळ करुन)
व्हॅनिला इसेन्स - १/२ चमचा
मिठ - १/२ छोटा चमचा

क्रिम आईसिंगसाठी साहित्यः

फ्रेश क्रिम - १ कप
कोको पावडर - १/२ कप
पिठीसाखर - १/२ कप
व्हॅनिला इसेन्स - १/२ चमचा

सजावटीसाठी:

चॉकलेट फ्लेक्स - १ कप
चॉकलेट ट्रफल्स - ४-५
पिठीसाखर - १ चमचा

कृती:

१. पॅनकेक साठी सर्वात आधी बटर वितळवुन घ्यावे.
२. एका बाउल मधे मैदा, पिठीसाखर, मिठ व बेकिंग पावडर मिक्स करावे. दुसर्‍या बाउल मधे अंडी, बटर, दुध व व्हॅनिला इसेन्स मिक्स करुन घ्यावे.
३. आता मैदा व अंड्याचे मिश्रण एकत्र करुन १ तास बाजुला ठेवावे.
४. १ तासाने, तयार मिश्रणाचे पॅनमधे थोडे बटर लावुन १५-२० पॅनकेक करुन घ्यावेत.
५. हे सर्व पॅनकेक गार करण्यासाठी ठेवुन द्यावे.

ktj

१. आता चॉकलेट क्रिम साठी एक मोठे पातेले घेउन त्यात १०-१२ बर्फाचे क्युब्स टाकावेत. त्याच्यावर एका बाउल मधे फ्रेश क्रिम, साखर, कोको पावडर व व्हॅनिला इसेन्स टाकुन egg beater ने २-३ मिनिटे beat करावे.
२. आइसिंग साठी क्रिम तयार आहे.
३. केक करण्यासाठी, सर्व पॅनकेक एखाद्या बशी किंवा वाटीने सारख्या आकारात गोल कापुन घ्यावेत.
४. डिश मधे एक पॅनकेक ठेवावा. त्यावर चॉकलेट क्रिम लावुन, वरती दुसरा पॅनकेक ठेवावा.

lfkh

५. अशाप्रकारे सर्व पॅनकेक व क्रिमचे लेयर लावुन घ्यावेत. सगळ्यात शेवटी, उरलेले क्रिम, केकला सर्व बाजुंनी लावुन घ्यावे.

ir

६. केकला बाजुने हलक्या हाताने चॉकलेट फ्लेक्स लावुन घ्यावेत. वरतुन चॉकलेट ट्रफल्स व पिठीसाखरेने सजवावे.
७. केक फ्रिज मधे ३-४ तास गार करण्यासाठी ठेवुन द्यावा.
८. व्हॅलेंटाईन स्पेशल चॉकलेट केक खाण्यासाठी तयार आहे.

टिपः

१. बॅटर जास्त thick झाल्यास, तुम्ही दुधाचे प्रमाण वाढवु शकता.
२. तुम्ही ज्या डिश मधे केक present करणार असाल, त्याच डिश मधे पॅनकेक्सचे लेयर लावावेत. एकदा लेयर लावुन झाल्यावर केक उचलुन, दुसर्‍या प्लेट मधे ठेवायला खुप अवघड आहे.. त्यामुळे त्याच डिश मधे लेयर लावुन, सगळ्यात शेवटी टिश्यु पेपरने बाजुने साफ करावे.
३. आवडत असल्यास तुम्ही लेयरच्या मधे स्ट्रॉबेरी किंबा राजबेरी देखिल वापरु शकता.

fdl

iuhn

itoyu

तुमच्या व्हॅलेंटाईन सोबत केक enjoy करा. ;)

जेनी...

ऊ लालाला ... :)

मस्तच ... तो शेवटचा फोटो तर खरच वॅलेन्टाइन स्पेशल आहे ...

टू गूड यार म्रुनालिनि ...

हॅप्पि वॅलेन्टाइन डे डीअर :)

सूड

कसले भारी दिसतायेत लेयर्स !!

जेनी...

एक्झॅक्ट्ली .. ते लेयर बघुनच " हाये " निघाला तोंडातुन ....

जालिम फोटो दीलेत सगळेच .

अभ्या..

एकदम ग्राफीक केक झालाय मृणालिनी. :)
मॅक्स किंवा मायामध्ये करुन बघितलास की काय आधी? ;)
मस्तच. :)

Mrunalini

हा हा हा!! धन्यवाद... केक आवडल्या बद्दल.
नाही रे.. मॅक्स किंवा माया मधे केक तरी कधीच नव्हता बनवला. वाईनचे ग्लास खुप बनवले होते. ;)

पिंगू

कसला क्लास केक आहे. व्हॅलेंटाईनचा दिवस सत्कारणी लागला म्हणायचा..

- पिंगू

मां कसम... मी कधी असल्या पाककृतीच्या धाग्यात घुसत नाही.. पण धाग्याच्या नावात वॅलेंटाईन वाचून क्लिकले तर आईशप्पथ.. हा केक पाहून माझ्या मनात उत्पन्न झालेल्या भावना तुम्हाला समजाव्यात म्हणून एवढेच सांगतो की लग्न झाल्यापासून आजवर गेल्या दोन वर्षात बायकोने बावीस वेळा केक बनवला असेल पण पुर्ण संपवला एकदाही नाही गेला.. बावीसपैकी चौदा वेळा कावळेही हरले..

आपण टाकलेल्या केकचे फोटो निव्वळ अ प्र ति म.. :)

किसन शिंदे

फोटो तर काय दिसत नैय्येत, पण आता सगळे म्हणताहेत म्हणजे नक्कीच भारी असणार.

जेनी...

=))

भन्नाट स्मायलीये गुर्जि ....

Mrunalini

खरच... कुठुन कुठुन शोधुन काढतो हा अशा स्माईली??

५० फक्त

ते यज्ञ करतात यासाठी, ट्रेड सिर्केट आहे ते.

रेवती

अरे देवा! केकचा हा प्रकारही अफलातून आणि मस्त आहे.
तू आणि सानिका यांचे किती कौतुक करावे तेवढे थोडेच!
एका कल्पनेपलिकडल्या केकशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

शुचि

वा मस्त आहे केक. कौतुक आहे.

मीनल

असा केक करू शकतो असा विचार ही कधी मनात आला नव्हता.
खूप छान!!!

शिद

केक बनविण्याची नविन पद्धत आवडली.

ऋषिकेश

अरेच्या कोणतेही 'बेकिंग' न करता इतका उत्कृष्ट केक करता येईल असे वाटले नव्हते.
घरी ओव्हन नसणार्‍यांनाही ट्राय करता यावा. मस्तच!

चेतन माने

च्यामारी ! भलताच जबरदस्त केक आहे, लय लय आवडला बघा :) :) :)

धनुअमिता

कसला शॉल्लिड दिसतोय केक
असे वाटते कि उचलून लगेच खावून टाकावा. नक्की करुन बघणार.

स्मिता.

पॅनकेक्सचा केक! आयडिया खूप आवडली.
आणि फोटोबद्दल तर काय बोलावं... निव्वळ अप्रतिम.

जयवी

आई गं.......कसला कातिल आहे गं केक........ :)

स्पा

बाबो

काये हे???

मी खप्याच !!!!!

प्यारे१

मिसळपाव हे पाकृ दहशतवादाचं ट्रेनिंग सेंटर आहे नि त्यावर आम्ही लवकरच कारवाई करु...

- प्यारेलकुमार शिंदे.
(५० रावांच्या प्रतिक्रियेशी सहमत -प्यारे)

मिसळपाव खाद्योत्सव ठेवा रे कुणीतरी!

nishant

मिसळपाव खाद्योत्सव ठेवा रे कुणीतरी

+१

दिपक.कुवेत

शेवटचा फोटो बघुनच खल्लास! विदाउट ओव्हन एकदम बेष्ट रेसीपी.....नक्किच करुन बघिन. पण चॉकलेट क्रिम/आयसींग ला काहि पर्याय म्हणजे कमी गोड असं?

Mrunalini

एकदम सोप्पा पर्याय म्हणजे... तुम्ही चॉकलेट क्रिम करायची नसेल तर, न्युटेला वापरु शकता... किंवा ते पण नसेल तर नुसते मेपल सिरप आणि स्ट्रॉबेरीज किंवा फळांचे तुकडे देखिल वापरु शकता.

दिपक.कुवेत

हा पर्याय मस्त आहे....करुन पाहिन. धन्यवाद मॄणालीनी.

सस्नेह

सुरेख प्रेझेंटेशन ! नक्की टेस्टी असणार !

Mrunalini

२ अंडयान ऐवजी २ पीकलेली केळि घालुन पॅनकेक होऊ शकतो :)