Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Fri, 02/15/2013 - 05:38
पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता...।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालदिवा” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं
मंग म्हणान माही तलवार अशी काही चालली
एका हिसक्यात सारी सेना धारातिर्थी पाडली
पायापोटी औरंगजेब माह्या पडत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

रावणानं सीता चोरून लंकेमंधी नेली
तळपायीची आग माह्या मस्तकात गेली
तोडून त्याचे नऊ तोंडं, मी संग घेऊन आलो
पण; तवापासून मीच “अभय” दहातोंड्या झालो
काय करू, काय नाही; मले समजत नाही आता
अन्
सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता... ॥

                                            - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
4851 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
पैसा Fri, 02/15/2013 - 05:55 नवीन
वर्‍हाडीतला तडका आपल्याला लै आवडला!
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 02/15/2013 - 05:57 नवीन
ऐला, काय भारी प्रकार आहे हा.. जाम आवडला..
  • Log in or register to post comments
ब
बापू मामा Fri, 02/15/2013 - 08:51 नवीन
मुटे जी, आगे बढो.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/15/2013 - 11:06 नवीन
सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता... ॥ भारीच!!!
  • Log in or register to post comments
त
तर्री Fri, 02/15/2013 - 11:55 नवीन
मुटे साहेब - बेष्ट एकदम.
  • Log in or register to post comments
श
श्रिया Fri, 02/15/2013 - 17:30 नवीन
एकदम फक्कड आहे हि कविता.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 02/15/2013 - 19:36 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 02/15/2013 - 19:40 नवीन
मुटे काका डेंजरचे तुमी तर ..... भारी तडका .....
  • Log in or register to post comments
च
चिगो Sat, 02/16/2013 - 10:31 नवीन
जबराट कविता, मुटेसाहेब..
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 02/16/2013 - 10:36 नवीन
खूप मस्त कविता...! सामान्य माणसाच्या मर्यादा नि त्याचा रागच जणू स्पष्ट झाल्यात
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 02/16/2013 - 10:48 नवीन
लई भारी. तुमची "बिपाशाले लुगडं" पण आपल्याला जाम आवल्डी होती :-)
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 02/16/2013 - 14:18 नवीन
वा! मजा आली.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Sat, 02/16/2013 - 15:41 नवीन
खल्लास.... :)
  • Log in or register to post comments
स
सुधीर Sun, 02/17/2013 - 04:56 नवीन
वर्‍हाडीतला तडका धमाल आहे.
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ आपटे Sun, 02/17/2013 - 06:40 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sat, 02/23/2013 - 05:56 नवीन
 नागपुरी तडका - ई पुस्तक
               ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे या प्रकाशनसंस्थेने "नागपुरी तडका" हा माझा Online कवितासंग्रह आज प्रकाशीत केलाय, त्याबद्दल मी "ई साहित्य प्रतिष्ठान" चमूचा आभारी आहे.                                                                               *  *  *  *
Image removed. PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता चित्रावर क्लिक करा. प्रकाशकाचे दोन शब्द
                          मराठी अमृताहून गोड भाषा. पण तिच्या ग्रामीण बोलींना जो गोडवा, तजेला आणि मसालेदार झणझणीत तडका आहे तो पुस्तकी शहरी मराठीत नाही. कोकणची खुमासदार मालवणी घ्या किंवा कोपरखळ्या मारणारी अहमदनगरची नगरी , सणसणीत गोळीबंद आगरी किंवा मिठ्ठास खानदेशातली अहिराणी. गांवोगांवच्या या भाषांची मज्जाच न्यारी. अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर तांबड्या रश्शासारखी. ज्यांनी अशा भाषांतून व्यवहार केला नाही ते कमनशीबीच. या भाषा म्हणजे अस्सल संस्कृतीची खाण आहे. त्यामुळे आज वऱ्हाडी भाषेतल्या या कवितांची मेजवानी तुमच्यासमोर आणताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. 
                          पण गंगाधर मुटे यांच्या नागपुरी तडक्यात केवळ भाषेचा फ़ुलबाग नाही. काळजाची आग आहे. उपाशी शेतकऱ्याच्या पोटात खवळणाऱ्या अॅसिडमधल्या या कविता आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अत्महत्यांवर अश्रू गाळणारं भरपूर लिखाण आजवर झालंय. “बिचारा शेतकरी” असंच विदर्भातल्या शेतकऱ्याचं वर्णन इतर लेखक कवी करतात. मनापासून त्यांना त्याच्या दुःखाची संवेदना जाणवते यात वाद नाही. पण गंगाधर मुटेंच्या कवितेत हाच शेतकरी हात पसरून नाही तर मुठी वळून येतो. वाकून नाही तर ताठ मानेने येतो. गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागतो. त्यांची जनता बिचारी नाही तर विचारी आहे. आणि ती अविचारी होण्यापुर्वी पिळणाऱ्यानी आणि गिळणाऱ्यानी सावध व्हावे असा इशारा ती घेऊन येते. त्यांचा शेतकरी “खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालणाऱ्या” पुढाऱ्यांना खणखणीत दणके घालणारा आहे. 
                          गंगाधरजींच्या कविता मरगळलेल्या शेतकऱ्याला स्फ़ूर्ती देणाऱ्या आहेत. या कविता केवळ आरामखुर्चीतलं वाचन नाहीत. भविष्यकाळाला घडवण्याची ताकद असलेल्या जनसंमर्दाला झोपेतून जागं करणाऱ्या आहेत. आपल्याला त्या नक्की आवडतील.
PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता येथे क्लिक करा.
----------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
स
सुधीर Sat, 02/23/2013 - 07:52 नवीन
चांगला उपक्रम. आपल्या उपक्रमास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sat, 02/23/2013 - 06:43 नवीन
मस्तच तडका, आणि हो अभिनंदन तुमचे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 02/23/2013 - 11:54 नवीन
शुभेच्छा आणि अभिनंदन!
  • Log in or register to post comments
अ
अधिराज Sat, 02/23/2013 - 12:25 नवीन
भारी आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा