Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दारवा....

प — पक पक पक, Sat, 02/16/2013 - 18:23
आज जरा जास्तच झाली आहे असे रोज बार मधे बिल आल्यावर वाटते,फक्त चार पेग लावुन देखील दोन तासांत ते शेट्टी हराम्खोर फारच लुट्तय , तरी बोटे चालतात नोटा मोजायला पण बिल वाचायला डोके मात्र चालत नाही , back ground मध्ये गोंगाट अन शिव्यागाळी शिवाय काहीच ऐकु येत नाही, तितक्यात बायकोचा फोन येतो, संध्याकाळी भाजी आणायला बाहेर पड्लास आता गिळायला तरी येणार आहेस का म्हणून आवाज कारदावतो, रागाचा माझ्या हि तिथेच असाच पारा चढतो. (मग वेटर देखिल ९० अन ६० ची सोय करुन जातो ;) ) मन हे नुसते सोड्याच्या फेसा सारखे उसळत असते, भविष्याच्या विचाराने अंधारलेल्या प्रकाशात डचमळ्त असते, वेटर पुढे पैसे फेकुन सुरू होतो उद्याच्या खर्चाचा ताळ्मेळ, विचार करता करता घरी पोहचून मी वाजवते घराची बेल, दरवाजा उघडता पिल्लू येते धावत, पायाला मिठी मारून करते गोड माझे स्वागत, घेता त्याला मिठीत जिव माझा जळ्तो ,अन तेच मन विचारत रहाते " तु असं का करतो....तु असं का करतो... "

प्रतिक्रिया द्या
2336 वाचन

💬 प्रतिसाद (15)
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/16/2013 - 18:38 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Sat, 02/16/2013 - 19:22 नवीन
बार बदलुन बघा बरं काही फरक पडतो का ते ?
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Sun, 02/17/2013 - 03:38 नवीन
आज बघतो.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 02/17/2013 - 04:58 नवीन
बार बदलण्या पेक्षा घरीच घेणे सुरु करा. स्वस्त पडेल, बायकोच्या हातचा गरम गरम चखणा पण मिळेल आणि पिल्लु जवळ पास घुटमळत राहील त्यालाच ग्लास मधे सोडा ओतायला सांगायचा. बॅकग्राउंडला गोंगाट आणि शीव्यागाळी चालुच असेल बायकोची.शिवाय जेवणाची वेळ चुकणार नाही, गरम गरम जेवण आणि फोनचे बीलही वाचेल. तुमच्या बद्दल सहानुभूती वाटली म्हणुन सुचवले हो. बघा करुन पटले तर. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 02/17/2013 - 05:00 नवीन
बार बदलण्या पेक्षा घरीच घेणे सुरु करा कोणती गावठी,की देशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
पक पक पक Sun, 02/17/2013 - 05:10 नवीन
सहानुभुती पुर्वक सल्ल्या बद्द्ल धन्यवाद... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
पक पक पक Wed, 02/20/2013 - 03:58 नवीन
पैजारबुवा 'घरात बसुन घेतल्याचा फायदा झाला .. ;) अजुन एक टंकल आहे 'सुरुवात... ' कस वाट्ल ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
श
श्रीरंग_जोशी Sun, 02/17/2013 - 05:05 नवीन
त्रिपकराव - दंडवत स्विकारा... अवांतर - अशा लेखनावर वैधानिक इशारा देणे विसरू नका हो... संसारा उध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू...
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sun, 02/17/2013 - 05:43 नवीन
त्या पेक्षा घराजवळचा बघावा, काव्याचा ( की गद्यकाव्याचा) शेवट थोडा हळवा आहे.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 02/20/2013 - 06:11 नवीन
उगाच विडंबनासाठी विडंबन केल्यासारखे वाटले. येवढे प्रश्न पडतात / त्रास ज्यांना होतात त्यांनी दारुच्या नादाला लागुच नये. साला तुमच्या सारख्या लोकांसाठी दारु बनलेलीच नाही. दारुवर कसे नितांत प्रेम करावे.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Wed, 02/20/2013 - 08:44 नवीन
आयला ! परा महाराज , अहो हे तुम्हाला काय माझ आत्मचरित्र वाट्ल का काय..? :) बाकि आमच देखील दारुवर नितांत प्रेम आहे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सासुरवाडीकर Wed, 02/20/2013 - 21:00 नवीन
' देशी ' बजेट मध्ये बसेल
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Sat, 02/23/2013 - 12:55 नवीन
काय बोलू, सुचेनाच …।
  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 02/23/2013 - 13:01 नवीन
मैने पिना सिख लिया मैने जिना सिख लिया पाप कहो या पुन्य कहो मैने पिना सिख लिया
  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 02/23/2013 - 13:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा