Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वतंत्र

अ — अत्रुप्त आत्मा, Sun, 02/17/2013 - 16:35
शब्दांनी सजवित जावे वृत्तांचा ना हव्यास मज वाटे कविता झाली असतो रचनेचा भास मी नाही कुठला पंथी मज नकाच कोठे जुंपू कुणी शोधित जाती खांब मी माझा नाथ स्वयंभू ही माझी स्वतंत्र रचना हे माझे निराळे कूळ तुंम्ही अर्थ शोधुनी जाता तरी गवसत नाही मूळ एकाकी या वळणावर मी पुढे चालतो आहे. शब्दांचा नाजुक गजरा मी मनी माळितो आहे. मज ठाऊक नाही पुढती असणार कोठचे गाव? नसतात तेथल्या गावी कुणी राजा आणिक राव शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जाई जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही...

प्रतिक्रिया द्या
7154 वाचन

💬 प्रतिसाद (40)
प
प्रचेतस Sun, 02/17/2013 - 16:58 नवीन
खूप सुंदर
मज ठाऊक नाही पुढती असणार कोठचे गाव? नसतात तेथल्या गावी कुणी राजा आणिक राव शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जाई जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही...
सुरेखच झालीय रचना.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 02/17/2013 - 16:59 नवीन
एकाकी या वळणावर मी पुढे चालतो आहे. शब्दांचा नाजुक गजरा मी मनी माळितो आहे.
मस्त!
  • Log in or register to post comments
J
jaypal Sun, 02/17/2013 - 17:03 नवीन
ह्या ओळी वाचुन मी (अजुन) सावरलो नाही >>>> कुणी शोधित जाती खांब मी माझा नाथ स्वयंभू
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Sun, 02/17/2013 - 17:37 नवीन
>> कुणी शोधित जाती खांब >> Image removed. ;) ----- बाकी कविता मस्त..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
ध
धन्या Sun, 02/17/2013 - 19:17 नवीन
गुरुजी (की गुरुची?) विदया गुरुलाच वगैरे वगैरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Sun, 02/17/2013 - 19:26 नवीन
>> गुरुजी (की गुरुची?) विदया गुरुलाच >> परतीक्रिया - अ‍ॅज एक्स्पेक्टेड.. ;) गुर्जी रागावू नका बर्का..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
पैसा Sun, 02/17/2013 - 17:09 नवीन
छानच लिहिलंत बुवा!
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Sun, 02/17/2013 - 17:09 नवीन
एकाकी या वळणावर मी पुढे चालतो आहे. शब्दांचा नाजुक गजरा मी मनी माळितो आहे.
सुरेख रचना
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 02/18/2013 - 02:40 नवीन
हेच बोल्तो की बुवा लगे रहो ! बाकी बुवा, माळितो की माळतो ? ( बुवा , स्वस्थ बसवत नाही हो ! - आग्या वेताळाचा दोस्त .)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या
ज
जेनी... Sun, 02/17/2013 - 17:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Sun, 02/17/2013 - 17:48 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 02/17/2013 - 17:51 नवीन
छान जमलीये कविता.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 02/17/2013 - 18:45 नवीन
छान गुर्जी. विदाऊट स्मायल्या आलात. जरा चुकल्याचुकल्यासारखे वाटले. पण छान जमलेय. असेच लिहा (विदाऊट चित्राला विचित्र म्हणले तर चालते का हो, म्हण्जे सचित्रच्या उलट)
  • Log in or register to post comments
म
मन१ Sun, 02/17/2013 - 19:03 नवीन
काव्यात एक गेयता आहे. आम्हाला मराठिच्या पाठ्यपुस्तकात "घननीळ सागराचा घननाद येत कानी" अशी सुरुवात असनारी एक कविता होती. ही अगदि त्याच मीटारमध्ये आहे. आवडली.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 02/18/2013 - 13:18 नवीन
घननीळ सागराचा घननाद येत कानी घुमती दिशादिशात लहरींमधील गाणी चौफेर सुर्यज्वाळा वारा अबोल शांत कोठे समुद्रपक्षी गगनी फिरे निवांत आकाश तेजभारे माडांवरी स्थिरावे भटकी चुकार होडी लाडात संथ धावे वाळुत स्तब्द्ध झाला रेखाकृती किनारा जवळी असुन पाणी अतृप्त तो बिचारा जलधी बरोबरीचे आभासमान नाते त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे सानिध्य सागराचे आकाश पांघराया परी साथ ना कुणाची अस्तित्व सावराया
छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
च
चौकटराजा Tue, 02/19/2013 - 05:24 नवीन
लिहिलेली तुम्ही कविता एक संथ सूर आहे ! पाणी " आत्म्या" पासूनी परि फार दूर आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/19/2013 - 07:36 नवीन
@पाणी " आत्म्या" पासूनी परि फार दूर आहे ! >>> =)) छान , डुबवा आंम्हाला अता ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ध
धन्या Sun, 02/17/2013 - 19:21 नवीन
बुवा कविता नक्की तुम्हीच लिहिली आहे ना? की कुणी भाडयाने (म्हणजे पैसे घेऊन) तुमच्यासाठी लिहिली आहे? तुमच्या आजवर प्रसवलेल्या कवितांपेक्षा ही पुर्णपणे वेगळी आहे. आणि हसर्‍या बाहूल्या नसल्यामुळे छान वाटतंय :)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 02/17/2013 - 19:30 नवीन
लिहीत रहा!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 02/18/2013 - 02:23 नवीन
मस्त हो आत्मुस! कवितेतल्या वर्णनावरुन मला "मिका" ची आठवण आली. फार छान लिहिलंत आत्मुस! सुरेख कविता. ते खांबाच कडव जरा गंडलय तेव्हढ सुधारा.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 02/18/2013 - 02:35 नवीन
सुरेख रचना आहे !!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 02/18/2013 - 03:31 नवीन
शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जावे जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही
बास, कविने फक्त इतकेच करावे, बाकी कविता करवून घेतेच. :) मस्त झालीये.
  • Log in or register to post comments
फ
फिझा Mon, 02/18/2013 - 03:56 नवीन
आवडली कविता !!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/18/2013 - 04:35 नवीन
बुवा, मस्तच....... एकदम शॉक ट्रीटमेंट... कविता वाचल्यावर लेखकाच नाव परत एकदा तपाढुन....चिमटा काढुन.....स्वतःला ... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/18/2013 - 05:32 नवीन
असे होते वय झाले की. कविता वाचल्यावर लेखकाच नाव परत एकदा तपासुन पाहिले....चिमटा काढुन.....स्वतःला ... असे वाचावे... तसदी बद्दल क्षमस्व. पैजारबुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
च
चौकटराजा Mon, 02/18/2013 - 06:32 नवीन
वय झाले की अशा तरल कविता सुचतच नाहीत. आमचं असंच झालंय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
म
मनीषा Mon, 02/18/2013 - 04:50 नवीन
सुरेख कविता आहे.. अगदी तुमच्या फुलांच्या रांगोळीसारखी
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 02/18/2013 - 05:50 नवीन
केवळ अप्रतिम!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 02/18/2013 - 06:11 नवीन
बुवा कविता मस्त,,,, धन्यवाद. शनिवारच्या रामदेव कट्ट्याच्या swsews आठवणीत एक कडवं, पहा जमलंय का? काजुंनी सजवित जावे पिस्त्यांचा ना हव्यास ही पहा रबडी आली असतो आईस्क्रिमचा भास
  • Log in or register to post comments
अ
अधिराज Mon, 02/18/2013 - 06:27 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Mon, 02/18/2013 - 07:04 नवीन
एक्दम झक्कास.. :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 02/18/2013 - 13:14 नवीन
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद...
चौकटराजा>>> @बाकी बुवा, माळितो की माळतो ? >>> माळतो हेच बरोबर,पण काही ठिकाणी शब्दाला गोलावा आल्याखेरीज समाधान लाभत नाही,म्हणून तसं...इतकच! :-) @( बुवा , स्वस्थ बसवत नाही हो ! - आग्या वेताळाचा दोस्त .) >>> चालायचच... :-) हा(ही) वयाचाच परिणाम! ;-) ================================================================================ धन्या>>> @बुवा कविता नक्की तुम्हीच लिहिली आहे ना?की कुणी भाडयाने (म्हणजे पैसे घेऊन)तुमच्यासाठी लिहिली आहे?>>>धनाजीराव, इतकंही महाग नका करू हो आंम्हाला...!!! :-) @तुमच्या आजवर प्रसवलेल्या कवितांपेक्षा ही पुर्णपणे वेगळी आहे.>>> ही माझी स्वतंत्र रचना हे माझे निराळे कूळ तुंम्ही अर्थ शोधुनी जाता तरी गवसत नाही मूळ........................................................!!! :-) =============================================================================== aparna akshay>>> @ ते खांबाच कडव जरा गंडलय तेव्हढ सुधारा.>>> मी नाही कुठला पंथी मज नकाच कोठे जुंपू कुणी शोधित जाती खांब मी माझा नाथ स्वयंभू>>> मुक्त अर्थ- मी या प्रांतात कुठल्याही नव्या अगर जुन्या पंथबाजीला स्वतःला,बांधून/जुंपुन घेण्यास तयार नाही...तेंव्हा काव्य-रसिकानी मला,कुठल्याही नव्या/जुन्या- काव्यप्रकाराच्या/विचारधारेच्या-प्रवाहाचा पुढचा दुवा-मानु नये-(या अर्थी-खांब-हा शब्द आहे.).,कारण--''मी माझा नाथ स्वयंभू'' आहे...म्हणजे मी उघडपणे या प्रांतात आता बंडखोरी करत आहे. किंवा यापुढे माझा स्वतःचा प्रांत/पंथ/प्रवाह निराळाच असेल. :-) =============================================================================== ज्ञानोबाचे पैजार>>> @कविता वाचल्यावर लेखकाच नाव परत एकदा तपासुन पाहिले....चिमटा काढुन.....स्वतःला ...>>> Image removed. मी ही तुमचा प्रतिसाद वाचल्यापासून...असच करून पहात आहे. ;-)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 02/21/2013 - 04:57 नवीन
कुणी शोधित जाती खांब च्या ऐवजी कुणी शोधित जाती झेंडे कारण कंपू गट पक्ष याचे ओळख चिन्ह झेंडा हे असते. बघा शब्दाला किती महत्व आहे काव्यात. खांब या शब्दाने एकदम श्वानपंथाची आठवण होते की नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/21/2013 - 18:30 नवीन
अता याच्यावर मी फार स्पष्टीकरण देत बसत नाही... फक्त शेवतचं एक उदा- देतो...
''तुंम्ही म्हणताय तो खांब काढा,आणी देवळात अंतर्गत जे अनेक खांब असतात,त्यांना देवळाचे खांब म्हणून जसं पहाता,तसं परंपरांचे खांब या रुपक-अर्थानी पहा..''
म्हणजे माझ्या त्याच शब्दावर अडून रहाण्याच्या आग्रहा विषयी कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ब
बॅटमॅन Mon, 02/18/2013 - 13:21 नवीन
आयला!!!!! बुवांची कविता अन तीपण विदौट स्मायली अन टिपिकल कच्चा माल? गोंधळलोच होतो =)) पण नंतर कविता वाचायला सुरुवात केली अन मग एकच शब्द निघाला तोंडातून- "वाहवा!!"
एकाकी या वळणावर मी पुढे चालतो आहे. शब्दांचा नाजुक गजरा मी मनी माळितो आहे. मज ठाऊक नाही पुढती असणार कोठचे गाव? नसतात तेथल्या गावी कुणी राजा आणिक राव शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जाई जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही...
हा उत्तरार्ध विशेष आवडला. जियो!!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 02/19/2013 - 18:48 नवीन
खूपच आवडली. पुलेशु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जयवी Mon, 02/18/2013 - 15:00 नवीन
सुरेख !! मस्त वेग आहे कवितेला :)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/18/2013 - 15:05 नवीन
ही २ कडवी विशेष भावली मज ठाऊक नाही पुढती असणार कोठचे गाव? नसतात तेथल्या गावी कुणी राजा आणिक राव शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जाई जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही... क्या बात है !!
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Wed, 02/20/2013 - 06:00 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/21/2013 - 03:46 नवीन
बॅटमॅन..माऊ..जयवी..गिरिजा...सुमित........ सर्वांना धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा