पाककृती

मिसळ आणि पाव

Primary tabs

माघी गणेशोत्सव, २०१३, विष्णूनगर, ठाणे - पाककला स्पर्धा - विषय - मिसळ पाव

काही रसरशीत कलाक्रुती येथे देत आहे.

ही मिसळ खाल्ल्यावर आपली अवस्था मिसाईल सारखी होईल नाही :):)

Mrunalini

बापरे... बघुनच तोंपासु.... आता एकदा करायलाच पाहिजे.

ओ डाएट वर आहे हो....असे फोटो टाकुन का गरीबाला जळवता आहात? ;)
डाएट गेलं चुलीत आता...मिसळ हाणायला पाहीजे आता कुठेतरी झणझणीत...:P :P

प्यारे१

छळ छावणी आहे ही!

नगरीनिरंजन

मिसळी पाहून खपलो आहे!
इतकं पाणी सुटलं तोंडाला की डिहायड्रेशन व्हायची वेळ आलीये.

पाकृ सेक्शनमध्ये धागा टाकलात तेंव्हा वाटल,मिसळ पावच्या पाकृ दिल्या असतील...उत्साहाने धागा उघडला तर फक्त फोटो,निराशा केलीत

आणि फक्त फोटो बघुनच तोंपासु, ते वेगळेच

गवि

ओहो.. क्या बात .. क्या बात.. क्या बात...

nishant

एक्स्ट्रा पाव नि रसा बि मिळल काय? ;) बज्जुराव ?

चेतन माने

भूक लागायच्या वेळेला असे फोटू टाकू नये...... जिभेला आणि मनाला आवर घालणे कठीण जाते !!!
तोंपासु... तोंपासु... तोंपासु ........

दिपक.कुवेत

नुसत्या मिसळिचे एवढे नाविध प्रकार पाहुनच भुक परत चाळवली (आत्ताच जेवलो असलो तरी)

खादाड

अ़़क्षरशः तोंडाचा तलाव झाला !! एक नं चा फोटो एक लंबर आहे !!!

मैत्र

काय त्रास आहे..
इथे वडा सुद्धा धड मिळत नाही. मिसळ कुठली..
भयंकर जळजळ झाली आहे.

यशोधरा

पहिलाच फोटो खल्लास आहे! पण ते खाऊ शकेन असे वाटत नाही, तिखट जाळेस्ट असेल ते!
मस्त :)

सगळे अप्रतिम फोटो बघून मिसळ खावीशी वाटते आहे..आता बनवावी लागेल लवकरच :)

सुबोध खरे

असे फोटो टाकण्याआधी warning द्या हो. उद्या मामलेदाराची मिसळ(ठाणे) खाण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.

kanchanbari

काही जादु येत असती तर या फोटोतुन एक तरी मिसळीची प्लेट गडप केली असती
इथे तर मिसळ काय या मिसळीची अशी लज्जतदार शेव पण नाही मिळत. दया करत जा हो. एवढा त्रास देने बरे नाही.

शुचि

मला यातली कोणतीही चालेल पण कुणीतरी द्या तर :(

विलासिनि

मिसळीचा मस्त मूड बनलेला आहे. चाखल्याशिवाय पर्याय नाही.

आत्ता ठीक असणारा नवरा...एका एकी आरडा ओरडा का करतो आहे .....ह्या वेळी मिसळ मागायची पण चोरी...खरोखर छळ छावणी आहे ह....

अनन्त अवधुत

आपण कधी कट्टा केला तर तुमच्या समोर बसून झणझणीत मिसळ खाईल आणि तुम्हाला देणार नाही :)
हे फोटो म्हणजे छळ छावणी आहे.

झणझणीत, बेफाट.
लहानपणी कीर्तन ऐकताना एका कीर्तनकार बुवांनी या चविष्ट पा कृ. बद्दल एक गैरसमज करून दिला होता.
म्हणे आदल्या रात्रीचे उरलेले पदार्थ एका तिखट जाळ रश्यात कालवतात आणि मिसळ म्हणून विकतात.
आज कुठे ते बुवा भेटले तर............
जाऊ दे कदाचित रात्री कीर्तनात असे सांगून सकाळी हाणत असतील ते सुद्धा.

विवेकपटाईत

फोटो अति सुंदर. जाड चष्मा असल्या मुळे लिहिलेले वाचता आले नाही. बाकी.मिसळला एकदम नव्या नवरी सारख सजविले आहे, अरे पाव पण जरा लोणी वैगरे लाऊन सजवायला पाहिजे होत. लक्ष्मी नारायणाचा जोड शोभला असता.

शिद

एकसोएक आहेत सगळे मिसळींचे फोटो... पहिल्या फोटोतली तर्री पाहुन मामलेदारच्या मिसळीची आठवण येत आहे पण...