जे न देखे रवी...

सोने

Primary tabs

सोने

अघटित घडले त्या बाजारी जेव्हा पडले सोने
शेती फुलले , जमिनीमध्ये आहे दडले सोने!

जरी भाजले तरी राहते कसे बरे हे तसेच सोने?
कळेल का मज असे कोणत्या मुशीत घडले सोने?

निघून गेली कष्टामध्ये सगळी वर्षे आणिक-
आयुष्याच्या संध्याकाळी मग सापडले सोने!
(नॉर्थ ड्कोटा येथे एका वृद्ध जोडप्याच्या मागील अंगणात खनिज तेल सापडले:) आणि ते कोट्याधीश झाले या बातमीवर आधारित)

चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने
अंधार्‍या रात्री एकाकी हळूच रडले सोने

स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे -
कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने

यशोधरा

चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने
अंधार्‍या रात्री एकाकी हळूच रडले सोने
स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे -
कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने

हे छान :)

मदनबाण

स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे -
कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने

व्वा सुंदर..

(५० तोला चा भाव काय होईल) या विचारात पडलेला
मदनबाण.....

ऋषिकेश

स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे -
कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने

हे फार आवडलं :)
बाकी रुपके मस्ता या धनंजय यांच्या विचारांशी सहमत

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग

रुपके वापरण्यातली कल्पकता आवडली! :)

चतुरंग