एक कप चहा - भाग २ !!
एक कप चहा - भाग २ !!
धरेला मोहरून टाकणारं
पावसाचं पाणी ,
चिंब भिजलेल्या मातीचा
तो गोड सुगंध ,
आकाशाला इंद्रधनूची माळ घालून
डोकावणारा भास्कर ,
मग कापूस पिंजून ठेवल्यासारखे
शुभ्र ढग ...
असंच बनतं विश्व .....
बहरलेला ऋतू आणि आलं घातलेला ....एक कप चहा !!
अनमोल रत्नांना सामावलेला
अथांग समुद्र ,
फक्त मनात साठवता येतील
अशी पक्षांची गोड गाणी ,
कृत्रिम जगालाही मागे टाकणारे
अप्रतिम निसर्ग सौंदर्य ,
दिव्यांचा झगमगाट असून सुद्धा
भुरळ घालणारा मंद चंद्र प्रकाश .....
असंच असतं सुख ....
क्षण क्षण निसटलेला आणि तृप्त करणारा ...एक कप चहा !!
सुख आणि दु:ख डोळ्यात
पाणी आणतात खरे ,
राव असो वा रंक
साखरेचा गोडवा चाखतात खरे ,
फिके असू की गडद
फुलांचे रंग मोहरून टाकतात खरे ,
आणि बेदाग पांढऱ्या रंगाचे
पावित्र्य ते खरे ....
असंच असतं जीवन .....
निर्जीवातला जिवंतपणा आणि तयार झालेला ....एक कप चहा !!
धबधबा पाहताना कधी आपण
धुक्यात हरवतो ,
गोड बातमी ऐकतानाही
आनंदाश्रू कोसळतो ,
आभाळ रंगीत करूनही
सुर्य मावळलेला असतो,
रंगांच्या छटा खुलवण्यासाठी
घेतलेला कॅनवास मात्र पांढराच असतो ....
असंच असतं हे आयुष्य ....
गच्च भरलेला रिक्तपणा आणि पोटात ढकललेला....एक कप चहा !!
Book traversal links for एक कप चहा - भाग २ !!
💬 प्रतिसाद
(4)
स
स्पंदना
Tue, 02/19/2013 - 02:51
नवीन
सुरेख! हाही भाग मस्त!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 02/19/2013 - 03:21
नवीन
बोले तो...एकदम झकास! :-)
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 02/19/2013 - 03:31
नवीन
सुपर लाईक!!!
व्वाह!!
- Log in or register to post comments
प
पक पक पक
Wed, 02/20/2013 - 04:10
नवीन
खरच छान ... :) अन इथे कोणतीही गुस्ताखी होणार नाही.. :)
- Log in or register to post comments