सुरुवात....
सरळ चंद्रावर नेणारं बुंबाट अंधुक वातावरण,
कानठ्ळ्ळ्या बसवणारा डिजेचा खण्खणाट ,
गुदमरवुन टाकणारी धुराडी अन चखण्याचा वास ,
आणि या सगळ्यांना सामावणारा असतो एक बार.....
..........असंच बनतं सगळं ....
......... आधी दीर्घ श्वास आणि मग…. एक लार्ज पेग... !!
आतमध्ये शिरताना झालेली चलबिचल .
ऑर्डर देताना झालेला गोंधळ ,
आ वासुन ऑर्डरची वाट बघणारे तुझे डोळे ,
आणि पांढऱ्याशुभ्र कपड्यातल्या कॅप्ट्नची नजर चुकवताना .....
अशी झाली ती पहिली भेट .....
...सोड्याची बाट्ली आणि तिथे .... एक लार्ज पेग...!!
बोटातली सिगारेट ओठात सारताना तू ,
फुंकुन फुंकुन दमल्यावरही मारलेला गोल्ड्न कश ,
खारेदाणे अन चकल्यांनी वाढलेली रंगत ,
आणि तुझ्या ग्लासातला फसफसणारा सोडा ....
असंच घडलं सगळं ......
थरथरणारा हात आणि तरीही .....एक लार्ज पेग ...!!
तर्र झालेले पाणीदार डोळे ,
अडखळणारे असंबद्ध शब्द ,
अन आकलन न होणारा विषय ,
तुला लपवता न आलेल तुझ्या आउष्यातल गुपीत ....
असंच जमलं आपलं .....
नि:शब्द झालेलो आपण आणि आपल्या सारख्याच इतरांनी प्यायलेला .......एक अन एक पेग ...!!!!
लेखनविषय::
💬 प्रतिसाद
(8)
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 02/19/2013 - 09:49
नवीन
- Log in or register to post comments
फ
फिझा
Tue, 02/19/2013 - 22:39
नवीन
का रे बाबा !!!
माझ्या चहा चा ...पेग करून टाकलास ..... .....चहा इतका आवडला तर चहा च प्यायचा !!!.असो!!!!
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 02/19/2013 - 22:45
नवीन
सुरुवात भन्नाटच झालेली आहे.
आता प्रतिक्षा शेवटाची ;-).
- Log in or register to post comments
प
पक पक पक
Wed, 02/20/2013 - 03:45
नवीन
काय शेवट अपेक्षीत आहे.... ? ;)
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Wed, 02/20/2013 - 03:56
नवीन
त्यांना अपेक्षीत शेवट तुम्ही करु शकाल का?
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 02/20/2013 - 04:25
नवीन
विडंबनाची प्रेरणा दोन भागांत आल्याने असे वाटले की विडंबनही दोन भागांत येईल.
शेवट कसाही असो स्वीकारायची तयारी आहे ;-).
- Log in or register to post comments
ल
लीलाधर
Wed, 02/20/2013 - 04:11
नवीन
कभी खुशी कभी गम,
कभी देशी कभी रम :)) चांगलीच झिंग चढलेली दिसतेय की ओ :))
- Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा
Wed, 02/20/2013 - 07:09
नवीन
वाचुन.
- Log in or register to post comments