...........!!!!!!!
छोटे होते डोळे ,
त्यात सामावणारं विश्वही तसंच ,
छोट्यांच्या गोष्टी ऐकता ऐकता
मोठ्यांच्या समजू लागल्या ,
पण .....मोठं होण्याच्या हट्टात
'बालपण ' जगायचं राहून गेलं ....!!!
पुस्तकं वाचत राहिले
वह्या भरत राहिले ,
परीक्षेच्या दिवसात
देवाला स्मरत राहिले ,
पण ….शाळेला जायच्या नादात ...
'सहलीला ' जायचंच राहून गेलं .....!!
लाथ मारील तिथं पाणी काढील
अशी जिद्द तेव्हा होती ,
कॉलेजचा कट्टा ,हिरोइनच्या गप्पा ,
आमची ख्याती कमी नव्हती ,
पण ...अबोली माळून मोगर्यांच्या गर्दीत ...
'गुलाबाशी ' बोलायचंच राहून गेलं ...!!!
बायको साजेशी ,सूनही आदर्श ,
हुशार आई लेकरांची होती ,
मोजून मापून आखलेल्या चौकटीत
क्षितिजे सुद्धा वेगळी नव्हती ,
पण ...प्रतिबिंब पाहताना आरशात ....
' मी ' म्हणायचं राहून गेलं ......!!!
उन्हाळे गेले पावसाळे ही गेले ,
व्यवहार चोख करूनही हिशोब मात्र चुकले ,
लेखणीने उतरवलं कागदावर एकदा ,
जे डोळ्यांनी दाखवलं आयुष्यभर सदा ,
पण ....खरडलेल्या त्या कवितेत .....
'शीर्षक ' द्यायचं राहून गेलं .....!!!
💬 प्रतिसाद
(16)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 02/20/2013 - 08:04
नवीन
अ...प्र....ति....म!!!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 02/20/2013 - 09:54
नवीन
+१
- Log in or register to post comments
प
पक पक पक
Wed, 02/20/2013 - 08:33
नवीन
मस्त .... :)
- Log in or register to post comments
ज
जयवी
Wed, 02/20/2013 - 08:47
नवीन
फार फार आवडली :)
- Log in or register to post comments
ज
जेनी...
Wed, 02/20/2013 - 15:45
नवीन
ह्म्म ही कविता आवडली ...
खास करुन
पण ....खरडलेल्या त्या कवितेत .....
'शीर्षक ' द्यायचं राहून गेलं .....!!!
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 02/20/2013 - 15:48
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
त
तिमा
Wed, 02/20/2013 - 15:55
नवीन
चांगल्या कविता वाचायला मिळताहेत. छान,टचिंग शेवट!
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 02/20/2013 - 18:30
नवीन
हि अनामिक कविता खूप भावली.
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 02/20/2013 - 18:35
नवीन
आवडली.
- Log in or register to post comments
ह
हारुन शेख
Wed, 02/20/2013 - 19:00
नवीन
मस्त कविता आवडली.
- Log in or register to post comments
फ
फिझा
गुरुवार, 02/21/2013 - 03:52
नवीन
धन्यवाद !!प्रतिसाद वाचून....अजून नवीन काहीतरी लिहावेसे वाटते ! हे खरे !!
- Log in or register to post comments
त
तर्री
गुरुवार, 02/21/2013 - 04:05
नवीन
बरी आहे कविता.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 02/21/2013 - 04:29
नवीन
क्लास ! क्लासच !
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
गुरुवार, 02/21/2013 - 04:34
नवीन
मस्तच..................
खूप आवड्ली....!!!!!!!!!!!!
- Log in or register to post comments
ध
धन्या
गुरुवार, 02/21/2013 - 04:36
नवीन
आवडली.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 02/21/2013 - 04:38
नवीन
कविता आवडली!
- Log in or register to post comments