पाककृती

पनिर - पिस्ता हरयाली

Primary tabs

Pista 1

साहित्यः

१. तेल - २ पळ्या
२. आलं-लसुण-हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा
३. पनिर क्युब्स / ताज पनिर
४. फ्रेश किम / मलई - २ चमचे
५. कसुरी मेथी - १ चमचा (हातानी पुड्/क्रश करुन गाळुन घेणे म्हणजे खाताना कचकच लागणार नाहि)
६. व्हईट पेस्ट - १/२ वाटि - १ मध्यम कांदा, ५ काजु, २ चमचे मगज बी कुकर मधे एक शीटि देउन उकडणे. गार झाल्यावर मिक्सर मधे बारिक पेस्ट करणे
७. पिस्ता पेस्ट - १/२ वाटि - २०-२५ सोललेले पिस्ते पाण्यात टाकुन एक १० मि. उकळणे व लगेच गार पाण्यात टाकणे. गार झाल्यावर वरचं साल काढुन मुठभर कोथींबिर्/पुदिना आणि १ हिरवी मिरची घेउन मिक्सर मधे बारिक पेस्ट करणे. (मिरच्यांच प्रमाण त्यांच्या तिखटपणानुसार ठरवावे)
८. चवीनुसार मीठ, साखर किंवा मध १/२ चमचा
९. सजावटिसाठि आल्याच्या पातळ काडया

कॄती:
१. मध्यम आचेवर एका नॉनस्टिक कढईत तेल गरम करा.
२. तेल गरम झाले कि त्यात आलं/लसुण/मिरची पेस्ट टाकुन परता
३. पेस्टचा कच्चा वास गेला कि त्यात तयार केलेली व्हाईट पेस्ट टाका व सतत परतत रहा. काजु मुळे पेस्ट खाली लागण्याची शक्यता आहे
४. आता व्हाईट पेस्ट ब्राउन झाली कि त्यात तयार केलेली पिस्त्याची पेस्ट टाका
५. ग्रेव्हि चांगली परतली कि त्याचा गोळा होईल आणि बाजुच्या कडेने तेल सुटु लागेल. गरज वाटल्यास थोडे पाणि टाका म्हणजे ग्रेव्हि खाली लागणार नाहि
६. आता त्यात पनिर क्युब्स टाका. आवडत असल्यास पनिर मिक्स करण्याआधी क्युब्स थोडे शॅलो फ्राय करु शकता
७. एक ५ मि. ग्रेव्हि चांगली परतली कि कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, साखर किंवा मध घालुन गॅस बंद करा
८. फ्रेश क्रिम/मलई घालुन भाजी हलक्या हाताने मिक्स करा
९. सर्विग साठि वरुन पातळ कापलेल्या आल्याच्या काडया घाला आणि पोळि, फुलके, नान, रुमाली रोटि बरोबर सर्व करा!

अक्षया

दिसायला जीतकी छान आहे चवीला तितकीच छान असणार.
नक्कीच करुन बघणार. :)

धनुअमिता

मस्त आहे पाककृती. खुपच सुंदर.

(ते तेव्हढे फुलके आणि रुमाली रोटि यांची पाककृती दिली असती तर आम्हां नवशिक्यांसाठी बरे झाले असते. आशा करते कि त्यांची पाककृती लवकरच द्याल.)

दिपक.कुवेत

अमिता ते तेव्हढे आयते आण....मी त्यात अगदिच निरक्षर आहे :))

एव्हढी चांगली पाककृती...आणी फोटू का नैत??? :-( फोटू पायजे,त्याशिवाय प्रति साद नै देणार :-(

आनन्दिता

फटू न पाहताच प्रतिक्रिया देणारे-- अत्रुप्त आत्मा !!!:) :)

च्यायला,अता परतिसाद द्यायचा र्‍हायला..... लै लै झ्याक दिसायलय...त्वांड घालुन नुस्तच खावसं वाटतय. :-)

नानबा

जब्राट... ते दिसायलाच येवढं भारी दिस्तयं तर खैला तर जामच खत्रा असणार. बोंबला आम्हांला चहा आणि पोहे सोडले तर असलं काहीच येत नै बनवायला.. :(

मृत्युन्जय

खंग्री पाकृ आहे एकदम. आम्ही तुमचे फ्यान झालो दीपकराव. :)

पैसा

काय मस्त पाकृ आहे! फोटो नेहमीप्रमाणेच लाजवाब!

सूड

पाकृ हटके आहे. पण येवढे पिस्ते वाटून त्याला फोडणी द्यायची? तिखटात पिस्ते लागत असतील छान पण तुमची पनीर आणि पिस्त्याची याआधीची गोडाची पाकृ अधिक उजवी वाटली. गेल्या वीकांतास करूनही पाह्यली. ट्रायल बेसिसवर केल्यामुळे फोटु काढेस्तवर शिल्लक राह्यली नाही. सगळ्यांना आवडली, पण मला मात्र पनीर साखरेसोबत पाचेक मिनीटं शिजवलं तर चव आणखी वाढेलसं वाटलं.

दिपक.कुवेत

मलाहि आधि तसच वाटल होत पण केल्यावर चवीला मस्त झाली. हव असल्यास पिस्ते कमी घाला.

गोडाची पाकृ केलीत; धन्यवाद. पण माझ्या मते पनीर साखरेसोबत शिजवल तर साखरेचा पाक होईल आणि मग कदाचीत मिश्रण घट्ट होईल...जाणकारांनी कॄपया मार्ग्दर्शन करावे.

प्रसाद१९७१

जबरा

मदनबाण

मस्तच !
एक प्रश्न ते शिर्षकात हरयाली च्या ऐवजी हरियाली असे हवे का ?

दिपक.कुवेत

कुणि बदल करेल काय?

धन्यु लोक्स...करा, खिलवा आणि कळवा!

मदनबाण

हो रे बाणा.....(एकेरी चालेल ना?)
चालेल काय,धावेल ! ;)

Mrunalini

करुन बघायला पाहिजे... पिस्ता मुळे वेगळीच चव येईल पनीरला....

jaypal

फोटो आणि पाक्रु दोन्ही जबराट आहेत

इन्दुसुता

मेथी व पनीर यांचे सर्व प्रकार बाय डीफॉल्ट आवडतात.. छान पाककृतीबद्दल धन्यवाद.
ह्या विकांताला करून बघणार ...
पण ते व्हाईट पेस्ट मधलं " मगज बी " म्हणजे काय... तेव्हढं सांगा.