जे न देखे रवी...
पावसा!
Primary tabs
कोरड्या हृदयात माझ्या बरसून जा रे पावसा
एकट्या वाटेत माझ्या हरवून जा रे पावसा
वाटतो विश्वास सार्या निश्चयाचा मेरू मी
अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा
नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी
पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा
हासतो फसवा अन मी मनातच रडतो किती
शुष्क या वैराण नयना भिजवून जा रे पावसा
हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी
बाळगोपाळांस सार्या जमवून जा रे पावसा
वाटतो तु मित्र कोणा, कोणास तुची देव रे
सार्यांस सारे देउनीही कमवून जा रे पावसा
चिंब हे करसी असे प्रत्येक तु या मानसी
भिजण्यास परतूनी यायचे ठरवून जा रे पावसा
-ऋषिकेश
सुपीक काफिया आहे - प्रत्येक शेरातली कल्पना मस्त आहे.
अतिशय सुंदर कविता रे हृषिकेशा!
एकेक ओळ आवडली! :)
औरभी लिख्खो...जियो...!
तात्या.
अगदि हेच म्हणतो.
पुलेशु.
अभिज्ञ.
फारच सुंदर कविता..
वाटतो विश्वास सार्या निश्चयाचा मेरू मी
अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा
हे फार आवडल..
(ये रे ये रे पावसा )हे गाण गुणगुणारा..
मदनबाण.....
हृषिकेश,
खूप दिवसांनी तुझी गझल वाचली. अप्रतिम झाली आहे.
खास करून शेवटचा शेर खूप आवडला.... अभिनंदन!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
चिंब भिजवणारी कविता....
धनंजय, तात्या, अभिज्ञ, मदनबाण आणि फुलवा,
सार्यांचे प्रोत्साहनाबद्दल अन प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार! :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
चतुरंग
नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी
पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा
हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी
बाळगोपाळांस सार्या जमवून जा रे पावसा
वावावावा! फार आवडले.
(बालक)बेसनलाडू
सुरेख कविता.
छान झाली आहे रे काव्य रचना.
हृषिकेश,
केवळ अप्रतीम गझल!
प्राजु, बेला, चतुरंग, चित्रा, शितल आणि कौस्तुभ सार्यांचे आभार! :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश