Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

....बर...!!!

फ — फिझा, Fri, 02/22/2013 - 03:02
......बर .....................!! गर्दी जमलीये कसलीतरी बघू बघू काय झालं ... "अगं धरपडशील कुठेतरी मुली …..हो मागं तू ....." ......बर .....................!! बाई मी सांगू ,मी सांगू ... जमलंय मला ….. “आलंय तुला उत्तर तर शांत बस , बाकीच्यांना विचार करू दे जरा ......” ......बर .....................!! व्वा मस्त पाऊस पडतोय सगळे चाललेत भिजायला ....... “हे बघ.... मुलीच्या जातीनं जास्त उंडारु नये ... बस ….वाचत काहीतरी ......” ......बर .....................!! हेही नाटक मीच लिहिलंय ...सर यावेळी एखादा रोल पण करेन म्हणते .... "good good ..... नाही पण backstage लाही असेलंच की एखादं prize यंदा !!" ......बर .....................!! इतक्यात घाई कशाला करायची बघुना काही दिवसांनी .... “ते करीअर बिरीअर कर गं लग्नानंतर .. उगीच आत्ता आमच्या जीवाला घोर .....” ......बर .....................!! आपल्या engagement ला माझे सगळे friends येणार आहेत..... "अरे व्वा ! ... ते मैत्रीणींचं ठीक आहे ...... पण बाकी जरा कमीच कर ......" ......बर .....................!! “ए शुभ्र ढगा .....तुच एक आहेस बघ जवळचा , मला....” " अगं ......... शेवटच्या घडीला बोलणार नाही खोटं , पण तुझ्याशी मैत्री करायला भाग्य हवंय मोठं ! माझा न रंग ठरलेला न रूप , न धड पाणी साठवतो न धूप , कधी सूर्याबरोबर तर कधी चंद्राबरोबर , माझी न कुणाला सोबत न कुणाला धास्ती , मला न थोबाडीत मारू शकशील न मिठी , माझ्यावर न कुणाच्या उपमा न कुणाच्या कविता ...... पण हसून हसून आज किती मारल्यास गं बाता ... भरून आलोय बघ ...बरसून संपेन मी आता .........." ...........बर ...................!!!

प्रतिक्रिया द्या
2381 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
पक पक पक Fri, 02/22/2013 - 07:26 नवीन
आता तस काही नाही राहीलय हो.... :)
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Wed, 02/27/2013 - 16:04 नवीन
काय सांग्ता? आम्च्या गावाकड तर अजुन असच चाल्लया.. ------------------ @फिझा:- कविता छान आहे.. ------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 02/22/2013 - 09:30 नवीन
बर!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 02/22/2013 - 10:14 नवीन
नुसते बर नाही. खूपच आवडली आहे. मिका, क्रांती, अज्ञातकुला नंतर काव्यदालनात एक आश्वासक नाव तर मिळाले वाचायला. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
त
तर्री Fri, 02/22/2013 - 10:17 नवीन
कविता सुमार. मी शीर्षक " बार " वाचले आणि आत आलो.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Tue, 02/26/2013 - 16:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
ब
बॅटमॅन Fri, 02/22/2013 - 10:18 नवीन
आवडली कविता. अंमळ कालबाह्य इमेजरी वाटली, पण आवडली हे महत्वाचं.
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 02/26/2013 - 16:38 नवीन
खूप आवडली. निव्वळ अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 02/26/2013 - 17:54 नवीन
सुरे़क्ख !
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 02/26/2013 - 18:56 नवीन
आवडली कविता! कधी कधी असं दामटवणं बरंदेखील असतं... अन्यथा तथाकथित स्वातंत्र्यापायी हातात काय उरतं हे शोधण्यातच आयुष्य जातं!
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 02/27/2013 - 15:27 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अधिराज Wed, 02/27/2013 - 15:51 नवीन
कविता चांगली आहे. कधी कधी पालकांनी घातलेली बंधने जाचक वाटतात, पण त्यांच्या भुमिकेतुन पाहिले तर ते बरोबर हि असू शकते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा