पाककृती

होममेड चॉकलेट

Primary tabs

लेकाची चॉकलेटच्या वड्यांची फर्माईश आली, आणि रुचिराची आठवण झाली. कमलाबाई ओगले यांच्या रुचिरातील ही चॉकलेटची क्रुती!!
साहित्य: सहा चमचे कोको पावडर, अर्धी वाटी लोणी, एक सपाट वाटी दूध पावडर, दिड वाटी साखर.
क्रुती: साखर बुडेपर्यंत पाणी घालून एक तारी पाक करावा. त्यात दूध पावडर, कोको घावे. चांगले एकजीव करावे. त्यात लोणी घालून चांगले शिजवावे. शिजताना सारखे ढवळावे. गोळा होत आला की खाली उतरून घोटावे. ताटात थापून वड्या पाडाव्यात. आपल्या आवडीप्रमाणे पॅक कराव्या.

त्रिवेणी

मस्त. मी चॉक्लेटचे स्लॅब वापरुन करते. तेवढाच शॉर्टकट.

पैसा

रुचिरा नवे आले होते तेव्हा माझी आई बरेचदा करायची. आता त्यातले अर्धी वाटी लोणी वगैरे साहित्य वाचून मी त्याच्या वाटेला जात नाही.

लहान असताना आईने खूप बनवून खाऊ घातल्या :)
आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
फोटो छान आहे :)

सूड

छान !! पण सध्या वर्ज्य आहे.

nishant

चॉकलेट म्ह्टल कि आवड्णारच!!

शुचि

धावत पळत जाऊन व्हेन्डिंग मशिनमधून ग्रँड्मा चॉकोलेट चिप कुकीज आणल्या.

जयवी

अनन्या.........चॉकलेट सुपरहीट झालं गं.......तुला मनापासून धन्यु....... :)