मध्यस्थ
भेट आपुली पहिली वहिली
अशी ठरवली नव्हती
नकोच होते मला कुणी गं
आपल्या अवती भवती
चार फुटांचे अंतर होते
दोघांमध्ये तेव्हा
सवाल माझ्या हृदयीचा
तुज कैसा ऐकू यावा
मनात राहून गेले
सारे शब्द मनातील माझे
माझ्यासम बोलणे
राहिले तसेच अधुरे तुझे
पुन्हा भेटशील एकांती तू
वाट पाहू मी किती
नको आणू पण कुणी
बरोबर मध्यस्थ सोबती
💬 प्रतिसाद
(1)
स
संजय क्षीरसागर
Sun, 03/03/2013 - 19:31
नवीन
बाय द वे, कविता लिहून डेरिंग येत नाही... डेरिंग केल्यावर कविता सुचते!
- Log in or register to post comments