Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नास्तिक - भाग २ !!

फ — फिझा, Mon, 03/04/2013 - 02:06
नास्तिक - भाग २ !! कुठे आहेस तू, नाही दिसला मला कधी जे मानणारे आहेत खूप, त्यांना तरी भेट कधी “सगळीकडे आहे मी.. हे आकाश, ही धरती, हे विश्वच मी ….. एकदा "समुद्र" म्हणून बघ मला, या लाटाच देतील सगळी उत्तरे तुला ......" फिझा ने जब दरिया में पानी को सेह्लाया, तो जितने बल्खाके पानी किनारोंसे से टकराया, उतनी बार....... अए खुदा तू याद आया !! तुझे अमरत्व फक्त पुराणकथांमध्ये आहे, मृत्यू चे भय इथे प्रत्येक सजीवाला आहे, "दगडाला मूर्ती बनवणाऱ्या हातातले 'देवपण' मी, कधी तहानलेला अतृप्त वाळ्वंट, तर कधी, वठलेल्या झाडाचा अंकुरही मीच आहे ..." जब बारीश की बुंदो ने धरती को चुमा, हम ने जमीन पर बिखरते सितारोंको पाया, जितने सितारोंको सावन ने बरसाया, उतनी बार....... अए खुदा तू याद आया !! नास्तिकांना नाही पटत तुझी एकही खुण, आस्तिक ही दमतील कधीतरी हे ओझे वाहून, " कधी फुलपाखराचे रंग, तर कधी फुलांचा सुगंध मी, कधी कोकिळेचे गीत मी,कधी बासरी ने बनवलेले हवेचे संगीत मी, बघ चंद्राकडे डोळेभरून, दाखव एकदा यांपासून अलिप्त राहून ..... " फिझा ने जब गुलशन में फुलोंको मेह्काया , तो जितनी बार मेहेक को हमने अपनी जिंदगी मे पाया , उतनी बार....... अए खुदा तू याद आया !! मानले जरी तुझे अस्तित्व, नसून असलेले, मग माझेच का नेहमी, असून नसलेले... "तुझ्या नसण्यात मी आहे,तुझ्या असण्यातही मी आहे, तुझे श्वासही मी आणि दोन श्वासातले अंतरही मी आहे ....." फिझाओंको आज हमने अपने सासोंमे भर लिया, तेरे होने के यकीं के साथ ,अपने होने का एहसास पाया, जितनी बार इन सासोंको हमने 'फिझा ' का नाम दिया, उतनी बार....... अए खुदा तू याद आया !! नास्तिक - भाग १ !!

Book traversal links for नास्तिक - भाग २ !!

  • ‹ नास्तिक !!!
  • Up

प्रतिक्रिया द्या
2077 वाचन

💬 प्रतिसाद (5)
स
स्पंदना Mon, 03/04/2013 - 02:38 नवीन
अहं ब्रम्हास्मी? जणु गीता वाचते आहे अस वाटल. पुन्हा एकदा.."छान लिहिता तुम्ही".
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 03/04/2013 - 04:06 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 03/04/2013 - 09:27 नवीन
छान :)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 03/04/2013 - 13:59 नवीन
हा तुमचा स्वतःचा अनुभव असेल तर मग...क्या बात है!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/06/2013 - 08:38 नवीन
दोन्ही बाजूंचे वर्गीकरण करणारी ,एक अनोखि धडपड . :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा