Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माय

प — पंचम, Mon, 03/04/2013 - 13:37
माय.... मला सुटता सुटेना माझ्या लेकराची माडी .. जोडले घरटे कधी रे वळखीची काडी काडी.. माझ्या पंखातला चिमणा नवं घरटं बांधतो .. वेळ नाही माझ्यासाठी मला दबकत सांगतो .. नव्या घरट्यात असल नव्या चिमणीचे राज्य बघ माऊलीचे पंख कसे घायाळ रे आज .. आज माझच लेकरु दावी आश्रमाचा रस्ता कशी आली पहा येळ आज मावळतीले झुकता पिल्लाची नवी कोठी किती मोठी रं असावी? पण माझ्या अडगळीस तिथे जागा का नसावी? प्रभु एकच मागणे पिल्ला दु:ख न मिळु दे जरी मिटले डोळे माझे तरी त्याला न कळु दे .. सरणाच्या चितेवर जेव्हा बाळ माझं रे रडेल. तेव्हा चितेतल्या आगीत रे माझा देह कळवळेल .. – कवी पंचम (निशांत तेंडोलकर)

प्रतिक्रिया द्या
1468 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 03/04/2013 - 14:01 नवीन
सुंदर रचना.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 03/04/2013 - 19:32 नवीन
सुंदर रचना. अजून येउ देत.
  • Log in or register to post comments
प
पंचम Tue, 03/05/2013 - 03:15 नवीन
माझ्या कवितेला अभिप्राय कळविल्याबद्दल अजून चांगले लिहण्याचा प्रयत्न करेन ..
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 03/05/2013 - 03:38 नवीन
कविता छान आहे. नव्या-नव्या विषयांवरही कविता कराव्यात अशी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 03/05/2013 - 15:42 नवीन
सुरेख लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 03/05/2013 - 15:47 नवीन
मोलकरीण सिनेमाची आणि "देव जरी मज कधी भेटला" गाण्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Wed, 03/06/2013 - 05:51 नवीन
घरच्यांना असा त्रास द्यायचा प्रकार स्वातंत्र्यापुर्वी ही होता की, ही प्रथा इंग्रज देशातुन गेल्या नंतर अस्तित्वात आली ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा