पाककृती
बीट भाजी
Primary tabs
साहित्य :- १ मोठा बीट, ३ तिखट हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून, कढीपत्ता १५ पान, कोथिंबीर १/२ वाटी स्वच्छ धुवून व चिरून , लसून ठेचून, जिरे, मोहरी, तेल, मीठ.
कृती :- प्रथम बीटाची शेपूट व डोक कापून बीटाची वरची पातळ साल काढून घ्यायची. नंतर बीट स्वच्छ धुवून कोरडा करून किसणीवर किसून घ्या. कढईत तेलावर मोहरी व जीरा खमंग फोडणी करा नंतर त्यात टेच्लेला लसून, मिरची व कढीपत्ता खमंग परतवा. नंतर त्यात किसलेला बीट घालून परता. चवीपुरता मीठ घालून मंद आचेवर भाजी शिजवा. १५ मिनटात भाजी व्यवस्थित शिजते. शेवटी कोथांबीर घालून १ मिनिट परतावा. चविष्ट बीट भाजी तयार.
टीप :- फोडणी खमंग व जरा जास्तच परतावी. आवडत असेल तर कढीपत्ता व कोथांबीर पण जास्त घालावा. त्याने भाजीला चव तर येतेच पण बीट व कोथांबीर या दोघांच्या रंगाच मेळ पण खूप चं छान जमतो.
पाकृ आवडली... पण ती बीटाची एक तुराट आणि गोड चव असते... ती चव बदलते का?
नक्किच करुन बघेल
http://mejwani.in/
साधी सोपी पाकृ. पुढच्या वेली फोटो पिकासावरून किंवा फ्लिकरवरून अपलोड करायचा प्रयत्न करा.
पाकृ आवडली.
मी बीट कुकरमध्ये 1 शिट्टी घेवून किसते व वरून फोडणी घालते. आता अश्याप्रकारे करून पाहीन.
फोटो असता तर रंगाचा मेळ प्रत्यक्ष दिस्ला असता!!
बीट आवडत नाही, पण पाकृ चांगली वाटत आहे.
मृणालिनी ..... बीटाची तूरट चव पूर्ण जाते पण गोडसर पणा थोडासा राहतो.
त्यासाठीच मिरची जास्त तिखट वाली घ्यावी.
श्रिया ... बीट सहसा कोणालाही जास्त आवडत नाही ग... पण हि भाजी तुला नक्कीच
अनन्या , पैसा ..... अग मी इथे एकटीच राहते.... त्यामुळे फोटो काढण जमत नाय ग... पण पुढे नक्की प्रयत्न करेल....
त्रिवेणी ..... मला बीटाच जास्त काही येत नाही . हलवा, बर्फी डोसा न हि भाजी सोडून...:(... पण मी बर्याच वेळा बीट सरळ धुवून किसून मिक्सर मध्ये घालून वाटून घेते व चपाती बनवताना त्यात हे वाटण, मीठ व लागेल तेवढ पाणी घालून कणिक मळते व चपाती बनवते.... छान होते ग चपाती... रंग छान येतो बीट पण खाल्ल्या जात. त्यात ताटात कधी नव्हे ते रंगीत चपाती पण दिसते... तेवढाच समाधान ....
छान छान