पाककृती
रताळ्याची खिर.
Primary tabs
साहित्यः-१)रताळ्याच्या कापलेल्या फोडी.(चकत्या)
२)चवीप्रमाणे गूळ.
३)चिमूटभर मीठ.
४)दोन मोठे चमचे भिजवलेला सबूदाणा.
५)नारळाचे दूध्.(जाड व पातळ)
६)वेलचीपूड.
७)साजूक तूप.
कृती :-रताळ्याच्या फोडी पाणी घालून शिजत ठेवाव्या.थोड्या शिजल्या की त्यात भिजवलेला साबूदाणा घालावा.
गूळ व मीठ घालून फोडी शिजेपर्यंत ढवळत राहावे.फोडी शिजत आल्या की त्यात पातळ नारळाचे दूध
घालावे व उकळी येऊ द्यावी.मग त्यात नारळाचे जाड दूध घालावे.उकळले कि त्यात वेलचीपूड व
साजूक तूप घालून गॅस बंद करावा.थंड किंवा गरम कसेही सर्व्ह करा.
शकर कंद मला आवडते..शकर कंद उकडायचे ..कपभर दुधात कुस्करायचे वर साखर..मस्त लागते..
हा खिर प्रकार करुन बघणार
अगदी बरोबर.. मला पन ते फक्त उकडुन, त्यात दुध, साखर आणि तुप घालुन खायचे.. खुप आवडते.
ज्योति ताई.. रताळ्याची खिर आवडली. :)
मस्त पाकृ!
छान दिसते :)
मस्तच :)
मस्तच :)
रताळ्याची खीर पण आवडते. फक्त नारळाचे दूध घालून कधी केली नाही..
मला आवडेल ही खीर :)
http://mejwani.in/
वेगळ्या प्रकारची पाकृ आवडली.
वेगळा पदार्थ आवडला.करुन बघायला आवडेल.
नविन पाकृ आवडली. ज्योती मी रताळं उकडुन किंवा भाजून नंतर ते सोलुन, कुस्करुन त्यात सायीचं दुध आणि साखर घालुन फार घट्ट्/पातळ नाही असं करते.