पाककृती

दुधी-मोतिया खीर

Primary tabs

.

साहित्यः

१ वाटी साल व बीया काढून किसलेला दुधी
१ लिटर दुध
२-३ टेस्पून भिजवलेला साबुदाणा
३/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१ टीस्पून बदामाचे काप
१ टीस्पून पिस्त्याचे काप
१/४ टीस्पून केशर
१/२ टीस्पून वेलचीपूड
१ टेस्पून साजुक तूप

.

पाकृ:

एका पॅनमध्ये साजुक तूप घालून दुधीचा कीस १-२ मिनिटे परतून घ्या.
त्यात दुध घालून उकळी आणा, आच मध्यम असावी.
दुधीचा कीस दुधात शिजला की त्यात भिजवलेला साबुदाणा घाला व तो पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्या.
आता केशर,साखर व वेलचीपूड घाला.
साखर विरघळली की गॅस बंद करून, वरून बदाम-पिस्त्याचे काप घाला व खीर थंड होऊ द्या.

.

ही खीर गार जास्तं छान लागते.
दुध खूप आटवायचे नाही, साबुदाण्यामुळे दाटपणा येतो खीरीला.

.

Mrunalini

वा.. छान दिसतीये खिर.. दुधी चालतो का गं उपासाला?? मला नक्की माहित नाही.

ताईं चे धागे मी आवर्जुन बघत असतो..
धाग्याची मांडणी व फोटो सुबक असतात..
आणी अर्थात पाककृति पण रुचकर असणारच..
लाईकेश

प्यारे१

काकु टाकून पसार होणार्‍या अकुंना प्रतिसाद टाकायला लावणार्‍या सानिकातै ह्या आमच्यासाठी उ त्तुं ग झालेल्या आहेत आहेत....!

सानिकातै आप ऐसेच बनाते रहो... पाकृ!
:)

साबुदाणाखीर आवडत नाही. पण चालेल. :)

पिंगू

बेष्ट.. उपवास काय मी कधी करत नाही आणि ही खीर तर सोप्पी आहे. पुढच्या विकांताचा मेनू फिक्स झाला.

प्रतिज्ञा

पाकृ चे फोटू पाहूनच पोट भरल सानिका..... एकदम रंगीबेरंगी पाकृ :) मीपण नक्की बनवून बघेल...तेपण आजच.

प्रतिज्ञा

मिपा वर कोना सई ला बेरी ( लोणी कढवून शेवटी शिल्लक राहत तो पदार्थ) चा एखादी पाक्रु येते का? कोन एका कडून बेरी ची मिठाई बनते अस ऐकिवात आहे....पण आजतायत ती कशी बनते ह्याची कृती काय मिळाली नाही ती नाहीच...:(

दिपक.कुवेत

पाकॄ आणि फोटो नेहमीप्रमाणेच छान. साबुदाणा खिरित एवढा आवडत नाहि पण दुधीबरोबर ट्राय केला पाहिजे. शेवटच्या फोटोत ते सांडलेले पिस्ते आहेत का?

जेनी...

गोग्गो आहे एकदम ...
:)

पहिला फोटो कुक्कूप आवडला .

रेवती

भारी आहे प्रकार. याआधी असे साबुदाणे घालून शेवयांची खीर खाल्ली होती. ज्यांना पूर्णपणे उपास करायचा नाहीये त्यांची सोय होणार या खिरीनं! ;)

दीपा माने

आता येणार्‍या उन्हाळ्यासाठी आणखी नव्या थंडगार पेयाची माहीती. सानिका नाँद करुन ठेवली आहे.

जयवी

आई गं...... कसली यम्मी दिसतेय खीर.... !!

मोदक

फोटो दिसले नाहीत... (त्यामुळे जळजळ झाली नाही ;-))