एक कप चहा - भाग ३ !!
..... एक कप चहा - भाग ३ !!
प्रत्येक भेटीत वेळ, ठिकाण
आणि चहा ठरलेला असायचा,
"लवकर पाठवा " म्हणायचो
पण उशिरा हवा असायचा,
सुर्य मावळण्यापूर्वीच नेहमी
उगवण्याची घाई चंद्राला असायची,
पण चहाची चव मात्र
जिभेवर रेंगाळत रहायची ......
.........असंच असतं भेटणं ....
निघतांनाची हुरहूर आणि निमित्तमात्र ....एक कप चहा !!
पाऊस थोडाच पडायचा
आपण मात्र चिंब भिजायचो,
दिसण्याला , हसण्याला चव नसते जरी
तरीही "गोड " म्हणायचो,
रणरणत्या उन्हातही
"कोवळं " म्हणून हिंडायचो,
आणि त्या शुभ्र ढगांमध्ये
हृदय म्हणून "बदाम" शोधायचो .....
......असंच असतं वेडं प्रेम .....
"उंचावरचं" हिल स्टेशन आणि अर्धा अर्धा घेतलेला ......एक कप चहा !!
कधी कधी खूप उकळायचा
तुझ्या रागासारखा ,
कधी पटकन गार ही व्हायचा
अबोला सोडल्यासारखा ,
smile चे कप बघून
गालात हळूच हसायचा ,
पण रुसवा टिकावा म्हणून कि काय
कधी सांडून ही जायचा ,
...........असंच असतं रुसणं फुगणं
नको नको म्हणून तीन वेळा घेतलेला ......एक कप चहा !!
पण .....
चहाला हल्ली सवय झालीये
गर्दीतल्या एकटेपणाची ,
दुरावलंय सगळं पण तरीही
नव्याने जगण्याची ,
वाफेबरोबर उडून जातात
त्या क्षणभंगुर आठवणी ,
काही मात्र राहतात शिल्लक;
चहाला अर्थ देण्यासाठी ....
.......असंच झालंय काहीसं .....
केला जातो २ कप आणि उरतो मात्र .........एक कप चहा !!
......फिझा ......
एक कप चहा - भाग १ !!
एक कप चहा - भाग २ !!
Book traversal links for एक कप चहा - भाग ३ !!
💬 प्रतिसाद
(6)
स
साती
Mon, 03/11/2013 - 03:35
नवीन
चांगली जमलीय.
- Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची
Mon, 03/11/2013 - 03:56
नवीन
छान , आवडली .
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 03/12/2013 - 02:35
नवीन
शेवटच कडवं फार आवडल.
- Log in or register to post comments
ज
जेनी...
Tue, 03/12/2013 - 04:43
नवीन
ह्म्म हा भाग छान झालाय फिझा .....
आवडेश ...
- Log in or register to post comments
स
साऊ
Wed, 03/13/2013 - 02:22
नवीन
फार चान आहे.
- Log in or register to post comments
स
साऊ
Wed, 03/13/2013 - 02:23
नवीन
फार चान आहे.
- Log in or register to post comments