Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुष्काळ

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Mon, 03/11/2013 - 04:05
पाऊस अडतो, माती काळी कातर वेळी, रिक्त झोळी थोडीशी जमीन, थोडेसे आभाळ मोठ्या चेहर्‍यावर, छोटे कपाळ वितभर पोटास, पेरभर अन्न मुठभर काळीज, सुन्न सुन्न झकपक विज, शहरी वेग गाव आंधळे, भुईला भेग राऊळाशी रांग, लांबच लांब विठू न राखे, त्याचाच आब कां रे असे, जगणे विटाळ? रात्र काळ, दिवस दुष्काळ! |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०५/०३/२०१३) टिपः माननीय स्पाराज टाकरे यांनी व्यक्त केलेल्या जाहीर अपेक्षाभंगाला उत्तर म्हणून हि रचना देण्यात येत आहे. कवावे.माननीय स्पाराज टाकर्‍यांनी यावर आपले मत कळवावे, अशी मी विनंती करत आहे.

प्रतिक्रिया द्या
6896 वाचन

💬 प्रतिसाद (23)
फ
फिझा Mon, 03/11/2013 - 07:57 नवीन
आवडली कविता !
  • Log in or register to post comments
य
यश पालकर Mon, 03/11/2013 - 08:01 नवीन
छान आहे कविता!!!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/11/2013 - 08:04 नवीन
सुरेख कविता. यावर्षी तरी पुरेसा पाऊस पडावा हेच त्या निसर्गाकडे मागणे.
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 03/11/2013 - 08:27 नवीन
काय बोलू सुचत नाहीये भावना थेट पोचल्या .
झकपक विज, शहरी वेग गाव आंधळे, भुईला भेग राऊळाशी रांग, लांबच लांब विठू न राखे, त्याचाच आब कां रे असे, जगणे विटाळ? रात्र काळ, दिवस दुष्काळ!
अंगावर आली कविता रोज दुष्काळी बातम्या पाहून .. जाम जीव जळतोय. स्वतः २४ तास पाणी वापरताना सारखा 'त्यांचा' विचार मनात येतो. जमेल तसे पाणी जपून वापरायला शिकलोय, भांड्यातले उरलेले पाणी झाडांना घातले जाते. दुष्काळ ग्रस्त लोकांसाठी सरकारने जी रोजदारी वर काम सुरु केली आहेत, त्याची रोज्दारीही त्यांना मिळत नाही . हंडाभर पाण्यासाठी शाळेतली मुलं सर्व सोडून दिवस दिवस वणवण भटकतात . तर दुसर्या बाजूला अजून एक बातमी :- तहान भागवायला मुंबईकरांसाठी अजून एक धरण. काय बोलायचे ... शब्दच खुंटले. पाण्याची सर्वात जास्त नासाडी मुंबईत होते . तरी मुंबईला २४ तास पाणी .
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 03/11/2013 - 10:26 नवीन
झकपक विज, शहरी वेग गाव आंधळे, भुईला भेग
__________/\__________ पोहोचली रे मनापर्यंत.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 03/11/2013 - 16:32 नवीन
खरच विचार करायला लावणारी कविता आहे मिका दादा ! :( आवडली म्हणायलाहि कससच होतय .... खोलवर पोहोचली म्हणेन .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/15/2013 - 10:37 नवीन
+१ टू बालिका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
स
स्पंदना Tue, 03/12/2013 - 00:26 नवीन
हं! मिका कोष फुटतोय, पंखांची चाहुल आहे या कवितेत. कुठंस वाचल होतं, कोष फुटताना फुलपांखरांची पंख मऊ असतात. पण त्याच पंखांनी तो कोष फोडायचा असतो. जर बाहेरच्याने मदत करुन कोष फोडुन दिला तर त्या पंखांना बळ येत नाही. अन त्या फुलपाखराच जीवन छोट होत म्हणे.
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Tue, 03/12/2013 - 01:57 नवीन
कविता विमनस्क करून गेली.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 03/12/2013 - 02:46 नवीन
कविता छानच.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 03/12/2013 - 04:00 नवीन
एक नम्र विनंती, तुम्ही लोकक्षोभाला बळी पडुन वगैरे कविता करु नयेत. हल्ली कुणाचे कुठं कसे कधी अपेक्षाभंग होतील ह्याची खात्री नाही. तुम्ही आपलं प्रेमाबद्दल लिहित रहा, छान छान, दुष्काळ अन दुख जगभर आहेच की आम्हाला, तुम्हीपण त्याच वाटेवर घेउन चाललात तर कसं व्हायचं आमचं ?
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 03/12/2013 - 04:46 नवीन
ह्म्म्म खरय दाद्या .. तु असल्या कविता नको करत जाऊस :( ५० कधी कधी(च) मनातलं बोलुन जातात ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
स
स्पा Tue, 03/12/2013 - 04:55 नवीन
तुम्ही आपलं प्रेमाबद्दल लिहित रहा, छान छान, दुष्काळ अन दुख जगभर आहेच की आम्हाला, तुम्हीपण त्याच वाटेवर घेउन चाललात तर कसं व्हायचं आमचं ?
अरेरे अपेक्षाभंग झाला वाटत.
तुम्ही लोकक्षोभाला बळी पडुन वगैरे कविता करु नयेत. हल्ली कुणाचे कुठं कसे कधी अपेक्षाभंग होतील ह्याची खात्री नाही
खरय अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 03/15/2013 - 07:28 नवीन
दोन वेळा उत्तर द्यायचा प्रयत्न केला, दोन्ही वेळेस मिपा गंडले. तर झाले असे कि, मी स्टार माझा वर एक स्पेशल रेपोर्ट पाहीला मराठवाडा, विदर्भातील दुष्काळावर. त्यातली काही दृश्य अगदी हादरवून गेली. त्यातून हि कविता उमटली. नंतर आठवले स्पारावांनी अशी काहीतरी सूचना केली होती, म्हणून सहज गंमत म्हणून ती टिप टाकली. असो. सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
अ
अनिदेश Tue, 03/12/2013 - 09:53 नवीन
खुप वास्तववादी आहे कविता...भीषण आहे परिस्थिती :(
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 03/13/2013 - 01:49 नवीन
सत्यपरिस्थितीवरील कविता
  • Log in or register to post comments
स
साऊ Wed, 03/13/2013 - 02:14 नवीन
तुमच्या आदिच्या कविअता वचल्या. चछन होत्या. ही पन छन आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/13/2013 - 04:22 नवीन
मिटरमधे थोडी गंडली आहे. पण, आशय छान. (आमचा धोंडोपंत मित्र यांनी देवद्वार छंदाबद्दल घेतलेला तास इथे) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 03/15/2013 - 07:53 नवीन
अर्थपूर्ण कविता. :)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 03/15/2013 - 09:55 नवीन
वास्तववादी कविता सुन्न करून गेली.
  • Log in or register to post comments
अ
अनय सोलापूरकर Fri, 03/15/2013 - 10:48 नवीन
------------------ झकपक विज, शहरी वेग गाव आंधळे, भुईला भेग ------------------ खुपच अर्थपूर्ण ..!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 03/19/2013 - 17:21 नवीन
>>>राऊळाशी रांग, लांबच लांब विठू न राखे, त्याचाच आब तू तरी सोड रे 'त्या'ला! कविता सुन्न करणारी
  • Log in or register to post comments
न
निश Wed, 03/20/2013 - 06:15 नवीन
मिसळलेला काव्यप्रेमी साहेब, अतिशय जबरदस्त आशय असलेली कविता. तुमच्या कवितेत दुसर्‍यालाही विचार करायला लावणार बळ आहे. अतिशय सुन्न व्हायला लावणारी कविता. सशक्त आशय मोजक्या पण काळजाला थेट भिडणार्‍या ओळीत तुम्ही व्यक्त केला आहे. दुष्काळावर अतिशय बोलक भाष्य करणारी कविता.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा