पाककृती

कोबीची भजी.

Primary tabs


साहित्यः-१)बारीक चिरलेला कोबी.
२)बारीक चिरलेला कांदा कोबीच्या अर्धा.
३)बारीक तुकडे केलेली हिरवी मिरची.
४)आलं-लसूण पेस्ट.
५)बेसन्(चण्याचे पीठ)
६)हळद.
७)लाल मिरची पूड.
८)मीठ.
९)तळण्यासाठी तेल.
कृती :-वरील सर्व साहित्य एकत्र करावे.जरुरीपुरते पाणी घालून भिजवून घ्यावे.जास्त पातळ करु नये.
कढईत तेल तापत ठेवावे.चांगले तापले की पिठाची छोटी-छोटी भजी तेलात सोडावी व तळून
काढावी.(तेल चांगले तापले की गॅस मध्यम करावा). सॉस व गरम गरम चहा अथवा कॉफी
बरोबर खायला द्यावी.

Mrunalini

चांगली आहे पाकृ.. मी कोथिंबीरच्या वड्यांसारख्या कोबीच्या वड्या करते.. त्या पण मस्त लागतात.

कवितानागेश

यात आले-लसूण घालण्या ऐवजी अख्खे धणे आणि मिरीचे दाणे थोडे ठेचून घातले तरी छान चव येते.

दिपक.कुवेत

भजी आणि चहा लगेच उचलुन खावसं वाटतय....मस्त आणि सोपी पाकॄ

पैसा

कोबीचा एवढा चांगला पदार्थ होतो यावर पटकन विश्वास बसणार नाही!

चिंतामणी

"भजी" ऐवजी "भाजी" असे वाचत होतो.
असो.

भजी कुठलिही असली तरी गरम गरम खाण्यात मजा असते. आता करुन खाल्ल्याशिवाय समाधान होणार नाही.