Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लघु वाल्गुदभारत-भाग ३.

ब — बॅटमॅन, Mon, 03/11/2013 - 13:54
जो वेळ या वाल्गुदवर्णनाते| लागे, क्षमावे परि या कवीते| कामे जशी येति तैं मूड जाई| तैं दीस-दीशीं लिहवीत नाही || गुहायामपतत्ब्रूसः सपद्येवाचिरात् खलु | तत्रैव हि गृहं तेषां वाल्गुदानां पुरातनम् ||१|| ब्रूसाघातध्वनिना ते सर्वे भयभीता: भृशं खलु | उड्डयन्ति आक्रोशन्ति वारंवारं इतस्तत:||२|| तद् दृष्ट्वा चकितो ब्रूसः भयेन स्तिमितस्त्वहो | पश्चात्पितृप्रयत्नेन गुहाया: उद्धृतः खलु ||३|| स्वप्नेष्वपि खलु त्रस्तः महद्भिर्वाल्गुदै: सदा | भयभीतः सदा ब्रूसः प्राणिभिस्तु निषेवित: ||४|| निजचित्तभयं यावत् अकथत् भीतिमान् बटु: | "भयं सर्वेषु सामान्यं" तातस्तमकथत्तदा ||५|| तया ऐकितां शांत जैं ब्रूस होई | अकस्मात निद्राप्रदेशात जाई | पैं वाघळे येति पुनःपुनःचि ती | घोंघावती कायम आरपार ती ||६|| अथैकदा नाट्यगृहात साचे | घडे महन्नाट्य जे सत्य साचे | मनावरी कोरिला तो प्रसंगू | वर्णू किती त्यास, मी काय सांगू ||७|| नाट्यात गूढे बहु, पाहतांना | तो ब्रूस पाही परि वाघळांना | अंगावरी येति जणों बहूत | बाबा चला, येथुनिया निघूत ||८|| अस्वस्थचित्ते विनवीत राही | ऐकोनिया बाप बाहेर नेई | पैं बाहिरी पिस्तुलधारि चोर | तो द्रव्य मागे, पुरता छचोर ||९|| दिले जरी द्रव्य मातापित्यांही | मारोनि टाके, न विवेक काही | कलेवरे पाहुनि ब्रूस तो रडे | होती न पैं जोवरि नेत्र कोरडे ||१०|| तया मुहूर्तीं परि बाल्य त्याचे | आटोपले क्रूरपणेंचि साचे | प्रवास येथोनि सूडाचिया तो | सवे जनें, पैं मनीं एकटा तो ||११|| (क्रमशः)

Book traversal links for लघु वाल्गुदभारत-भाग ३.

  • ‹ लघु वाल्गुदभारत- भाग २.
  • Up

प्रतिक्रिया द्या
3868 वाचन

💬 प्रतिसाद (19)
प
प्रचेतस Mon, 03/11/2013 - 14:11 नवीन
झक्कास. आता पुढचा भाग कधी?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 03/11/2013 - 16:04 नवीन
लघु वाल्गुदभारतं वाल्गुव्यासविरचितम् इति प्रसिद्धम् |
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 03/11/2013 - 16:09 नवीन
मजा येत आहे वाचायला !!
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 03/11/2013 - 18:04 नवीन
वाघुळपंत मस्त चाललंय! ती स्मायली मधेच कुठून आली कपाळावर हात मारणारी?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/11/2013 - 18:27 नवीन
'उड्डयन्ति आक्रोशन्ति वारंवारं इतस्तत:' या वाक्याला ती स्मायली अगदी समर्पक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आतिवास Mon, 03/11/2013 - 18:12 नवीन
दोन भाषा वापरण्याचं काही विशेष कारण आहे का? कदाचित आधीच्या भागांत या प्रश्नाचं उत्तर असेल -पण मी अजून पहिले दोन भाग वाचलेले नाहीत, वाचते.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/11/2013 - 18:48 नवीन
वृत्तराज........वाघुळशास्त्री... Image removed. एकदम अचूक.....निशाने पे तीर... Image removed.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 03/11/2013 - 19:31 नवीन
या बॅटम्यानाचे वय काय रे? :P
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 03/11/2013 - 19:44 नवीन
सर्वांचे मनापासून आभार!!! @आतिवासः काही खास कारण नाही. ५ श्लोकांनंतर संस्कृतची भट्टी काही जमेना, मग मराठीवर उतरलो झालं :) @लीमाऊजेटः अवघे चतकोरशे वयमान ;)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 03/11/2013 - 20:48 नवीन
बॅट्या तुझे हे वल्गुदाख्यान वाचून डोळ्यासमोर महाभारतकालीन कपड्यातलाच बॅट्मॅन उभा राहतोय रे. फुल्ल सोन्याचा मुकुट, उत्तरीय, कटीवस्त्र वगैरेवाला. ;)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 03/11/2013 - 21:02 नवीन
सहीच रे अभ्या!!! नेटवर शोध घेताघेता हे सापडलं बघ. महाभारत काळातला नै पण सौदिंडियन अण्णा ब्याटम्यान ऊर्फ गॉथमपल्लिन ब्याटम्यानप्पा ;) Image removed. नंतर कधी जमल्यास तसा महाभारतकालीन किंवा मराठेशाही बॅटमॅन काढण्याची एक फर्माईश तुला आलरेडी करून ठेवतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Mon, 03/11/2013 - 21:11 नवीन
अर्थात अर्थात. :) ह्यो पण भारी काढलाय रे अगदी आपण त्याचे मराठीकरण करुच म्हणे. :) काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 03/11/2013 - 21:22 नवीन
:) हा रे नक्की. मराठी ब्याटम्यानाच्या संकल्पनेला समस्त वाल्गुदप्रेमी मिपाकरांकडून जोर्दार अनुमोदन!!!!!!!! वाट पाहतोय, मराठेशाही ब्याटम्यान झालाच पाहिजे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सस्नेह Fri, 03/15/2013 - 16:47 नवीन
बॅटमॅनला मराठी शब्दपण पायजे तसाच वजनदार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बॅटमॅन Fri, 03/15/2013 - 17:32 नवीन
ब्रूसाजी वाघळे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ग
गंगाधर मुटे Sun, 03/31/2013 - 12:40 नवीन
मजा येत आहे वाचायला !!
  • Log in or register to post comments
र
राही Sun, 03/31/2013 - 13:19 नवीन
बहुच गम्युं. वांचता रहिये छिये. लखता रहे जो.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Sun, 03/31/2013 - 18:00 नवीन
झक्कास :)
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 03/31/2013 - 19:23 नवीन
चांगलंय पण मराठी संस्थळावर संस्कृत कशासाठी हा परश्न म्यां पामरासि पडलां असे.. कृरामान.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा