" डराव डराव -"
टकमक टकमक बघत बघत
डोळे मोठे आणखी करत
येता जाता डराव डराव
का ओरडता बेडूकराव
तुमच्या उड्या टुणूक टुणूक
चपळाईची मस्त चुणूक
अंगणातल्या डबक्यात
किती करता बाहेर आत
पाण्यात जास्त भिजू नका
डराव डराव गर्जू नका
सर्दी पडसे झाल्यावर
खोकत बसता काठावर
औषध कधी घेत नाही
डराव डराव थांबत नाही
झोपू द्या ना शांत आम्हाला
नाहीतर सांगीन नांव आईला !
💬 प्रतिसाद
(1)
आ
आतिवास
Fri, 03/15/2013 - 09:23
नवीन
छान आहे बालकविता.
- Log in or register to post comments