Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाड्यातील भांडणे-भाग १

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 03/14/2013 - 08:54
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी http://mimarathi.net/smile/vroam.gif) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी. म्हणुन हे गीत-कुंजन ;) चालत चालत जिन्यातुन जाता बादली बदकन सांडली वरच्या मजल्या वरची शिंदिण देशपांड्यांशी भांडली॥धृ॥ का गं मेले फुटले डोळे,बघून चाल्तीस कोठे??? अत्ता भरूनी आणली बाद्ली,घालू का डोक्यात गोटे कशी मेलि ती अवचित वेळी,येथे येउन उलथली...॥१॥ ठाऊक आहे तुझा हा तोरा,भारी शिस्तिची तू तुझ्या कार्ट्याने टुथपेस्ट लाऊन,जिन्यात केली थू थू तिथेच घसरून पडले मी ना,यात मी काय चूक केली? ॥२॥ दहा ला गं पाणी गेले,अता कोठूनी आणू??? एकच हंडा घरी राहिला,कुणाच्या डोक्यात हाणू येकच बाद्ली र्‍हाय्ली होती,ती बचकन तू सांडली...! ॥३॥ असु दे आता घेऊन जा ग, माझ्या घरनं पाणी डोके दुखले ऐकून तुझी ही ,सक्काळी सक्काळी पिपाणी एका बादलिनी माझी इश्टेट,कुठे गं खाक्कन जळ्ली?...॥४॥ ठेव तुझी ती बाद्ली तुलाच,घे डोसक्यावर ओतून मि ही पाणी ड्र्मातले काढीन,भरलाय तो काल पासून जा जा तुझे उपकार नको,इश्टेट तुझिही कळ्ली..! ॥५॥ ========================================================== या नंतर सदरहू दोन्ही महिला...एकमेकिस... ''ह्हूं...!!!'' असा केवळ स्त्रीजन्य आवाज काढून हुसकाऊन लावल्याच्या आनंदात घरी गेल्या...पुढे संध्याकाळी काय जाहले... ते पुढिल भागात पाहू ;-)

प्रतिक्रिया द्या
12767 वाचन

💬 प्रतिसाद (57)
प
प्रचेतस गुरुवार, 03/14/2013 - 09:19 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. महान आहात.
का गं मेले फुटले डोळे,बघून चाल्तीस कोठे??? अत्ता भरूनी आणली बाद्ली,घालू का डोक्यात गोटे
Image removed. काय हे हिंसक विचार.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 03/14/2013 - 23:36 नवीन
वा वा!! बुवा नॉस्टॅल्जिक केलंत तुम्ही. तुमच्या या वाड्यातील भांडणांवरून मला आमच्या चाळीतली नळावरची भांडणं आठवली.
  • Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची गुरुवार, 03/14/2013 - 23:56 नवीन
हा हा हा आवडले भांडण . =))
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Fri, 03/15/2013 - 03:58 नवीन
फारच सभ्य भाषा. :-)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/15/2013 - 10:01 नवीन
कुणाची?????????????? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
अ
अन्या दातार Sat, 03/16/2013 - 18:35 नवीन
एकंदरीतच या भांडणातली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ल
लीलाधर Fri, 03/15/2013 - 04:07 नवीन
पुढे संध्याकाळी काय काय जाहले हे प्ण लौकरच सांगा ओ :)) खर्र्च आप्ण महाण आहाट.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 03/15/2013 - 04:54 नवीन
फारच सौम्य शब्दात भांडण. मी यापेक्षाही भन्नाट भांडण पाण्यावरून ते ही स्त्री व पुरूषात झालेले पाहिले आहे. ( तळेगाव येथे १९६६ चे सुमारास )पण पाण्यावरूनचे खरे भांडण ऐकावयाचे असेलच तर फर्गसन मागची झोपडपटी, भैय्यावाडी शिवाजीनगर किंवा काशेवाडी भवानी पेठ येथे जाउन ऐकावे. ऐसी अक्षरे कलहे जी जहराते पैजा जिंकी चा अनुभव येईल.
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Fri, 03/15/2013 - 07:32 नवीन
धम्माल आहे सगळीच. शेवटची ओळ तर कहर आहे ( प्रतिक्रिया देताना दृपाल, मेंटेनन्स अशा शत्रूंचा वारंवार सामना करावा लागला )
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 03/15/2013 - 07:35 नवीन
भांडणपुष्पे काव्यसूत्रात ओवण्याचे कौशल्य झकास हो बुवा !
  • Log in or register to post comments
प
प्राकृत Fri, 03/15/2013 - 08:17 नवीन
हसुन हसुन पुरेवाट :D
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 03/15/2013 - 08:27 नवीन
मजेदार. :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/15/2013 - 09:38 नवीन
:)) :)) :))
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 03/15/2013 - 09:46 नवीन
हसून हसून मेले........................ सांजसंध्या म्हणते तसंच बरेच दिवसांनंतर दृपल आणि मेंटेनन्सच्या पाट्या न दिसता थेट मिपा दिसलं आणि उघडलं तर हे भन्नाट जलकाव्य वाचायला मिळालं त्यामुळे जीव पाण्याच्या [रिकाम्या] बादलीत पडला. :D :D :D
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 03/15/2013 - 09:51 नवीन
:) मजा आली वाचून!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 03/15/2013 - 10:04 नवीन
=)) =)) =)) मह्हान, निव्वळ महान आहात बुवा. दंडवत स्वीकारावा _/\_
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 03/15/2013 - 10:10 नवीन
दुसरा अंक कधी?
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 03/15/2013 - 10:37 नवीन
बायका इतक्या शांतपणे भांडत नाहीत हो आणि पाण्याबद्दलचं भांडण असेल तर नाहीच नाही. अवांतरः भांडणारी 'शिंदीण' असल्यामुळे हा सभ्यपणा आला असावा का?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/15/2013 - 11:01 नवीन
@भांडणारी 'शिंदीण' असल्यामुळे हा सभ्यपणा आला असावा का?>>> =)) काय मेली लोकं एकेक सूड घेतात नै? :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
जेनी... Fri, 03/15/2013 - 11:20 नवीन
हिहिहि गुर्जि भांडायला कधी यु मग ??? ;) मत्त मत्त भांदण =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/15/2013 - 11:33 नवीन
ह्हीह्हीह्ही Image removed. भांडखोर अजाण बालिके... तू येण्णाल माज्याशी भांदायला? Image removed. पैज आप्ली..तू आलिस तर Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
प
प्रचेतस Fri, 03/15/2013 - 11:57 नवीन
पवारीण बै दिवेकरीण बैंशी भांडायला येतील ओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
पैसा Fri, 03/15/2013 - 12:00 नवीन
कुठेत दिवेकरीण बै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 03/15/2013 - 12:03 नवीन
येतील की लवकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेनी... Fri, 03/15/2013 - 14:11 नवीन
:-/ शी बै :-/ कित्ती प्रेमाने विचारलं होतं यु का भांडायला म्हुण :-/ दीवेकरीन येनार असेल तं आपली सपशेल मागार :-/ मेली खुप घाण शिव्या देते :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेनी... Fri, 03/15/2013 - 20:21 नवीन
सॉरी हं .. ही दीवेकरीण म्हणजे गुर्जिन्ची बायकू हे खुप उशिरा लक्षात आलं .. तरिपण जर दीवेकरिण पवारीण बैंशी भांडली तर ते भांडण असं होईल : अगं सटवे कितीदा सांगितले , नादी लागु नकोस तु माझ्या ह्यांना सांगितले तर यंदा गणपतीस जाणवे कोण घालील गं तुझ्या ??? भदाड्या अंगाच्या ठुमक्यानं तु मुद्दामच बादली माझी सांडली अन जगाला वाट्टेल आता कि ही दीवेकरीणच पवारणीशी भांडली || धु || =)) स्वारी बर्का गुर्जि ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
अ
अभ्या.. Fri, 03/15/2013 - 20:35 नवीन
=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ब
बॅटमॅन Fri, 03/15/2013 - 12:13 नवीन
असं नै विचारायचं आत्मूस. मिपाची परंपरा विसरला काय? "पुजा मझ्यशि भंदन कर्नर कं" :P :P =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/15/2013 - 12:30 नवीन
+P :)) +P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्यारे१ Fri, 03/15/2013 - 12:58 नवीन
बुवांचे आब्जर्वेशन लय भारी हे!
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Fri, 03/15/2013 - 14:25 नवीन
त्या स्मायल्या कशा टाकायच्या यावर एक धागा टाका, त्यांचे उगमस्थान, उत्क्रांती, प्रगती आणि काय ते करंट मस्त सारखे तपशीलवार येऊ दे.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Fri, 03/15/2013 - 18:00 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 03/15/2013 - 18:37 नवीन
च्यायला. :-D
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 03/15/2013 - 19:26 नवीन
सभ्य जल-भांडणकाव्य आवडले.. अवांतर- आमच्या एका गुर्जींचा किस्सा आठवला. ते त्यांच्या लहाणपणी म्हणे नळावरच्या भांडणाच्यावेळी कागद-पेन घेऊन बसले होते म्हणे, चकमकीतल्या अस्सल म्हणींना टिपून घ्यायला.. :-D . भांडण झाल्यावर त्यांच्या आजींना वही दाखवली, तर बदडला त्यांना..
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 03/15/2013 - 19:41 नवीन
ते त्यांच्या लहाणपणी म्हणे नळावरच्या भांडणाच्यावेळी कागद-पेन घेऊन बसले होते म्हणे, चकमकीतल्या अस्सल म्हणींना टिपून घ्यायला.. :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
ब
बॅटमॅन Fri, 03/15/2013 - 20:48 नवीन
+१. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
आ
आदूबाळ Fri, 03/15/2013 - 20:30 नवीन
व्यासंग व्यासंग म्हणतात हो हाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
अ
अभ्या.. Fri, 03/15/2013 - 19:33 नवीन
वरच्या मजल्या वरची शिंदिण देशपांड्यांशी भांडली
काय झाले होते रे किसना? जाउदे चल आपण हाटीलात जाऊ आपल्या. :)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 03/15/2013 - 19:35 नवीन
बुवा, वाड्याच्या जिन्यावर पण लिहा आणि सार्वजनिक फळ्यावर पण.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 03/15/2013 - 19:42 नवीन
वाड्याच्या जिन्यावर पण लिहा
जिन्याखाली पण विसरु नका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/16/2013 - 04:39 नवीन
@जिन्याखाली पण विसरु नका.>>> Image removed. तो विषय दीर्घकाव्याचा आहे,असल्या नव्हे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
त
तुमचा अभिषेक Sat, 03/16/2013 - 08:46 नवीन
हा हा हा.... जबरी आहे... आठवनी जाग्या झाल्या.. :) नशीब काव्यकविता म्हणून दुर्लक्षिले नाही गेले माझ्याकडून..
  • Log in or register to post comments
श
श्रिया Sat, 03/16/2013 - 19:12 नवीन
मजेदार आहे कविता.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Mon, 03/18/2013 - 14:26 नवीन
आवड्ल्या गेले आहे
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 03/18/2013 - 16:48 नवीन
भांडु या सौख्यभरे ! पुढचं भांडण कशावरून होणार आहे म्हणे? :)
  • Log in or register to post comments
प
पप्पु अंकल Mon, 03/18/2013 - 16:56 नवीन
सत्यनारायण सांगताना अचानक सुर्सुरी आली (कविता करण्याची) तर जरा जपुन हो मालक बाकी धमाल आली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/18/2013 - 18:45 नवीन
मास्टर ब्लास्टर - वृत्तराज - मिस्टर.बॅटमॅन ऊर्फ वाघुळशास्त्री यांनी आमच्या काव्यकिड्याला वृत्तात नीट-बसवून त्याचा पतंग न होता एकदम Fullपाखरू केले आहे. ;-) मला त्यांनी व्यनीतून पाठवलेला हा अप्रतिम रचना प्रकार आपल्या आस्वादासाठी सादर करत आहे. ============================================================================== @वृत्तराज मास्टर ब्लास्टर.बॅटमॅन ऊर्फ वाघुळशास्त्री पुनर्रचित- =============================जलाष्टक=================================
चालः आली लग्नघटी समीप नवरा
जातां चाळजिन्यातुनी लगबगी, जैं बादली सांडली | तेव्हा येवुनि देशपाण्डिणिसवे, शिंदीण ती भांडली ||धृ.|| डोळे ते जणु पूर्णतःचि फुटले, आहे पुढे लक्ष का? आत्ता आणलि बादली भरुनिया, गोटे शिरी घालु का? मेली ही इकडे कशी कडमडे, आत्ताचि ऐशा पळीं...||१|| तोरा तो तव सर्व ठाउक मला, भारीच शिस्तीचि तू कार्ट्याने तव टूथपेस्ट गिळुनी , केली जिन्याते थु-थू मी तेथे पडले पहा घसरुनी, ही चूक का जाहली? ||२|| गेले ते जल वाजती जधि दहा, आणू कुठूनी अता? हंडा एकचि जो घरी मम; शिरी हाणू कुणाच्या अता? होती एकच बादली तवगुणे तीही अशी सांडली ||३|| आसो देचि अता; घरोन मम तू घेवोन पाण्यासि जा प्रातःकाळि पिपाणि ऐकुनि तुझी डोस्क्यास होई सजा एका बादलिने जणों मम पुरी इष्टेट का नष्टली? ||४|| ठेवी गे तव बादली तुजसवे, घे मस्तकी ओतुनी काढी थांब जळा ड्रमामधुनिया, जो पूर्ण काल् पासुनी नक्को जा, उपकार ते तव, तुझी इष्टेट ती दीसली ||५|| ऐसे भांडण भांडिता उभयतां "हूऽ" कार तो काढुनी गेल्या त्या परि एकमेक जणु हो निष्कासनें मोदुनी ;-) ==== बोला सुमुर्त ब्याट-म्यान ;-)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 03/18/2013 - 19:03 नवीन
=)) =)) भौराया भारी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अभ्या.. Mon, 03/18/2013 - 21:45 नवीन
भौराया ह्याला काय शार्दूलविक्रीडीत का काय म्हणायचे रे? ते मासाजासतताग जुळतेत की बरोब्बर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ब
बॅटमॅन Mon, 03/18/2013 - 21:59 नवीन
एग्झॅक्टली!!! तेच आहे ते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा