Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हा दोष ना कुणाचा (कविता)

स — सांजसंध्या, Fri, 03/15/2013 - 07:37
गर्वास झोडपावे, हा दोष ना कुणाचा प्रशंसुनी स्वत:ला, घ्या रोष का कुणाचा जे काम ज्यास येते, त्यानेच ते करावे स्नायू फुगून मेले, हा जोश का कुणाचा माझ्याच उल्लेखाने, भरल्यात या कविता दिसते छबी स्वत:ची , आक्रोश हा कुणाचा सांगून ना कळाले, शब्दांतले इशारे नादान पोर आहे, बेहोश हा कुणाचा शब्दांत शांत माझ्या, काव्यात ली झळाळी सहजी उठून आली, हा दोष का कुणाचा तरवार धार ज्यांची, स्नेह्यांसही दिसावी घायाळ तेच व्हावे, हा दोष का कुणाचा - संध्या (एका ठिकाणचा वृत्तभंग चालवून घ्याल ही आशा )

प्रतिक्रिया द्या
2581 वाचन

💬 प्रतिसाद (16)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 03/15/2013 - 07:52 नवीन
जे काम ज्यास येते, त्यानेच ते करावे स्नायू फुगून मेले, हा जोश का कुणाचा
ह्याला तोडच नाही. __/\__
एका ठिकाणचा वृत्तभंग चालवून घ्याल ही आशा
वृत्तापेक्षा, आशय महत्वाचा. अर्थगर्भ रचना.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Fri, 03/15/2013 - 09:20 नवीन
कविता आवडली. ( पण कशाचे तरी विडंबन असल्यासारखं वाटतं आहे - तो संदर्भ लक्षात नाही आला!)
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Fri, 03/15/2013 - 12:55 नवीन
विडंबन नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/15/2013 - 09:57 नवीन
सांगून ना कळाले, शब्दांतले इशारे नादान पोर आहे, बेहोश हा कुणाचा--- Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 03/15/2013 - 10:48 नवीन
आवडलि
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/15/2013 - 10:49 नवीन
आनंदकंद वृत्त का?
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Fri, 03/15/2013 - 12:56 नवीन
बरोबर आहे. आनंदकंद वृत्तच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सांजसंध्या Fri, 03/15/2013 - 12:57 नवीन
आभार सर्वांचे
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 03/15/2013 - 12:58 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
स
साऊ Sat, 03/16/2013 - 01:59 नवीन
मला वृत्त येत नाही. हे वृत्त कस लिहायच?
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 03/16/2013 - 02:02 नवीन
सांगून ना कळाले, शब्दांतले इशारे नादान पोर आहे, बेहोश हा कुणाचा---
हे खासंच..
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 03/16/2013 - 20:40 नवीन
छानच आहे, आवडली. :)
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 03/13/2015 - 08:44 नवीन
निव्वळ सुरेख
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/13/2015 - 09:36 नवीन
+++१११ पुन: पुनर्वाचनीय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच
स
सांजसंध्या Fri, 03/13/2015 - 09:47 नवीन
ओह ! मी विसरून गेले होते. अमोल, तृप्त आत्मा - धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ज
ज्योति अळवणी Fri, 03/13/2015 - 20:23 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा