Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिवे देत नाही

स — सांजसंध्या, Sat, 03/16/2013 - 08:53
काल एका कवीच्या, गाली होत्या खळ्या चष्मा उचलून म्हटले "ते", अल्सर आहे खुळ्या पुन्हा होती कवितेत, काळजामधे चिता पुस्तक काढून म्हटले ते, पोर्शन कुठे होता जास्वंदीच्या ओठांना, भुंगा दंशून गेला स्केच काढून म्हणाले, ओठ कुठे गेला मी ही आता ठरवलंय, हुश्शार जरा होऊ लपून छपून झाडीमधे, टोचा मारत जाऊ.. कविता आता शिकणारै, मेडीकलला जावून कथा लिहून देईन बाई, टॅलीक्लास लावून तरीदेखील म्हणेल कुणी , हद्द झाली बाई म्हणेना का लगेच आम्ही, दिवे देत नाही - संध्या अवांतर :कवितेत काही शास्त्रीय चुका असतील तर कळवाव्यात ही नम्र विनंती. अतिअवांतर :दिवा घेणे हा शब्दप्रयोग अन्यत्र हलकेच घ्यावेसाठी रूढ आहे. टेक इट लाईटली मधल्या लाईटचे हलकेच आणि दिवे असे दोन्ही अर्थ अशा रितीने काही ठिकाणी वापरात आहेत. खुलासा फक्त संदर्भ म्हणून

प्रतिक्रिया द्या
2032 वाचन

💬 प्रतिसाद (13)
स
सांजसंध्या Sat, 03/16/2013 - 08:55 नवीन
इतरपापफ़लानि यथेच्छया विलिख तानि सहे चतुरानन अरसिकेषु कवित्त्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख ( चक्क ढापलंय. :फिदी: अर्थ विचारू नये )
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 03/16/2013 - 09:32 नवीन
>>>खुलासा फक्त संदर्भ म्हणून ब्वार्र !
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 03/16/2013 - 11:42 नवीन
मा लिख मा लिख मा लिख अलख अलख अलख
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 03/16/2013 - 18:58 नवीन
लाईटचे हलकेच आणि दिवे असे दोन्ही अर्थ ........... अल्सर च काय??/
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Sun, 03/17/2013 - 04:01 नवीन
अल्सर ही फ्रेज नाही. एका वाचकाने (मिपावर नाही ) सिरीयसली विचारलंय. खळ्या गालाच्या आतल्या बाजूला कि बाहेर पडतात ? त्याला दुस-याने उत्तर पण दिलंय कि त्याला अल्सर म्हणतात. :फिदी: आतल्या बाजूस खळ्या पडल्या तर गालाला तोंड नसते का म्हटले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
प
पैसा Sat, 03/16/2013 - 19:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/16/2013 - 19:48 नवीन
काल एका कवीच्या, गाली होत्या खळ्या चष्मा उचलून म्हटले "ते", अल्सर आहे खुळ्या > Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 03/17/2013 - 12:07 नवीन
शब्द उगा ओढून ताणून जुळवल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 03/18/2013 - 10:45 नवीन
काही कळलं नाही.
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 03/18/2013 - 10:50 नवीन
कैच कल्ला नाय ********** आजचा सुविचारः अ‍ॅब्स मारा, पण दणकून !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मनीषा Mon, 03/18/2013 - 16:41 नवीन
मी ही आता ठरवलंय, हुश्शार जरा होऊ लपून छपून झाडीमधे, टोचा मारत जाऊ..
:) ही आयडीया भारी आहे.
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Tue, 03/19/2013 - 04:48 नवीन
धन्यवाद सर्वांचे सूड, स्पा हा दोष माझा. इथे संदर्भ माहीत नसल्याने असं होणं शक्य आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 03/19/2013 - 13:32 नवीन
वण लायणर आवडले पण संदर्भ कळ्ळा नै कैच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा