Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आई शप्पथ सांगतो...

य — यसवायजी, Sat, 03/16/2013 - 20:49
प्रेमात धड-पडायचंय म्हणता म्हणता पडलो एकदाचा.. नव्हे, चांगला आपटलोच. हाडं खिळखिळी झाली.. पार चेंदा-मेंदा झाला.. बरं झालं म्हणा.. यातुनच शिकायला मिळतं.. पण अशी का वागली ती??? A ---------------------------------------------- तीचं लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले.. रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले.. :( तीनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही.. नसेल जाण, तर गेली उडत.. मी खैर करणार नाही.. पण आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही.. पहिल्यांदा Canteen  मध्ये पाहिलं तिला, च्यायला काय दिसत होती... अरे कत्रीना सुद्धा झक्क मारेल मित्रा,  अप्सरा जणू भासत होती.. मी 'आ' वासून बघत राहिलो... तसं अख्खं कॉलेजच चाट पडलं होतं.. माझ्या त्या Boring life मध्ये, काहीतरी Interesting घडलं होतं.. पण.. आता हा सलमान, आठवणीत 'ती'च्या, रात्रंदिवस झुरणार नाही..  आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही.. Science क्लासमध्ये ओळख झाली, अन् चक्क ती माझ्या नजदीक आली, DARING करून मारला propose...  ती लाजून 'इश्श' म्हणाली..                  (ती तिकडे 'इश्श'..   आम्ही इकडे 'खुश्श'..  ;D ) अहो काय SIXER मारली होती आपण?..'युवी'ने सुद्धा सलाम ठोकला असता.. पण चुकून नाही म्हणाली असती.. सांगतो.. माझा YORKER हुकला असता.. अहो.. पण प्रेम म्हणजे काय ..'twenty-20' MATCH वाटली का तीला??..की झटपट उरकून निघून गेली. जन्मभराची 'कसोटी'... पण स्वतः 'RETIRED' आणि मला 'HURT' करून गेली.. पण माझी HIT-WICKET पुन्हा कोणी, आता जन्मात घेऊ शकणार नाही.. कारण.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही.. सारस-कात्रज बाग तर सोडाच... आम्ही Z-BRIDGE सुद्धा  सोडला नाही.. ;) खर तर वडा-पाव चे वांदे.. पण मी.. चकार शब्द सुद्धा काढला नाही.. अख्ख्या CLASS ला PARTY दिली ..आता  ती, त्यांची होणारी (?) वहिनी होती... सकाळी E-SQUARE- संध्याकाळी Mc-D, साला.. तीची मात्र चैनी होती.. पै-पै'चा हिशोब मागावासा वाटतोय.. पण  तसलं काही करणार नाही.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही.. काय झालं असेल हो? का सोडलं असेल मला? खऱ्या प्रेमाची किंमत कळली नसेल का तीला? खरतर अजूनही मी तीच्यावरच जीवापाड प्रेम करतोय.. प्रेत्येक श्वास घेताना तीचीच आठवण काढतोय.. एकदा भातुकली मोडलीय.. आता परत खेळ मांडणार नाही.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही.. म्हणतात आयुष्यात हरून जगायचं नसतं.. काहीही झालं तरी निराश व्हायचं नसतं.. मी सुद्धा आता तिच्याच STYLE न जगायला शिकीन.. पण प्रेम या शब्दापासून चार हात अंतर राखीन या पोरींच काही सांगता नाही येत.. कधीही CHOICE बदलू शकते आणि माझ्या सारख्या देवादासांची दररोज भर पडू शकते :( ---------------------------------------- -SYG-

प्रतिक्रिया द्या
1533 वाचन

💬 प्रतिसाद (5)
अ
अभ्या.. Sat, 03/16/2013 - 20:56 नवीन
=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sun, 03/17/2013 - 11:51 नवीन
वास्तववादी कविता :-)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 03/17/2013 - 17:27 नवीन
ते विसरून परत प्रेमात पडा परत!दिल सलामत तो कतरिना पचास!! :D
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Mon, 03/18/2013 - 16:07 नवीन
>> दिल सलामत तो कतरिना पचास >> क्या बात कही है.. मला वाटलं, दिल सलमान तो कतरिना पचास ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पक पक पक Mon, 03/18/2013 - 09:09 नवीन
:) :) :) लै भारी..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा