Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भीषण दुष्काळ...

न — निश, Mon, 03/18/2013 - 06:38
गेलो होतो असाच एकदा कामासाठी ऐका गावी जिकडे तिकडे नुसतीच धुळ पाण्याविना करपली होती शेत, हिरवाई जरासुध्दा नाही. लागली होती तहान म्हणुन ठोठावले एक दार म्हटले, ताई द्याल का पाणी भागवावयास तहान ? ताई घरात वळली डोळ्यात तिच्या आसवांची दाटी. थोडसच पाणी घेऊन ती बाहेर आली. म्हणाली ऐव्हढच आहे पाणी, ठेवल होत लेकरासाठी, ते देते आहे तुम्हाला. तहानलेल्याला पाणी देण पुण्य मानतो आम्ही. ऐव्हढच पाणी का ते मात्र विचारु नका नदी कधीच आटली बघा जगण आता सोसवत नाही. सरकारी मदतीसाठी धनी गेले आहेत तालु़क्याला आमच्या वाटणीच पाणी दिल मंत्र्याच्या कारखान्याला. हे सांगताच ती माय धाय मोकलुन रडली पाण्यासाठी तिची वणवण मला रडवुन गेली. मन तेव्हापासुन खरच उदास आहे. पाण्याविना लागले लोक देशोधडीला, तरी सरकारी यंत्रणा झोपली आहे. इतका भीषण दुष्काळ असा कधी पडला नव्हता माणुस़कीचा झरा सुध्दा ह्या दुष्काळात आटला होता. माणुस़कीचा झरा सुध्दा ह्या दुष्काळात आटला होता.....

प्रतिक्रिया द्या
1820 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पक पक पक Mon, 03/18/2013 - 09:02 नवीन
व्वा !! मस्त आहे... :)
  • Log in or register to post comments
न
निश Mon, 03/18/2013 - 13:39 नवीन
पक पक पक साहेब, तुमचे मनापासुन आभार. दुष्काळग्रस्त लोकांच्या समस्या लवकरात लवकर संपाव्यात अस देवाला साकड घालुयात व त्या संपाव्यात म्हणुन आपणही प्रयत्न करुयात.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/18/2013 - 13:42 नवीन
माणुस़कीचा झरा सुध्दा ह्या दुष्काळात आटला होता. अप्रतिम् केवळ !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 03/18/2013 - 17:25 नवीन
:(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा