Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झुक झुक गाडी -(बालकविता)

व — विदेश, Mon, 03/18/2013 - 10:17
मित्रांनो या, मैत्रिणीनो या एकामागे एक उभे राहूया - दंगामस्ती कमी करूया झुकझुकगाडी खेळ खेळूया , दादा ड्रायव्हर पुढे नेहमी सर्वामागे गार्ड हजर मी - हिरवी निशाणी दाखवली दादाने कुकशिटी वाजवली - भाकचुक भाकचुक भाकचुक भाकचुक ! धुराविना ही धावते गाडी रुळाविना ही पळते गाडी - जिथून निघालो तिथे जाणार सांगा आणखी कोण येणार ? इथेच सगळयाना फिरवीन गोलगोल चकरा मारीन तीन - भाकचुक भाकचुक भाकचुक भाकचुक ! सिग्नल नाही- स्टेशन नाही गाडी चकरा मारत राही - छान छान आवाज गाडीचा गोंगाट सगळ्यांच्या आवडीचा , आपल्या तीन चकरा झाल्या सगळे तयारीत रहा.. उतराया , फुर्रर्रर्र शिट्टी मी वाजवली झुकझुकगाडी ही थांबवली - भाक चूक भाक चूक भाक चूक भाक चूक ! .

प्रतिक्रिया द्या
1648 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
पैसा Mon, 03/18/2013 - 11:55 नवीन
मजेशीर गाडी आहे!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 03/31/2013 - 12:36 नवीन
भाक चूक भाक चूक भाक चूक भाक चूक ! छान बालगीत.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 03/31/2013 - 15:41 नवीन
सुंदर बालगीत!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा