कवितेचे शिर्षक आहे: मिठी
कातर क्षण, अस्थिर मन
द्यावे झोकून, तुझ्या मिठीत
गुंतता हृदय, निष्काम प्रेममय
अविरत लय, तुझ्या मिठीत
अनावर प्रीती, ओढ सांगाती
प्रेमधारा वर्षति, तुझ्या मिठीत
श्वास गुंफले, द्वैत सरले
भानही नुरले, तुझ्या मिठीत
काहूर थमले, मन सावरले
मेघही बरसले, तुझ्या मिठीत
आधार भावनिक, बळ आत्मिक
आश्वासन प्रेरक, तुझ्या मिठीत
💬 प्रतिसाद
(5)
त
तर्री
Tue, 03/19/2013 - 10:41
नवीन
शीर्षक आकर्षक आहे.....
- Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ
Tue, 03/19/2013 - 10:44
नवीन
+१
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Tue, 03/19/2013 - 10:53
नवीन
थमले हा शब्द जरा खटकतोय.
बाकी अभिव्यक्तीत अजून जरा नेमकेपणा आणता आला असता. पुढील लेखनास शुभेच्छा.
- Log in or register to post comments
इ
इनिगोय
Tue, 03/19/2013 - 16:52
नवीन
काहूर शमले?
शेवटचं कडवं वाचताना थोडं अडखळायला होतंय. बाकी कविता छान आहे.
पुलेशु.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Wed, 03/20/2013 - 01:25
नवीन
प्रेरक आश्वासित, तुझ्या मिठीत.
असं चालेल?
- Log in or register to post comments