पाककृती
तिरफळाची बांगड्याची आमटी.
Primary tabs
साहित्यः-१)५-६ ताजे बांगडे.
२)१०-१२ लाल मिरच्या.
३)हळद्पूड.
४)खवलेला नारळ(अर्धा नारळ)
५)५-६ आमसुले.
६)८-९ तिरफळे.
७)मीठ.
८)एक चमचा धणे.
कॄती :-बांगड्याचे तुकडे करून घ्यावे.खवलेले खोबरे,मिरच्या,धणे,हळद एकत्र वाटावे.वाटण आमटी करणार त्या
भांड्यात काढून घ्यावे.त्यात मीठ व ठेचलेली तिरफळे घालून शिजत ठेवावे.उकळायला आले की त्यात
बांगडे व आमसुले घालावी.व आमटी चांगली उकळून घ्यावी.
तिरफळे म्हणजे काय..?
इथे मिळेल.
विकत कुठे मिळते हे सांगाल का जरा??
आणि एरवी पण कोणत्या पदार्थात वापरता येईल???
शेजवान पेपर
पण बांगडा आवडत नाही :(
अग मिळत नाही की गं बांगडा येथे.
काय चव असते बांगडयाला. आहाहा!
मी भरलेला बांगडा येथे टाकला होता. मला खुप आवडते बांगड्याचा रस्सा अन भात खायला.
वाईट वाईट अवस्था झाली माझी.
चव चांगली असते पण लैच काटे असतात.. :-(
नीट मन लावून खाता येत नाही.. त्यामुळे चव आवडत असूनही हा मासा खायला कंटाळा येतो.
एकदा काटे कुठे असतात ते माहित झालं की काही प्रश्न उरत नाही.
चपट्या कडा जिथे संपतात त्या दोन्ही बाजुला छोट्या काट्यांची एक रांग असते ती एका फटक्यात निघते.
मग उरला मधला मोठ्ठा काटा तो बांगडा अर्धा उकलुन काढुन घ्याय्चा, आहे काय त्यात.
लैच काटे असल्यामुळे नीट मन लावून खाता येत नाही पण काटे काढले कि एकदम चवीष्ट मासा.....भरलेला बांगडा तर अप्रतीम.....अपर्णा तुझी भरलेला बांगड्याची लिंक दिलीस तर ह्या वीकेंड ला करिन म्हणतोय :)
http://www.misalpav.com/node/15638
कुवेतला बांगडे मिळतात? फारच नशिबवान ब्वा तुम्ही.
खावा खावा बांगडा खावा, भाकर्या हाणा.
आम्ही आप्ले बसतो सुरमाई, कोलंबी करत.
लिंक पाहिली आणि रेसीपीची प्रिंटाआउट घेतली आहे. अगं कुवेत मधे काय मीळत नाहि? पण आपण बाबा खायला आणि करायला सोपे अशाच माशांच्या वाटेला जातो...पापलेट, सुरमई, कोलंबी आणि कधी कधी बांगडा ह्या पलीकडे आपली उडि नाय :D
खूप काटे असल्यामुळे आवडत नाही :(
माझी फेव्ह आमटी :)
तिरफळे म्हणजे काय
बांगड्याची आमटी अॅप्लाइड आर्ट्स मधे मोडते.
=)) =)) =))
आयला! हे आमचं मास्तर म्हणजे लै डेंजर बाबा! कधी कुठं काय टाकतील काय सांगता यायचं नाही.
-(एम.ए. (अप्लाईड आर्ट्स) ऑनर्स) धम्या.
मलाही बांगडा आवडतो. मस्त वास सुटतो तळल्यावर. अन रश्श्याचाही.
च्यायला काल बांगडा स्वप्नात आला होता आणि आज बघतो तर मिपावर हजर. :)
बादवे बांगड्याला 'फार' काटे असतात हे वाचून 'फार' गंमत वाटली.
यांना कुणी तरी कर्ली, काटेरी दाखवारे रे. ;)
यांना कुणी तरी कर्ली, काटेरी दाखवारे रे.कुनीतरी काहून..? तूच कर की एखादी रेशिपी. ;-)
ईथे असले उत्तम मासे मिळत नाहीना राव. :(
नायतर मीच नसते का दिले.
>>यांना कुणी तरी कर्ली, काटेरी दाखवारे रे.
नाय तं काय. =))
नुसता फोटो बघुनच तोंडाला पाणी सुट्ले...
मस्तच पाकृ.. पण इथे तिरफळे मिळणे अवघड.. :(
आधीच बांगडा ... त्यात तिरफळाच्या कालवणातला!
तों पा सु हे शब्द खूपच तोकडे आहेत सध्याच्या अवस्थेचं वर्णन करायला...
फोटो एकदम सॉल्लिड आलाय!आणि आमटीचा रंग पण खास!
आमटीचा रंग पण खास!
खरच! असल जेवण जेवायला हाताची बोटच चवदार लागतात. चमच्याने वगैरे अजिबात चव येत नाही.
आई ग! मी चक्क मिटक्या मारते आहे इथे बसुन त्या रश्श्याकडे बघुन.
धन्यवाद !!
मला पण बांगडा फार काही आवडत नाही म्हणुन फक्त रेसेपी बघुनच खुश होणार :)
बांगडा सुबेस गो. बाय.
बांगड्याची आमटी तीही तिरफळाची....व्वा! अगदी खासमखास बेत म्हणा की.
सुट्टीच्या दिवशी सणकून भूक लागली असावी बांगड्याची तिरफळंवाली आमटी, वाफाळणारा पांढराशुभ्र भात आणि एकतरी तळणीतली तुकडी.....नंतर तीनेक तास तरी, भणाणत्या पंख्या खाली, अगदी व्यत्यय विरहीत झोप. स्वर्ग..स्वर्ग म्हणतात तो तरी असा काय असतो?
काकानु...एकतर आधी तो वर पाककृतीत टाकलेला फोटू, वर आणि तुम्ही केलेलं हे वर्णन...च्यायला, माझी गत म्हणजे 'नको देवराया अंत असा पाहूऽऽ' अशी झाली हो!
वा वा काय जीवघेणा फोटो आहे.
यम्म.
छान दिसत आहे..
ह्यात फोडणी वगैरे साठी तेल वापरावे लागत नाही का? मला बनवायची आहे ..तुमच्या व्यतिरिक्त इतर सदस्यांनी उत्तर दिले तरी चालेल ..
नाही. ह्यात तेल, लसूण वापरत नाहीत. त्यामुळे माशाची चव जास्त उठून येते.
एक पर्यायी पाककृती म्हणून, आवडत असल्यास, कालवण तयार झाल्या नंतर २ मोठे चमचे (टेबल स्पून) खायचे खोबरेल तेल तापवून त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा परतून ते तेल नुसते वरून ओतायचे. त्याचीही एक आगळी वेगळी आणि मस्तं चव येते कालवणाला.
रंग अप्रतीम. च देखिल तशीच असणार.
बहुतेक मी बांगड्याला अॅलर्जीक आहे. तेंव्हा रावस ,सुरमई किंवा पापलेट सारखा दुसरा मासा चालेल का?
या बांगड्याच्या कालवणाला कारवारकडे हुमण असे म्हणतात..
अतिशय चविष्ट असते ..आणि शिवाय लो कॅलरी :)