Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भावओली

अ — अज्ञातकुल, Wed, 03/20/2013 - 04:58
गहिवरले नभ भिजले कातळ भोर नवीन उगवली वियोगव्याकुळ तरिही मन; का नयने आतुरलेली ? कुंद सभोवर स्तब्ध चराचर प्रतिमा हिरमुसलेली खोल दर्पणी ध्यास एक मज; स्मितरेषा का पुसलेली ? दूर कुहुक जणु आर्त शोडषी पर कातरलेली गूढ व्यथित आभास स्पंदने पथी विखुरलेली कळे न का असुनी नसलेपण; आभा व्यापलेली भेटीस्तव हुरहुर बहुधा ही; कळा भावओली ..............................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
3282 वाचन

💬 प्रतिसाद (14)
स
स्पंदना Wed, 03/20/2013 - 05:57 नवीन
दुसर्‍या कडव्यातील तिसरी ओळ....न का ... आहे का? खरच अज्ञातकुल , तुम्हे शब्द कोठुन आणता हे आता खरच शोधल पाहिजे. मस्त!
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Wed, 03/20/2013 - 06:36 नवीन
होय अपर्णा, पण आता ती दुरुस्त कशी करायची हे कळत नाही इथे. :( प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 03/20/2013 - 07:01 नवीन
__/\__!!!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 03/20/2013 - 07:05 नवीन
सुरेख :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/20/2013 - 07:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
साऊ Wed, 03/20/2013 - 07:44 नवीन
फार छान.
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Fri, 03/22/2013 - 01:22 नवीन
छानच.. <<दूर कुहुक जणु आर्त शोडषी पर कातरलेली गूढ व्यथित आभास स्पंदने पथी विखुरलेली कळे न का असुनी नसलेपण; आभा व्यापलेली भेटीस्तव हुरहुर बहुधा ही; कळा भावओली>> हे विशेष आवडले. ही विरहीण तर प्रत्येकाच्या मनात दडलेली असते च्च. कुणी कितीही नाही म्हणोत ..आणि कातरवेळी ती बर्रोब्बर बाहेर येते न बोलवताच...
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Fri, 03/22/2013 - 05:39 नवीन
इन्दुसुता, आपला प्रतिसाद म्हणजे या कवितेतल्या भावनेला मिळालेली एक प्रांजळ पावती आहे. अजून कुणाचीतरी संवेदना अशीच आहे ही जाणीव अतिशय सुखावह आहे. तुमचा "च्च" अतीव महत्वाचा !! मनःपूर्वक आभार :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्दुसुता
फ
फिझा Fri, 03/22/2013 - 06:01 नवीन
खूप आवडली कविता !!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 03/22/2013 - 08:29 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Fri, 03/22/2013 - 08:43 नवीन
छान; आवडली.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 03/22/2013 - 08:57 नवीन
अप्रतिम कविता ! अप्रतिम ! सुरेख शब्द सुरेख मांडणी आणि सुंदर भाव
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 03/22/2013 - 09:04 नवीन
मोहक शब्द, उत्कट भावना. मुजरा शब्दप्रभु!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 03/31/2013 - 12:27 नवीन
अप्रतिम काव्य. बरेच दिवसांनी योग आलाय तुमची कविता वाचण्याचा. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा